मुख्य सामग्रीवर वगळा

राजश्रीताई जामगे यांच्या हस्ते काहूर’ फॅमिली डॉक्टर दिनदर्शिका-2019 चे प्रकाशन

‘काहूर’ फॅमिली डॉक्टर दिनदर्शिका-2019 चे प्रकाशन
विशेषांकाचा बादशाह...‘काहूर’ प्रकाशनाची आणखी एक दिनदर्शिका फॅमिली डॉक्टर-2019 चे प्रकाशन डीवायएसपी श्री. सुधाकर रेड्डी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक हेमंत मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दीनानाथ फुलवाडकर, सुप्रसिद्ध डॉ. के.पी. गारोळे, पोलीस निरिक्षक श्री. सोहन माछरे, केंद्र, राज्य सरकार योजना व्यक्तिगत लाभार्थी परभणी लोकसभा संपर्क प्रमुख सौ. राजश्रीताई बाबासाहेब जामगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. सुरेश थोरात, गंगाखेड लॉयन्स क्लब टाऊनचे अध्यक्ष लॉ. दगडूशेठ सोमाणी, लॉ. केशव देशमुख, दै. लोकमत प्रमिनिधी अन्वर लिंबेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदू सोमाणी, पत्रकार भीमराव कांबळे, एन.टीव्हीचे प्रतिनिधी अंकुश कांबळे, महासंवाद महामुने, पत्रकार माऊली जाधव, बालासाहेब कदम, ‘काहूर’चे संपादक शंकर इंगळे आदींची उपस्थिती होती.
काहूर प्रकाशनाने वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन संग्राह्य, दर्जेदार विशेषांक वाचकांसमोर ठेवल्या बद्धल संपादक शंकर इंगळे यांचा सत्कार गंगाखेड लॉयन्य क्लब टाऊनचे अध्यक्ष दगडूशेठ सोमाणी, लॉ. केशव देशमुख, डॉ. हेमंत मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर रेड्डी यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला.

टिप्पण्या