Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

गंगाखेडात दोन्हीही रेल्वे गेटवर वाहनांच्या लागल्या रांगा

गंगाखेड येथे दोन्हीही रेल्वे गेटवर वाहनांच्या लागल्या रांगा
गंगाखेड-प्रतिनिधी
येथे पोलीस स्टेशन जवळील रेल्वे गेटवर रूळ पटरीचे दुरुस्तीचे काम 10 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजल्या पासून सुरू असल्याने ये जा  करणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे .अनेक वाहन धारकांची यामुळे गैरसोय झाली. दिवसभरातील 4 ते 5 तास हे काम सुरूच राहणार असल्याचे समजते.दररोज ३६ ट्रेन्स या मार्गावरन ये-जा करतात, त्यामुळे दर अर्ध्या तासाला वेगवेगळ्या २ रेल्वे गेटवर किमान २ हजार लहान मोठ्या वाहनांच्या रांगा लागतात, अनेक अपघात आणि हाना-मारी, वादावादीच्या घटना  घडत असतात.विशेष म्हणजे गंभीर रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे  यात अनेकांना  मोठ्या घटनांना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने हे काम रात्रीच्या वेळी केलेली असते तर नागरिकांना याचा त्रास झाला नसता प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे याच बरोबर उड्डाणपुलाचे काम संथ गतीने चालू आहे गंगाखेड मधील शांत का आहेत यावर कोणीही आवाज उचलला का तयार नाही