Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

भूमिगत गटारीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेले काम अर्धवट ठेवल्याने या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. भूमिगत गटार योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याने या खड्ड्याने एका मुलाचा बळी घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हिंगोली शहरातील विविध भागात नगर पालिकेकडुन भूमिगत गटार योजनेचे काम मागिल अनेक महिन्यापासून सुरू आहे. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या कामासाठी खोदकाम करण्यात आले होते. मात्र, हे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने पावसाचे पाणी या खड्ड्यामध्ये साचले होते. याच खड्ड्यात पेन्शनपुरा भागातील एक १४ वर्षीय मुलगा पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही बाब सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मुलाला पाण्याबाहेर काढुन त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.