Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

नागीन डान्स पडला महाग..

लग्न म्हटलं की वरात आलीच. वरातीसोबतनाचणारा नवरदेव आणि नागीन डान्स करणारे त्याचे मित्र हे आता एक कॉमन चित्र झालंय.पण हाच नागीन डान्स करणं एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलंय. कारण लग्नाच्या थोडा वेळ आधी नागीन डान्स केल्यानं या नवरदेवाचं लग्नच मोडलंय.
हि बातमी आहे उत्तर प्रदेश राज्यातील  शहाजहानपूरची.अभिषेक मिश्रा आणि प्रियांका त्रिपाठी अशी वधू वरांची नावं आहेत. लग्नाच्या आधी थोडा वेळ नवरदेव पू्र्ण दारू पिऊन होता.एवढंच नाही तर त्यानं अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीनं नागीन डान्स केला .तो नागीन डान्स करत असताना त्याच्या मित्रांनी त्याच्यावर पैसेही उधळले. हे सगळं प्रियांकाला सहन न झाल्यानं तिनं लगेच लग्न मोडलं आणि एवढचं नाही तर दुसऱ्याच दिवशी एका सोज्वळ मुलाशी लग्नही केलं. नवऱ्याच्या मित्रांनी तिला धमकावलंही.नवरदेवाच्या कुटुंबानं तिची माफी ही मागितली. पण तिनं कुणाचंच काही ऐकलं नाही.या सगळ्या प्रकारात मुलीचे वडील मात्र तिच्या मागे खंबीरपणे उभे राहिले .