संवेदनशील अधिकार्यांचा ऋणानुबंध उपक्रम.....*
◆ पुणे हे शिक्षणाचे माहेर घर असुन राज्यातुन लाखभराहून अधिक विध्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये येतात. अभ्यासु असुनही, मेहनत करण्याची क्षमता असुनही विदयार्थीना पैसा अभावी क्लासेस करता येत नाही.कारण तथाकथित क्लासेसची अवाढव्य फी देणे विदयार्थी व पालकास देण्यास परवडत नसल्याने विदयार्थी हतबल होतात.
◆ जे विदयार्थी या अकॅडेमीत शिकुन यशस्वी झाले तसेच संलग्न आहेत त्या संवेदनशील अधिकार्यांनी एकञ येउन सामाजिक बाधिलकी म्हणुन "कृतज्ञता निधी" निर्माण केला. ह्या निधीचा विनीयोग ग्रामीण भागातील गरीब व होतकरु विदयार्थींसाठी होईल.
◆ टेकरेल संचलित *ज्ञानसाधना* या युपीएससी व एमपीएससी या अँकडमीतुन मागील चार वर्षात असंख्य अधिकारी घडवण्यात अाले. *ज्ञानसाधना* अँकडमीचे संचालक भुषण कदम हे नेहमीच गरीब अभ्यासू विदयार्थीचे स्वप्न पुर्ण व्हावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. कर्तबगार अधिकारी निर्माण व्हावेत व त्यासाठी गरजु गुणवान विदयार्थींना सहकार्य करावे असे त्यांची धारणा असते. ह्या अकॅडमीची वाटचाल शाम देशपांडे (निवृत्त प्रशासकिय IAS अधिकारी) यांच्या मुख्य मार्गदर्शना खाली असेल. देशपांडे सर ह्यांची अत्यंत अनुभवी, अभ्यासु, कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन राज्यभर वेगळी ओळख अाहे. त्याचा व्यासंग व प्रशासनातील अनुभव विदयार्थीना उपयुक्त ठरत आहे.
◆ शिक्षणाचा खर्च सर्वसामान्याच्या अवाक्याबाहेर जात अाहे. अशा या परिस्थितीमध्ये जिवघेण्या परीक्षेत येणार्या काळात गरीब विद्यार्थी तग धरु शकणार नाही. साधारणपणे स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना मार्गदर्शन वर्ग , अभ्यास साहित्य,अभ्यासिका अशा सुविधाची गरज असते. त्याअभावी आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेला गुणवान विध्यार्थी वंचित राहुन नये.यासाठी *ज्ञानसाधना* अकॅडमीच्या माध्यमातुन विदयार्थींयाना "कृतज्ञता निधी" मधून शिष्यवृती देण्याचे ठरवले आहे.
◆ *ज्ञानसाधना* अकॅडेमीच्या मार्गदर्शन वर्गासाठी एकूण रु 50,000 शुल्कापैकी प्रति विध्यार्थी रु 30,000 शैक्षणिक शुल्काचा भार ह्या *कृतज्ञता निधी* तुन उचलला जाईल. विध्यार्थीयाना फक्त प्रशासकीय (Administrative Expenses) शुल्क रुपये 20,000 द्यावे लागणार आहे. म्हणजेच अंत्यत माफक खर्चात विद्यार्थीयाना महाराष्ट्रातील सर्वोत्तम व तज्ञ प्राध्यापकच्या तर्फे संपूर्ण एक वर्षाच्या कालावधीची MPSC राज्यसेवा परीक्षेच्या तयारीचे कलासरूम कोचिंग, छापील नोट्स व पद मिळेपर्यंत मार्गदर्शन मिळेल.
◆ या शिष्यवृत्तीस पाञ होण्यासाठी पुर्वपरीक्षा देणे अनिवार्य अाहे. ही परीक्षा रविवार दिनाक 8 जुलै 2018 रोजी सकाळी 11 वाजता ज्ञानसाधना अकॅडमी टेकरेल बिल्डिंग,छ. संभाजी महाराज पुतळ्याजवळ, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे होईल.
संपर्क 8007960004 / 8007960008
माहिती अधिक अधिक लोकांपर्यंत व्हॅटअप ग्रुप, फेसबुक तसेच प्रतक्ष्यरित्या होतकरू विध्यार्थी पर्यंत पोहचवावी ही विनंती - आपला *भूषण कदम*
टिप्पण्या