*नवनिर्माण प्राथमिक शाळा, क्रांतीनगर पाटोदा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
*
पाटोदा (प्रतिनिधी):- पाटोदा येथील नवनिर्माण प्राथमिक शाळा, लाल हनुमान मंदिर क्रांतीनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड डी.सी.सी.बँकेच्या संचालिका तथा प्रगती शिक्षण प्रसारक मंडळ, बीड या शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.सत्यभामाताई बांगर होत्या. या वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा आढावा शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध रूपे बाल वक्त्यांनी उलगडून दाखवले. या वेळी बोलताना सौ.सत्यभामाताई बांगर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या महान जीवनावर प्रकाश टाकला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत जे कार्य केले त्या मुळेच आज स्त्री उच्च पदापर्यंत पोचल्या आहेत. म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या वसा सर्व स्त्रियांनी पुढे चालू ठेवावा असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपशिक्षणाधिकारी जायभाये साहेब, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.विजयाताई घुले -जायभाये, पाटोदा नगर परिषदेच्या सभापती सौ.अनिताताई गीते पाटील, सामाजिक कार्यकर्ते सय्यद साजेदभाई, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेख इम्रान नुर, श्री शिवाजी सानप, श्री सचिन खंडागळे, श्री रोहिदास गीते, श्री बाबुराव गीते, सौ गुंड ताई ,सौ नवले ताई, सौ जाधव ताई, सौ नागरगोजे ताई, सौ जावळे ताई, सौ बुऱ्हाडे ताई, सौ कोल्हे ताई इत्यादी पालक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बडे मॅडम व मस्के मॅडम यांनी केले तर आभार सानप मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण (सर),भोसले सर, गाढवे सर, डोके सर, जायभाये सर, मोरे सर, भोसले मॅडम, सोनावणे मामा यांनी सहकार्य केले, व परीश्रम घेतले.

टिप्पण्या