**पाचंग्री च्या अमोल मुंढे ने ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत मिळवले ब्राँझपदक*
* पाटोदा प्रतिनिधी-- पाटोदा तालुक्यातील पाचंग्री गावचा अमोल बाजीराव मुंढे यांनी राज्यस्तरीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत ८२ किलो वजन गटात मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत ब्राँझपदक मिळून गावाचे नाव राज्यात गाजवले आहे. सुरवातीच्या काळामध्ये पाटोदा येथील जय हनुमान तालीम येथे बाळासाहेब आवारे वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरुवात केली व सध्या पुणे येथे सराव करीत आहे .२४/२/१९ रोजी पुणे महापौर कुस्ती स्पर्धेत ८६ किलो वजन गटात पहिला क्रमांक मिळवला आहे व परभणी केसरी स्पर्धेत ८६ किलो वजन गटात पहिला क्रमांक मिळवून २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील त्याचे वडील बाजीराव मुंडे यांनी त्याला कुस्तीक्षेत्रात पाठवले व त्यानेदेखील वडिलांच्या स्वप्नाचे चीज केले आहे .या कामगिरीबद्दल जय हनुमान तालीम पाटोदा चे डीवायएसपी पैलवान राहुल आवारे ,गोकुळ आवारे ,प्रविण सोंडगे अध्यक्ष,सागर वाघ ,सचिन दाताळ ,राहुल दाताळ, आदिक दाताळ ,सागर सुरवसे ,विशाल सुरवसे ,नागेश चोरगे ,अंबादास घटक, अंकुश गटकळ, आंधळे लहू , कृष्णा भराटे ,ज्योतीराम जगदाळे ,सचिन शिंदे, दत्ता देशमाने पत्रकार इत्यादी सर्व पैलवानांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या