मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजश्रीताई जामगे यांचा घनसावंगी मतदार संघात जन संवाद यात्रा

परभणी (प्रतिनिधी)आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी नागरिकांचा जन संवाद कार्यक्रमाचे आयोजन परभणी लोकसभा मतदारसंघातील घनसावंगी मतदारसंघात 20 नोव्हेंबर पासून कारला या गावातून सुरुवात केली यावेळी गावचे सरपंच , नागरिक, महिला, मोठया संख्येने उपस्थित होते उपस्थित जनसमुदायाला बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा समन्वयिका सौ. राजश्रीताइ जामगे यांनी मुलींचे महत्त्व पटवुन देत मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे आव्हान केले तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मुलीच्या संदर्भात विविध योजनांची माहिती दिली येथील नागरिकानी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजश्री जामगे यांना उमेदवारी पक्षाने द्यावी यासाठी एकमताने होकार दिला. सूर्यभान नारायण कोल्हे रा. मंमदाबाद हे येथील रहिवासी आहेत यांना विकास कामा संदर्भात विचारले असता ते म्हणाले की आमच्या गावात खासदार साहेब कधी आलेच नाहीत आम्हाला त्यांची ओळख ही नाही आमच्या भागात कुठलाही निधी दिला नाही असे ते यावेळी म्हणाले

तुला पाहते रे मालिका बंद करा :- प्रदीप नाईक

पुणे:  सध्या झी मराठी वाहिनीवर गाजत असलेली तुला पाहते रे ही मालिका अडचणीत आली आहे. कारण ही मालिका बंद करावी, अशी मागणी पुण्यात करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी हे निवेदन पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिलं. या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश नाही, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा त्यांचा ध्यास आहे, असा आरोप प्रदीप नाईक यांनी केला. प्रदीप नाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, “या मालिकेत 20 वर्षाची मुलगी 40 वर्ष युवकाच्या प्रेमात पडल्याचं दाखवलं आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचवला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील 20 वर्षीय मुलीचे लग्न 40 वर्षीय युवकाशी...

संशोधन हे समाज उपयोगी व्हावे-- बिसेन

संशोधन हे समाज उपयोगी व्हावे-- बिसेन नांदेड कुठले ही संशोधन हे समाज उपयोगी नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ जोगेंद्रसिंग बिसेन यांनी केले .  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुल व आय सी एस एस आर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 10 दिवसीय कार्य शाळेचे उद्घाटन करताना केले. या वेळी व्यासपीठावर आय सी एस एस आर चे संचालक डॉ अजय गुप्ता ,अधिष्ठाता डॉ वसंत भोसले , डॉ कृष्णामाचार्यलु , डॉ दुर्गेश त्रिपाठी, माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ दीपक शिंदे यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना आय सी एस एस आर चे संचालक डॉ अजय गुप्ता यांनी देशात सामाजिक शास्त्र शाखेत दर्जेदार शिक्षण व्हाव या साठी संस्था प्रयत्न करत असल्याचे सांगितले, त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित केल्याचे ते म्हणाले. आय सी एस एस आर चे कार्य या वेळी त्यांनी विस्ताराने सांगितले. या वेळी बोलताना अधिष्ठाता डॉ वसंत भोसले यांनी दर्जेदार संशोधनाची गरज कशी आहे याची माहिती सांगितली. विद्यापीठ संशोधनाला प्रोत्साहन देत परंतु संशोधकांनी दर्जा राखुन काम केल्यास विद्यापी...

परळीत मराठा क्रांती मोर्चाचे आमरण उपोषण

 मराठा समाजाला आरक्षण ठरलेल्या वेळेत न दिल्याने परळीत पुन्हा रविवार पासून मराठा क्रांती मोर्चाने आपले रोखठोक आंदोलन सुरू केले आहे. याआधी परळी मध्ये केलेले क्रांतिकारी ठिय्या आंदोलन राज्यभर गाजले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे,देवराव लुगडे यांच्यासह समाजबांधव परळी तहसील समोरील प्रांगणात आमरण उपोषणास बसले आहेत. याच तहसीलच्या मैदानावर 21 दिवस चाललेल्या ठिय्या आंदोलनाने राज्य सरकारच्या तोंडचे पाणी पळाले होते. सरकाने दिलेल्या कालमर्यादेत एकही मागणी पूर्ण न झाल्याने परळीत पुन्हा तहसील कार्यालयासमोर रविवार 25 नोव्हेंबर पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी विविध गावातील मराठा समाजबांधव साखळी उपोषण करण्यात येणार आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवार 26 रोजी परळी तालुक्यातील नागापूर येथील समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकार बद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनासाठी नागापूर येथून धनंजय सोळंके,माणिक सोळंके,संतोष सोळंके,परमेश्वर अण्णा सोळंके यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला. मराठा समाजाला आरक्षण देत असताना भूतकाळाप्...

भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी नांदेडमध्ये अनेकजण उत्सुक; रावसाहेब दानवे यांची गुगली 

नांदेड : मागील लोकसभा निवडणुकीत नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपा अपयशी ठरला. मात्र येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ जिंकण्यासाठी पक्षाच्यावतीने विशेष रणनिती आखणार आहे. विशेषत: नांदेडमध्ये भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याची गुगली भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टाकली.पक्ष बांधणी तसेच निवडणूकपूर्व आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २८८ विधानसभा मतदारसंघात जाऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, ठाणे, कल्याणनंतर आता मराठवाड्याचा दौरा करीत असून दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्ह्यात जावून कार्यकर्त्यांकडून निवडणूक तयारीची माहिती घेत आहे. नांदेड जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत पक्षाचे काम वाढले आहे. अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यातही असल्याचे सांगत थेट मतदारांपर्यंत जाण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडावे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले. बैठकीला संघटनमंत्री विजय पुराणिक, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, प्रद...