मुख्य सामग्रीवर वगळा

पूर्णा तालुक्यातील कार्यकर्ता व जनतेशी संपर्क दौरा


पूर्णा तालुक्यातील कार्यकर्ता व जनतेशी संपर्क दौरा -------------------///------------------
गंगाखेड (प्रतिनिधी) माजी.आमदार सीताराम घनदाट मामा यांचे ज्येष्ठ चिरंजीव मोहन घनदाट यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पूर्ण शहरासह तालुक्यातील गावांना भेटी देत कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पूर्णा शहरासह तालुक्यातील पेनुर,रुंज,आवई,सुहागन,बरबडी,ताडकळस,चुडावा,खोरस,धानोरा काळे,देउळगाव,वझुर,कावलगाव आदी गावांना भेटी देउन कार्यकर्त्यांशी व जनतेशी संवाद साधला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोहन घनदाट म्हणाले की पूर्णा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घनदाट परिवार सदैव कटिबद्ध आहे. जय-पराजय याचा विचार न करता विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोणत्याही भूलथापांना व अफवांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही ते म्हणाले यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.



टिप्पण्या