Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

संभाजी भिडे मातोश्रीच्या पायरीवरुन माघारी, उद्धव ठाकरेंची भेट नाकारली

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहेत. त्या धामधुमीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide visit matoshree to meet uddhav Thackeray) हे नुकतंच मातोश्रीवर दाखल झाले आहेत. संभाजी भिडे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. मात्र उद्धव ठाकरेंची भेट न घेता ते मातोश्रीवरुन निघून गेले. संभाजी भिडे अचानक मातोश्रीवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट झाली नाही. संभाजी भिडे जवळपास 20 मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर न परतल्याने त्या दोघांची भेट होऊ (Sambhaji Bhide visit matoshree) शकली नाही.
भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपने अल्पमताचं सरकार नको असे राज्यपालांच्या भेटीदरम्यान सांगितले आहे. त्यातच संभाजी भिडे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संभाजी भिडे अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अचानक संभाजी भिडे मातोश्रीवर का आले? त्यांनी उद्धव ठाकरेंशी नेमकं काय बोलायचं होतं? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.