Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

विकास योजनांची माहिती देण्यासाठी "संवाद पर्व" उपक्रम निश्चित स्तुत्य - पोलीस उपअधीक्षक बनकर

नांदेड, दि. 2 :- शासनाच्या विविध विकास योजना, निर्णय, उपक्रमांची माहिती संवादाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी "संवाद पर्व" सारखा उपक्रम निश्चित स्तुत्य आहे, असे प्रतिपादन नांदेडचे पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी केले.
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना विविध शासकीय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्याकरीता "संवाद पर्व" हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय व श्री यादव गणेश मंडळ हनुमान पेठ (वजिराबाद) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने काल आयोजित "संवाद पर्व" कार्यक्रमात श्री. बनकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या, प्रा. उमाकांत जोशी, गणेश मंडळाचे अध्यक्ष अक्षय यादव, छायाचित्रकार विजय होकर्णे, प्रा. डॉ. कैलाश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. 
सर्वसामान्य जनतेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून युवकांना नौकरीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन मार्गदर्शन शिबीर घेत असते त्याचा लाभ घ्यावा. युवकांकडून अनेकविध विधायक कामे होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी आपल्या शक्तीचा वापर करावा व समाजात चांगले बदल घडावावेत. चारित्र्य संपन्न जीवन जगुन आदर्श निर्माण करावा. गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून समाजातील गोरगरीबांना आर्थीक मदत व विधायक बाबींवर अधीक भर दिला पाहिजे. शासनाच्या विविध योजनेतून स्वत:बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा अशोक बनकर यांनी व्यक्त केली.
श्री. हुसे म्हणाले, शासनाच्या विविध योजनेची माहिती "संवाद पर्व" च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविली जाते. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांकडून एमपीएससी, युपीएससी या परीक्षेसाठी मोफत तयारी करुन घेतली जात आहे. जिल्हा ग्रंथालयात मार्गदर्शनाबरोबरच अभ्यासिकेची चांगली सुविधा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले आहेत