Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

खासदार प्रतापराव पाटील वेतन शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार..! (नांदेड रिपोर्ट रियाज आतार)

खासदार प्रतापराव पाटील वेतन शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार..!
नांदेड (प्रतिनिधी) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक अतिवृष्टीमुळे नासाडी झाल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत असतानाच नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांना मिळणारे वेतन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे यामुळे इतर खासदार व आमदारांनी चिखलीकरांचे आदर्श घेऊन आपले स्वतःचे वेतन जर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून दिले तर शेतकऱ्यांना थोडाफार आधार याठिकाणी मिळणार आहे प्रसिद्धीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढणारे खासदार-आमदार बरेच पाहिले आहेत मात्र स्वतःचे वेतन शेतकऱ्याला म्हणून देणारे खासदार प्रतापराव चिखलीकर हे एकमेव खासदार ठरले आहेत