Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

आंतराराष्ट्रीय योगदिनी अनोखे आंदोलन

देशभरात गुरुवारी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत असतानाच पाटोदा येथे लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने अत्यंत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधत चक्क प्रशासनाला सुक्के बोंबील देत अन्नदान आंदोलन केले.गुरूवारी सकाळी लोकजनशक्ती पार्टीचे तालुकाअध्यक्ष गोरख झेंड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसील परिसरात योगासानाच्या मुद्रेत एका पायावर उभा राहत प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध योगासने करून तहसील परिसर दणाणून सोडला होता. महसूल कार्यालयाकडे नमुना नं.१४ व काही कागदपत्रे खोटी असून ती कार्यालयामार्फत दिले जात आहेत. अशी खोटी कागदपत्रे देणाऱ्यावर कारवाई करावी, पीक कर्जासाठी होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी,माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेत देण्यात यावी, दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला चक्क सुके बोंबील व भाकरी देवून आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत या मागण्या संदर्भात योग्य दखल घेतली जात नाही तोपर्यंत या ठिकाणी ठिय्या मांडण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला होत., यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सुनील ढाकणे यांनी आंदोलकाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण चर्चा निष्फळ ठरली व तहसीलदार येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. या ठिकाणी पोलीस निरीक्षक एस.जे.माने यांच्या उपस्थितीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.