★★★★★★★★
" जात,धर्म,पक्ष,या मर्यादांच्या सिमा ओलांडून माणसाच माणसाशी माणुसकी नात हे जीवनात श्रेष्ठ असतं असा माणुसकीचा संदेश
देण्याच काम शिवसेनेचे गंगाखेड विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे यांनी आपल्या कार्यातुन समाजासमोर दिला आहे.
काही दिवसापुर्वीच कॉंग्रेस पक्षामधे काम करणारे युवा कार्यकर्ते शेख युनुस यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेने तरुण,धडपड्या व राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तळमळीने काम करणा-या कार्यकर्त्याच कुटुंब उघड्यावर पडल.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली व परिवार आहे.या घटनेनंतर संतोष मुरकुटेंनी आज दि.11 जुलै रोजी कोणताही गाजावाजा न करता दिवंगत शे.युनुस यांच्या कुटुंबाची भेट घेऊन आत्मीयतेने विचारपुस केली.कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याने परिस्थिती न सांगताही ठळकपणे दिसुन येत होती.या सर्व परिस्थितीची जाणीव ठेऊन संतोष मुरकुटे यांनी दुःखाच्या खाईत सापडलेल्या शे.युनुस यांच्या कुटुबाला 25000 रु. मदत केली.
संतोष मुरकुटे यांनी केलेली मदत जरी अल्प वाटत असली तरी त्यांनी जी आत्मीयता व प्रेम भावना दाखवली त्यामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. जात,धर्म पक्ष या गोष्टींचा विचार न करता केवळ माणुसकी चा धर्म पाळण्याच व सामाजीक एकात्मतेच दर्शन त्यांनी जगासमोर ठेवल आहे.त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कार्याला एक वेगळी उंची लाभली आहे..
संतोष मुरकुटे यांच्या कार्याला लाख लाख सलाम ".....।।।
टिप्पण्या