मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीलंका दौऱ्या दरम्यान श्रीलंका सरकारने ना. लोणीकरांचा केला आगळा वेगळा सन्मान

जालना /आॅनलाईन प्रतिनिधि सुरेश कवडे
-मराठवाडा वॉटर ग्रीड व परतूर विधानसभा वॉटर ग्रीड च्या महत्वपूर्ण अभ्यास दौऱ्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर यांचा श्रीलंका दौरा नुकताच पार पडला. दौऱ्या दरम्यान ना.लोणीकर यांनी ग्रीड साठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे श्रीलंकन सरकारने विशेष सन्मान करत अत्यंत अत्याधुनिक विमानातून श्रीलंका वॉटर ग्रीडची पाहणी करण्यासाठी व्यवस्था केली. संबंधित विमानात जमिनीबरोबरच पाण्यावरही उतरण्याची क्षमता असून प्रत्यक्ष योजनेच्या मुख्यकेंद्राजवळ जाऊन श्रीलंका वॉटर ग्रीड ची पाहणी करणे सोयीचे झाले. यावेळी पूर्वप्रांत राज्याचे मुख्यमंत्री नजीर अहमद, नगर नियोजन व पाणीपुरवठा केंद्रीय मंत्री रौफ हकिम, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री वसंत सेनानायके, पूर्वप्रांत राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, मत्सव्यवसाय, जलसंपदा व अन्न नागरीपुरवठा मंत्री कृष्णा पिल्लई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पण्या