Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

जालन्यात गोळी झाडून सहायक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या... महासंवाद रिपोर्टर डॉ. हरिदास शेलार

*सहायक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या*

 जालना
अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तसेच पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल परजने (वय-50 वर्ष) यांनी आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली. परजने जिथे रहात होते, त्या खोलीमध्येच त्यांनी सर्व्हीस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून जीवन संपवले. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.स्वत:वर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
जालना : अंबड तालुक्यातील गोंदी येथील सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे यांनी शुक्रवारी (14 फेब्रुवारी) सकाळी १० वाजेच्या दरम्यान स्वत:कडे असलेल्या रिव्हॉल्व्हर गोळी झाडून घेवून आत्महत्या केली आहे.

ही आत्महत्या त्यांनी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून गोंदी येथील पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. मध्यंतरी वाळू माफीयांच्या मुद्यावरून त्यांचे आणि वाळू माफीयांचे तसेच पोलीस दलातील वरिष्ठांसोबत किरकोळ वाद झाले होते. ते मुळचे अंमलनेर तालुक्यातील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस उप. निरीक्षक सी. डी. सेवगन तसेच पो. उप. नि. हनुमंत वारे यांनी गोंदी येथे भेट दिली.

पोलिसांच्या खालापुरी गावातील अनिल परजणे हे पहिले अधिकारी

खालापुरी गावात पोलीस शिपायापासून ते सहायक पोलीस निरीक्षकपर्यंत अधिकारी आहेत. या गावाची पोलिसांचे गाव म्हणून ओळख आहे. २००६ साली अनिल परजणे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. नागपूरात त्यांना पहिली पोस्टींग मिळाली. सध्या ते जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांच्या आत्महत्येची वार्ता समजताच खालापुरी गावात दुखवटा पाळण्यात आला. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सामाजिक बांधिलकीतून मदत

अनिल परजणे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. नुकताच परजणे मित्र मंडळाच्यावतीने आयोजित नेत्र तपासणी शिबीरात ते प्रमुख पाहुणे म्हणून खालापुरीत आले होते. याचवेळी त्यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या लायब्ररीसाठी १० हजार रूपये देण्याची घोषणा केली होती, असे जवळच्या लोकांनी सांगितले. तसेच गावात राबविलेल्या इतर सामाजिक उपक्रमांत ते आघाडीवर होते, असेही सांगण्यात आले.

अनिल परजणे इतरांसाठी आदर्श

अनिल परजणे हे अधिकारी झाल्यानंतर त्यांनी गावातील इतर तरूणांना प्रोत्साहन दिले. मार्गदर्शन केले. त्यांची प्रेरणा घेऊन गावातील बहुतांश तरूण पोलीस दलात भरती झाले आहेत. ते गावासाठी एक आदर्श होते.