Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर (Ayodhya verdict live) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालावर आज (9 नोव्हेंबर) सकाळी 11.15 च्या सुमारास अंतिम निर्णय दिला गेला. “अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी नियम बनवा” असे आदेश सर्वाच्च न्यायलयाने केंद्राला दिले आहे. “एखादी ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा” असेही नमूद केले आहे. तसेच मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार आहे.त्याशिवाय मशीद कधी बांधली याची माहिती मिळालेली नाही. पण याचे बांधकाम बाबरच्या काळात झाले होते. दरम्यान मशिदीच्या खाली जी वास्तू होती, ती इस्लामिक नव्हती. मंदिर तोडून मशीद बांधल्याची ठोस माहिती नाही. अस सांगत शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरचा दावा फेटाळला आहे.अयोध्या प्रकरणी निकाल लागल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्टेशन, बस डेपो, विमानतळ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली (Ayodhya verdict live) आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील काळात या मुद्द्यावर दैनंदिन सुनावणी घेत सर्व पक्षांच्या बाजू ऐकल्या. त्यानंतर हा निर्णय दिला (Supreme Court Verdict on Ayodhya Case) आहेसरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश होता. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निकालाकडे सर्व देशांचे लक्ष होते.
संपूर्ण 2.77 एकर जमीन राम लल्लाची, वादग्रस्त जागेची वाटणी होणार नाही असेही सर्वोच्च न्यायलयात स्पष्ट झाले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्वागत करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय – अयोध्येत राम मंदिराचा मार्ग मोकळा?वादग्रस्त जागा रामलल्लाला/हिंदूंना बहाल,?मंदिर निर्माणासाठी नियम बनवा, केंद्राला आदेश?मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार?ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा?शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरचा दावा फेटाळला?मशीद कधी बांधली याची माहिती नाही, पण बाबराच्या काळात बांधकाम?मोकळ्या जागेवर बाबरी मशीद बांधलेली नाही?मशिदीच्या खाली वास्तू होती, ती वास्तू इस्लामिक नव्हती?मंदिर तोडून मशीद बांधल्याची ठोस माहिती नाही