Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व बाळासाहेब आंबेडकर यांच्यात चर्चा

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत भेट झाली. 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी श्री. ठाकरे यांच्या समवेत या बैठकीत चर्चा झाली.

आंदोलन शांततेत पार पाडावे या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदू भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे,हे स्पष्ट केले. या कायद्यांचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतय.

राज्यात डिटेन्शन कॅम्प उभारले जाताय हे मी तीन महिन्यांपूर्वी जनतेला, माध्यमांना सांगितले होते, त्याचीही माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली. त्यासोबत अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी धनराज वंजारी, डॉ.अरुण सावंत,आ.कपिल पाटील उपस्थित होते.