राणीसावरगांवात आष्टविनायक गणेश मंडळाकडून विविध उपक्रम
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
राणीसावरगांव (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशालेत आष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक रावसाहेब कातकडे , प्रमुख पाहुणे म्हणून रमेश महामुने , संजय रायबोले , ज्ञानेश्वर जाधव , सुरेश सालमोटे , मंडळाचे अध्यक्ष निलेश सालमोटे , सौरभ सालमोटे , प्रवर्तक नागेश सालमोटे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वक्तृत्व स्पर्धेत अरषणाज तांबोळी , दीक्षा सालमोटे , शुभम वडे , किरण गवळे निबंध स्पर्धेत परसराम निलेवाड , अजय निलेवाड अरषणाज तांबोळी, विष्णू चव्हाण , दीक्षा सालमोटे हस्ताक्षर स्पर्धेत गायत्री जाधव , अपूर्वा देशमुख , चांदनी चव्हाण , शेख शहामद , अक्षदा नागलवाड , समरिन शेख , बालिका डोणे , विशाल जाधव , दुर्गा ठोमके साक्षी हाके आदी विद्यार्थ्यानी पारितोषिक मिळवले आहे यावेळी आवडते शिक्षक म्हणून राजू लक्ष्मण मुंडे व आवडत्या प्राथमिक शिक्षिका म्हणून मिराबाई चंद्रकांत क्षेत्रपाळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवर्तक नागेश सालमोटे अध्यक्ष,निलेश सालमोटे सौरभ सालमोटे आदींनी परिश्रम घेतले आहे.
टिप्पण्या