परतूर मतदार संघात सुरु असलेल्या विविध विकास कामांना आज ना बबनराव लोणीकर, मंत्री पाणी पुरवठा व स्वछता विभाग तथा पालकमंत्री जालना यांनी आज प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली कामे दर्जेदार करून गती देण्याचे सूचना केल्या फिल्टर वॉटर ग्रीड योजना मुख्य जलकुंभ ,फिल्टर ग्रीड योजनेच्या विहिरीच्या, परतूर शहरातील भव्य नाट्यगृह,परतूर येथे कोर्ट इमारतीच्या बांधकामाची ,शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाची पाहणी केली तसेच पंचायत समितीच्या इमारतीमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे व सौर पॅनलचे उद्धघाटन केले तसेच सायंकाळी तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेऊन अधिकारी व कर्मचारी यांना सूचना केल्या सर्वप्रथम त्यांनी रोहिना खु येथील एम आय डी सी आवारात सुरु असलेल्या ३२ द.ल ली. ची क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली या ठिकाणी ३३ लक्ष लिटर्स क्षमतेचे एक व ११ लक्ष लिटर्स क्षमतेचे काम सुरु आहे तसेच कौलिफायर चे पी सी सी चे काम सुरु आहे या काम करीत लागणाऱ्या साहित्याची तपासणी करण्याकरिता प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मा मंत्री महोदयांना योजनेच्या प्रगती विषयी माहिती दिली उदभावाची कामे जमिनी पर्यंत सुस्थितीत पातळी पर्यंत पूर्ण, अशुद्ध पाण्याची उद्र्ववाहिनी ७०० मी मी व्यास डीआय के -९ लांबी १५२०० मी पैकी १११६६ मी पूर्ण,जलशुद्धीकरण केंद्र १५ टक्के काम पूर्ण, शुद्ध पाण्याची उद्र्ववाहिनी एकूण ९३ किमी पाइप लाईन पैकी ३५ किमी पूर्ण,मुख्य संतुलन टाकी एकूंण १२ पैकी ३ चे काम सुरु,उर्वरित चे नकाशे मंजुरीसाठी सादर,शुद्ध पाण्याची गुरुत्व वाहिनी एकूण २०१ किमी पैकी ५५ किमी पाइप प्राप्त व ३ किमी पाइपलाइन चे काम पूर्ण,६७ जलकुंभ पैकी ३४ जलकुंभाचे काम सुरु उर्वरित चे नकाशे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे माहिती देण्यात आली त्यांनंतर लोणीकरांनी जुने मापेगाव येथील मुख्य विहिरींची पाहणी केली येथील दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटर मधील १२ मी व्यासाच्या आर आर सी विहिरिचे काम प्रगती पथावर आहे मा मंत्री महोदयांनी सदरील काम पावसाळापूर्वी सुरक्षित पातळी पर्यंत पूर्ण करण्याची सूचना केली तसेच योजनेची काम दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे सांगितले त्यांनतर परतूर येथील नाट्यगृह, कोर्ट इमारतीच्या बांधकामाची ,शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाची पाहणी केली व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले नाट्यगृहाचे काम २ वर्षात पूर्ण करनार असल्याची माहिती दिली विकास कामांची पाहणी केल्यानांतर पालकमंत्री लोणीकर यांचे हस्ते पंचायत समिती आवारात वृक्ष लागवड करण्यात आली या वेळी पंचायत समिती इमारती मधील सी सी टी व्ही यंत्रणेचे व सौर ऊर्जा संचाचे उदघाटन करण्यात आले या वेळी नामदार लोणीकर म्हणाले,सौर ऊर्जा संच बसविणारी परतूर पंचायत समिती हि जिल्ह्यातील पहिली आहे,वृक्ष लागवडीचे महत्व विशद करून या आठवड्यात सर्व ग्राम पंचायतींनी गावामध्ये व जलयुक्त शिवार योजने मधून झालेल्या ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहान केले झाडे लावणाऱ्या ग्राम पंचायतींनी अधिकचा निधी देणार असल्याचे सांगितले परतूर मतदार संघातील वॉटर ग्रीड योजना हि पथदर्शी प्रकल्प असून याच धर्तीवर संपूर्ण मराठवाडासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड करण्यात येणार आहे या नंतर मनोज माटोळे यांच्या टरॉयल जिम चे उदघाटन करण्यात आले तसेच तहसील कार्यालय परतूर येथे रुर्बन योजनेच्या आढावा बैठक देवून विविध सूचना केल्या या दौऱ्याच्या व कार्यक्रमाच्या वेळी सर्वश्री राहुलभय्या लोणीकर,रमेश भापकर,रामेश्वर तनपुरे,बद्री ढवळे प्रदीप ढवळे ,विठ्ठल काळे,शरद बोराडे,सुरेश सोळंके,शिवाजी घनवट,रामप्रसाद थोरात,ओम मोर, संपत टाकले,रमेश आढाव,शिवाजी पाइकराव,सुधाकर साटोनकर,संजय अवचार,नागेश ढवळे ,शहाजी राक्षे,उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,कार्यकारी अभियंता श्री अजय सिंग,यांचे सह सर्व संबंधित अधिकारी कारभारी उपस्थित होते
टिप्पण्या