सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचे जुने व्हिडिओ व्हायरल करून त्यांना कॅप्शन चुकीच्या पद्धतीने देऊन त्यांना बदनाम करण्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडिया च्या माध्यमातून पाहावयास मिळत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना बदनाम करण्याचा काही लोकांनी चंगच बांधला आहे अशांवर तात्काळ कार्यवाही नाही झाली तर असे विकृत बुद्धीचे लोक चांगल्या लोकांवर शेण फेकल्याशिवाय राहणार नाहीत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी करावी यासाठी देवेंद्रजी फडणवीस जेव्हा हा जनादेश यात्रा करीत होते तेव्हा त्यांचा पुण्यात दौरा असताना "दारूबंदी करा" या मागणीसाठी दारूच्या बाटल्यांचा हार मुख्यमंत्र्यांना घालायला निघाले असताना देसाई यांना त्यावेळी राहत्या घरातून पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ताब्यात घेतले होते....
महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे यासाठी गेले तीन वर्ष देसाई या काम करीत आहेत आणि दारूबंदीसाठी केलेल्या आंदोलनाचा जुना व्हिडिओ व्हायरल करून "सदर व्हिडिओ मध्ये तृप्ती देसाईना लॉकडाऊनमध्ये दारू घेताना पकडले "असे खोटे कॅप्शन पसरवून काही इसम देसाई यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर क्राईमने तातडीने या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी तृप्ती ताई देसाई यांच्या वतीने करण्यात आली आहे