Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

गुणवत्ता सिद्ध करण्याच्या भानगडीत कोचिंग क्लासेस चालकांची बनवेगीरी उघड...

 खाजगी शाळांचे शिक्षकही क्लासेस चालविण्यात व्यस्त  ..

राणीसावरगाव, प्रतिनिधी, ....
लातुर, नांदेड, परभणी शहरांपाठोपाठ कोचिंग क्लासेसचे लोण आता ग्रामीण भागात ही पसरलेले दिसत असुन कोचिंग क्लासेस च्या गोंडस नावाखाली खाजगी शाळेतील शिक्षक व बेरोजगार युवकांनी दुकानदारी चालु केली आहे. विद्यार्थ्यांसह पालकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बस स्थानक परिसरात व मुख्य रस्त्यावर मोठे मोठे बॅनर, होल्डिंग लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी थेट विद्यार्थ्याचे गुण वाढविल्याचा प्रकार उजेडात आल्याने कोचिंग क्लासेस चालकांची बनवेगीरी चव्हाटय़ावर आली आहे. ग्रामीण भागात अक्षरश संबंधित विषयाचा तज्ञ किंवा पदवी नसताना ही खोटी पदवी टाकून आडाणी लोकांची दिशाभूल केली जात आहे.
नुकतेच दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून नुसते उतीर्ण होण्याला काही महत्त्व उरलेले नाही. जादा गुण मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी खाजगी शिकवणीसाठी शहरांकडे धाव घेत आहेत. नांदेड,लातूरमधील काही कोचिंग क्लासेस चालकांनी मोठ्या गावात व तालुक्याच्या ठिकाणी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. तर काही स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांनीही रोजगार म्हणुन या व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला असला तरी त्याबरोबरच काही नामांकित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून खाजगी कोचिंग क्लासेस ची दुकानदारी चालवीत आहेत. शिक्षण विभागाला अंधारात ठेवून भरपुर पैसे कमविणाऱ्या या शिक्षकांनी आता जनतेच्या डोळ्यात धुळफेक करायला सुरुवात केली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याला एका विषयात केवळ  83 गुण मिळालेले असताना कोचिंग क्लासेस चालकांकडून मात्र 93  गुण मिळाले असल्याचे दाखवून "आम्हीच गुणवत्ता यादीत विद्यार्थी आणतो", "सर्वाधिक निकाल दैणारे एकमेव आम्हीच" असे सांगून नवीन विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित केले जात आहे. प्रत्यक्षात 83 गुण मिळाल्याची चर्चा असतांना 93 गुण कसे वाढले याची खात्री करण्यासाठी काही शिक्षण प्रेमींनी ऑनलाईन मार्कमेमो काढला असता कोचिंग क्लासेस चालकांची बनवेगीरी चव्हाटय़ावर आली आहे. चुकीचे निकाल दाखवुन सोशल मिडीयासह फेसबुक वर प्रचार करताना लोकांकडून याचे पुरावे सादर करून कोचिंग क्लासेस चालकांची बनवेगीरी उघड होत आहे.  कोचिंग क्लासेस च्या नावाखाली सुरू असलेल्या धंद्यातुन गोरगरीब मुलांकडून भरपुर माया कमविली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आता राणीसावरगाव येथील शिक्षण संस्थेतील काही खाजगी शिकवणी घेणार्या शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.