Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

भर पावसात आठवले पवारांच्या भेटीला, सेना-भाजपात मध्यस्थी करा

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष तीव्र झालेला असतानाच विविध पक्षांचे शीर्ष नेते एकमेकांच्या भेटीला जाताना दिसत आहेत. त्यातच आता रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला (Ramdas Athawale meets Sharad Pawar) आले. भर पावसात आठवले शरद पवारांच्या भेटीला गेले होते.महायुतीचा भाग असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे सर्वेसर्वा रामदास आठवलेंनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीसोबत असलेले आठवले नंतर मात्र महायुतीच्या गोटात सहभागी झाले होते.
सिल्व्हर ओक’मधील शरद पवारांच्या निवासस्थानी आठवलेंनी भेट घेतली. सत्तासंघर्षाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. पवारांचा राजकीय सल्ला घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली. तर सेना-भाजपात मध्यस्थी करा, असा सल्ला पवारांनी आठवलेंना दिला.