Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

भिमाची लेक चालली विदेशात !! कु.शताब्दी कांबळेचा भव्य सत्कार

अहमदपूर: दि ४जूलै
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन अभियांत्रिकीचे उच्च पदवी प्राप्त करणारी कु.शताब्दी राजेंद्र कांबळे ही मलेशिया येथे नोकरीसाठी रवाना होत असल्याने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंचच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण संजयभाऊ कांबळे तर गोपीनाथ जोंधळे, नाथराव केंद्रे,प्रा.बालाजी आचार्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महात्मा फुले विद्यालय येथून १०वी, म.गांधी महाविद्यालयातून १२वी ऊत्तीर्ण होणार्या कुं शताब्दीचे अभियांत्रिकी पदवी चे शिक्षण म.गांधी मिशन नांदेड येेथे २०१२साली पूर्ण झाल्यानंतर कॅपजैमिनी पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर तीन वर्ष नोकरी करुन आता ती आय टी क्षेत्रात नोकरी करण्यासाठी कोललंपूर मलेशिया ७जूलै रोजी मुंबई येथून रवाना होणार आहे.
विद्रोही कवी, रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या राजेंद्र कांबळे यांची सुकन्या कु. शताब्दीचा जाहीर सत्कार येथील सावरकर चौकात झाला हे विशेष आहे. परदेशात नोकरीसाठी जाणारी प्रथम कन्या कु. शताब्दी ठरली आहे.
यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते धर्मपाल गायकवाड, मच्छिंद्र गोजमे,टीव्ही९ चे महेंद्र जोंधळे,एबीपी माझा चे निशांत भद्रेश्वर आदींनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान ससाणे प्रा.डॉ.गणेश मदने,प्रा. विनय ढवळे,उत्तम कांबळे,सारीपुत्र ढवळे संजय माकेगांवकर,सत्यपाल वाघमारे, राहुल ढवळे,प्रकाश ससाणे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद वाघमारे यांनी केले तर आभार बाबासाहेब वाघमारे यांनी मांडले.