इंदूर, मध्य प्रदेश - प्रतिनिधी, दि.१२ महासंवाद ब्युरो) : लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती अद्याप कळू शकली नाही. भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय असतात. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस होती. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक महत्वाचे व्हिआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्यू महाराजांच्या निधनाने भक्त परिवारामध्ये शोककळा पसरली असून त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भक्तांनी त्यांच्या आश्रमाकडे धाव घेतली आहे.
टिप्पण्या