Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते 29 जुन रोजी स्व. पंडितआण्णा मुंडे स्मृती पुरस्कार व विद्यार्थ्यांचा गुणगौरव

*परळी न.प. शिक्षण समिती आयोजित......
*ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते 29 जुन रोजी स्व. पंडितआण्णा मुंडे स्मृती पुरस्कार व विद्यार्थ्यांचा गुणगौरव*

*परळी वैजनाथ दि. 22 (प्रतिनिधी)*
परळी न.प. शिक्षण समितीच्या वतीने गतवर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या न.प. कार्यालयातील उत्कृष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांस देण्यात येणाऱ्या स्व. पंडितआण्णा मुंडे स्मृती पुरस्कार वितरण व इयत्ता 10 वी, 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा शुक्रवार दि. 29 जुन रोजी आयोजित करण्यात आला असून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार असून या कार्यक्रमास परळी व मतदार संघातील सर्व शिक्षण प्रेमी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक शिक्षण व क्रिडा, सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे यांनी केले आहे.

परळी नगर परिषद शिक्षण समिती व डॉ. भालचंद्र वाचनालयाच्या वतीने मागील वर्षीपासून न.प. कार्यालयात सेवाभाव वृत्तीने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांस स्व. पंडितआण्णा मुंडे पुरस्कार देण्यात येतो. तसेच इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येतो. यावर्षी स्व. पंडितआण्णा मुंडे पुरस्कारासाठी न. प. कार्यालयीन अधीक्षक वामन नारायण जाधव, लिपीक बाबासाहेब नारायण पारेकर, स्वच्छता निरीक्षक शंकर नारायण साळवे हे मानकरी ठरले असून या कार्यक्रमास नैपत्य, रंग भुषा क्षेञात परळीचे नांव उज्वल करणारे ऑल इंडिया हेअर ऍण्ड ब्युटी अवॉर्ड 2018 प्राप्त लखन देविदस परळीकर आणि देशातच नव्हेतर जगात गाजलेल्या एम्स च्या परिक्षेत देशातून 41 वा क्रमांक पटकावून परळीच्या शैक्षणिक क्षेञात नांव लौकीक मिळविणाऱ्या लोकेश पारस मंडलेचा यांचा विशेष गौररव करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात परळीत मतदार संघातील इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या शाळा व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि. 29 जुन रोजी सकाळी 11 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात विधान परिषद विरोधीपक्षनेते  ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण होत असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. सरोजनीताई हालगे प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण, न.प. गटनेते वाल्मीक आण्णा कराड, जि.प. सदस्य अजय मुंडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, पं.स. सभापती सौ, कल्पनाताई सोळंके, कृ.उ.बा.स. सभापती सुर्यभान मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष ऍड. गोविंद फड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक शरद मुंडे, चंदुलाल बियाणी, रा.कॉ. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, जेष्ठनेते प्रा. डॉ. मधुकर आघाव, माजीनगराध्यक्ष दिपकनाना देशमुख, रायुकॉ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, परळी विधान सभा अध्यक्ष गोविंद देशमुख, पं.स. उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे, रा.कॉ. महिला आघाडी शहराध्यक्षा सौ. अर्चना रोडे, रा.कॉ. शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष डि. जी. शिंदे, शहराध्यक्ष अजय जोशी आदिंची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास परळी शहर व मतदार संघातील सर्व शिक्षण प्रेमी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक परळी न.प. शिक्षण व क्रिडा, सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे, मुख्याधिकारी, स्वागतोत्सुक बांधकाम सभापती रिहानबी शेख शरीफ, स्वच्छता सभापती विजय भोयटे, पाणी पुरवठा सभापती सौ. प्राजक्ता भावड्या कराड, महिला व बालकल्याण सभापती सौ. मिना पांडूरंग गायकवाड, उपसभापती सौ. कमल रावजी कुकर, नगरसेवक शकील कुरेशी, राजा खॉ पठाण, सौ. शोभाताई चाटे, अमृता रोडे, सौ. उर्मिला रोडे, सौ. प्रियंका रोडे, सौ. रेश्मा बळवंत, सौ. शहॉजहॉं बेगम खान, शेख अन्वर मिस्कीन, किशोर पारधे, अजीज कच्छी, जयप्रकाश लड्डा, सौ. अन्नपूर्णा आडेपवार, संजय फड, अनिल अष्टेकर, सौ. राजश्री देशमुख, सौ. नाजेमाबी पठाण आदिंच्या वतीने करण्यात आले आहे.

*आकर्षक भेट वस्तु व स्मृती चिन्ह देवून विद्यार्थ्यांचा गौरव*

यावर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव या कार्यक्रमात आकर्षक लॅपटॉप कॉलेज बॅग आणि भेट वस्तु व स्मृतीचिन्ह, सन्मानपञ  देवून करण्यात येणार असुन या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.