Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

‘मोक्ष’ मिळवून देण्याच्या नावाखाली ‘तो’अत्याचार..!..ऑनलाइन महासंवाद न्युज

मुंबई - हयातीत सत्कार्य करायचे सोडून अनेकजण मृत्यूनंतर ‘मोक्ष’ कसा मिळेल, यासाठी धडपडतात आणि अलगद फसवणूक करणाऱ्यांचे भक्ष्य बनतात. अशीच एक घटना शिवडीत घडली असून ‘मोक्ष’ मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांसोबत दुष्कृत्य करणाऱ्या एका तथाकथित योगगुरुला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे.हा योगगुरू मुंबईत एक योग अॅकॅडमी चालवत असून सध्या तो जामिनावर सुटला आहे. शिवराम राऊत असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम शिवडीमध्ये शिओम तीर्थ नावाने एक अॅकॅडमी चालवत आहे. त्याच्या अॅकॅडमीत मोठ्या संख्येने महिला आणि पुरूष योग शिकण्यासाठी येतात.नोव्हेंबर २०१६ मध्ये योग शिकवण्याच्या बहाण्याने शिवरामने तक्रारदार महिलेसोबत छेडछाड केली होती. एवढेच नव्हे, तर ‘मोक्ष’ मिळवून देण्याच्या नावाखाली शारीरिक संबंध ठेवण्यासाठीही तो सातत्याने तिच्यावर दबाव टाकत होता.पीडित महिलेने या प्रकाराचा विरोध केल्यावर चूक झाल्याचे सांगून तो काही काळ गप्प बसत असे, त्यानंतर पुन्हा महिलेसोबत छेडछाड करत असे. अखेर या योगगुरूच्या अश्लील चाळ्यांना कंटाळून पीडित महिलेने आर. के. मार्ग पोलिसांत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी योगगुरूला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यावर अॅकॅडमीतील आणखी पाच महिलांनीही पुढे येऊन त्याच्या विरोधात शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली.पोलिसांनी या तथाकथित योगगुरूला न्यायालयापुढे हजर केल्यावर न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडून दिले.