मुख्य सामग्रीवर वगळा

मारेगावच्या तरुणाचा वणीत म्रुतदेह आढळला घातपाताची शक्यता (सचिन मेश्राम)

*मारेगावच्या तरुणाचा वणीत म्रुतदेह आढळला*
*घातपाताची शक्यता*

*महासंवाद न्युज .प्रतिनिधी. सचीन मेश्राम मारेगांव यवतमाळ*
हरविल्याच्या तक्रारी वरुन शोध

मारेगाव शहरातील एका 28वर्षीय बेपत्ता असलेल्या तरुणाचा म्रुतदेह वणी येथील रेल्वे गेटचे जवळ आढळून आल्याने खळबळ उडाली असून  घातपाताची शक्यता बोकाळली  आहे.मारेगाव शहरातील वार्ड क्रमांक 16मधील योगेश रामाजी गहुकार वय28वर्ष हे ता. 1नोव्हेंबरचे सकाळी अकरा वाजता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात रजा घेऊन वणी येथे चालक परवान्याच्या कामासाठी गेले होते मात्र  दिवसभरात ते परत न आल्याने त्याच्या वडिलांनी मारेगाव पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविली होती.शोधकामी पोलीसानी तपास चक्रे त्या दिशेने फिरवताच योगेशचा म्रुतदेह वणी येथील वरोरा  कडे जाणार्‍या रोडचे रेल्वे गेटचे जवळ काटेरी झुडपात आढळून आला असल्याने  घातपाताची शक्यता बोकाळली आहे.
योगेश गहुकर हे मारेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये कँम्पुटर इंजिनिअर या  पदावर तात्पुरत्या बेसवर कार्यरत होते.त्याना मासीक 14हजार,400/-रुपये पगार मीळत होता  दुःखद घटनेच्या पुर्वी दिनांक 1नोव्हेबरे सकाळी अकरा वाजता योगेश आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये गेला होता चालकाचा परवाना मिळविण्याच्या कामाचे निमीत्त सांगुन त्यांनी रजा घेतली होती.त्यानंतर तो घरी परतला नसल्याने आई वडीलासह  नातेवाईकांना चिंता लागली होती त्यामुळे वडील रामाजी गहुकर यांनी घटनेची फिर्याद मारेगाव पोलिसात नोंदवली होती घटनेच्या  दिवसा पासुन मारेगाव पोलिसांसह त्याच्या नातेवाईकां कडुन शोध कामी तपास चक्रे फिरवण्यात आल्या नंतर ता.दोन नोव्हेंबरचे दुपारी तीन वाजताचे दरम्यान संशयास्पदरित्या वणी येथील वरोरा रेल्वे गेट जवळ आढळून आला म्रुतदेहाची ओळख त्याच्या नातेवाईकां कडुन पटल्या नंतर  म्रुतदेह उत्तरणीय तपासणी करीता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास वणी उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे

टिप्पण्या