Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

लोकांची उपासमारीची वेळ तात्पुरती सोय करावी- हमीदखान पठाण

पाटोदा शहरात अतिक्रमण मोहीममध्ये शेकडो लोकांची उपासमारीची वेळ,
पाटोदा नगरपंचायतने तात्पुरती सोय करावी- हमीदखान पठाण
प्रतिनिधी । पाटोदा दि २ - पाटोदा  शहरातुन जात असलेल्या पैठण -पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावरील छोटे व्यवसायिक विस्थापित झाले असून त्यांच्यावर व परिवारावर उपासमारीची वेळ आली . परिणामी पाटोदा नगरपंचायतने सहानुभूती दाखवुन धंद्यासाठी पर्यायी जागा द्यावी अशी लोकहिताची मागणी हमीद पठाण  यांनी केले.
    पाटोदा हा निजामकाळा पासून तालुक्याचे मुख्यठिकाण आहे.हा तालुका पहिल्या पासून उसतोड कामगारांचा तालुका म्हणून ओळखले जातो ,पाटोदा  शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. मोठी बाजारपेठ नसल्याने छोटे मोटे व्यापारी दिसुन येत आहे.आता या शहरातुन पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग अनेक दिवसांपासून रखडलेले होते.या रस्त्यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्थाचे आमदार सुरेश धस यांनी  पंकजाताई मुंडे याच्या माध्यमातुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या कडे वारोवार भेट देऊन निधी उपलब्ध करून देऊन  कामाला वेग दिला .यामुळे पाटोद्यासह अनेक गावातील विकासाला चालना मिळणार परंतु मागास असलेल्या पाटोदा शहरात सध्या चहाचे गाडेवाले,
सायकल पंम्चर काडणारे,पानटपऱ्या, फळगाडे वाले,झेरॉक्स मशीन वाले या हातावर पोट भरणाऱ्या लोकांनवर उपासमारीची वेळ आली आहे. पाटोदा नगरपंचायतने या लोकांनसाठी तात्पुरती सोय करावी अशी मागणी प्रसिद्धध्दारे
आल इंडिया जनरलिस्ट फेडरेशन चे ता.अध्यक्ष तथा समाजसेवक हमीदखान पठाण यांनी मागणी केली आहे.