Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

मुगगांवच्या शेतकऱ्यांचे तहसिल समोर अमरण उपोषण(डॉ. हरिदास शेलार)

*मुगगांवच्या शेतकऱ्यांचे तहसिल समोर अमरण उपोषण*
➡ खरे लाभार्थी अनुदाना पासुन वंचीत अनुदान यादीत मोठा घोटाळा
*पाटोदा प्रतिनिधी * नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर मुगगाव येतिल शेतीचे खुप नुकसान झाले होते त्यावेळी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तलाठी,कृषी साहाय्यक यांनी केले होते परंतु ज्याचे पंचनामे झाले त्यातील बरेच शेतकरी अनुदाना पासुन वंचित आहेत.तलाठी अधिकारी खाजगी रायटर ठेवत असुन तो प्रत्येक गोष्टी मध्ये चुकीचे काम करत आहे सदर व्यक्ती च्या हातामध्ये तीन गावाचे मुख्य रेकॉर्ड दिले असुन यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार लोकांची आहे.त्यामुळे हा रायटर कार्यालयात ठेवण्यात येऊ नये.तसेच अतिवृष्टीमध्ये असलेल्या लोकांच्या यादीची फेर तपासणी करुन चुकीचे नावे कमी करण्यात यावेत व जे लोक अतिवृष्टीमध्ये खरे लाभार्था आहेत त्याचे नाव तत्काळ यादीमध्ये सामाविष्ठ करावेत  या मागण्यासाठी मुगगांव   येतिल शेतकरी तहसील कार्यालया समोर अमरण उपोषणास बसले असुन  उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख,गर्जे बापु यांनी पाठिंबा दिला असुन सतिष खोटे,कोडीबा भवर,  खंडु खोटे,राजेद्र भवर, मोहन खोटे यांच्या सह अनेक शेतकरी उपोषणाला बसले आहेत