मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

होलार समाजातील मुलांना जिल्हाधिकारी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :- प्रा.एम.एम. सुरनर

*होलार समाजातील मुलांना जिल्हाधिकारी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही  ...असे प्रतिपादन प्रा.एम.एम. सुरनर ==================  गंगाखेड- महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या होलार समाजामध्ये स्वाभिमानी चळवळ उभी करण्यासाठी परभणी जिल्हा स्तरिय समाज मेळाव्याचे आयोजन मौजे वंदन ता.सोनपेठ जि.परभणी येथे दि.08 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. रवीवार रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरूवात झाली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.एम.एम. सुरनरनर त्याबरोबरच संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर तर होलार समाजाचे युवा वक्ते प्रबोधनकार प्रा.एम.एम.सुरनर यांची प्रमुख दिशा दर्शक मार्गदर्शन करण्यात आले. समाजाला मार्गदर्शन करत असताना समाजाने शिक्षण घेतले पाहिजे,त्याबरोबरच संघटीत राहिले पाहिजे ज्यामुळे समाजाला डाँ बाबासाहेबांनी निर्माण केलेले मुल्य समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता याची जोपासना करता येईल असे प्रतिपादन करत पुढे ते म्हणाले व शिकल्याने व्यक्तिचा सामाजिक,राजकीय,व आर्थिक विकास होतो. होलार समाजात गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रत्वाचा अभाव होता.त्यामुळे समाजातील प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवू...

होलार समाजाचा एल्गार मेळावा संपन्न झाला

पालम - महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या होलार समाजामध्ये स्वाभिमानी चळवळ उभी करण्यासाठी परभणी जिल्हा स्तरिय समाज मेळाव्याचे आयोजन मौजे तांबुळगाव ता.पालम जि.परभणी येथे दि.25 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.  रवीवार रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरूवात झाली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.दत्ता हेगडे सर त्याबरोबरच संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर तर होलार समाजाचे युवा वक्ते प्रबोधनकार प्रा.एम.एम.सुरनर यांची प्रमुख दिशा दर्शक मार्गदर्शन करण्यात आले. समाजाला मार्गदर्शन करत असताना समाजाने शिक्षण घेतले पाहिजे,त्याबरोबरच संघटीत राहिले पाहिजे ज्यामुळे समाजाला डाँ बाबासाहेबांनी निर्माण केलेले मुल्य समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता याची जोपासना करता येईल असे प्रतिपादन करत पुढे ते म्हणाले व शिकल्याने व्यक्तिचा सामाजिक,राजकीय,व आर्थिक विकास होतो. होलार समाजात गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रत्वाचा अभाव होता.त्यामुळे समाजातील प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवून घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.समाजाला एका छत्राखाली एकत्र करून स्वाभिमानी समाज निर्माण करण्यासाठी वैचारिक मंथन घडवुन युवका...

'नांदेडच्या गोल्डमॅन' गोविंद कोकुलवार वर भरदिवसा गोळीबार..नांदेड प्रतिनिधी आत्तार रियाज

 नांदेड : कोंग्रेसचे माजी नगरसेवक तसंच 'नांदेडचे गोल्डमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यापारी गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील चौफाळा या भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. सायंकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास गोविंद कोकुलवार हे आपल्या कार्यालयाजवळ दाखल झाले. यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या आणि पाठिमागून दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरानं त्यांच्या पाठीवर गोळी झाडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला.पाठीत गोळी लागल्यानं कोकुलवार गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रक्रृती गंभीर असल्याने कोकुलवार यांना मुंबईला हलवण्याची तयारी सुरु आहे.दरम्यान या घटनेनंतर चौफाळा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी कोकुलवार यांना खंडणीसाठी धमकी आल्याचीदेखील माहिती आहे.उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी शहरात दोन व्यापाऱ्यांवर गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये एखादी खंडणी वसुली करणारी गॅंग कार्यरत झाली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

डोंबिवली : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत एका मुलीवर मागील चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या या 19 वर्षीय विद्यार्थिनीला या 41 वर्षीय पदाधिकाऱ्याने त्याच्याशी मैत्री करण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला होता. याचा राग आल्याने या नराधमाने पीडितेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जुलै 2015 ते ऑगस्ट 2019 या काळात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. संदीप माळी असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने शनिवारी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत संदिपला अटक केली.

रस्त्यासाठी नांदेडमधील अख्खे गावच बसले उपोषणाला

कुरुळा (जि़ नांदेड) : कंधार तालुक्यातील मौजे महालिंगी येथील गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रस्त्यासाठी आबालवृद्धांसह तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे़ तालुक्यापासून ३५ किमीवर असलेल्या या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही़ त्यामुळे १७६० लोकसंख्येच्या या गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ शिक्षण, बाजार व रोजगारासाठी १० कि.मी.वर असलेल्या हाडोळती येथे जावे लागते. त्यात महालिंगी ते शेलदरा हा रस्ता खचून गेला आहे़ नाल्याच्या पाण्यात मागील एक मुलगा आणि काही जनावरे वाहून गेल्याची घटना ताजी आहे़ १९७२ ला कच्चा रस्ता झाल्याचे माजी सरपंच विश्वंभर नारायण कुटे हे सांगतात़ येणारी बसही रस्ता नसल्यामुळे बंद झाली आहे़ तर रुग्णांनाही खाटेवरुन न्यावे लागते. यामुळे सर्व गावच उपोषणाला बसले आहे़ ही आरपारची लढाई लढायची असल्याचा इशारा वृद्ध तुकाराम गोपाळ गुंठे यांनी दिला़ तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे रुक्मिणीबाई गिते, मंगलबाई भागवत गुटे, गोदावरीबाई कुठे, अनुसया पांचाळ या महिलांनी सांगितले. भाऊ गुटे, बाबूराव केंद्रे, अशोक गुट्टे, नागोराव गुट्टे यांनी जिल्...

रत्नाकर गुट्टेंच्या संपत्तीवर बँकांचा ताबा घेणार.!१७३७ कोटींची थकबाकी

गंगाखेड शुगर कर्ज प्रकरणात अटकेत असलेले रत्नाकर गुट्टे यांच्या सुनील हायटेक या कंपनीकडे १७३७ कोटी ६३ लाख ३० हजार २०२ रुपयांचे कर्ज थकीत असल्याची नोटीस युको बँकेने प्रसिद्धीस दिली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज वसूल करण्यासाठी गुट्टे आणि त्यांच्या कुटुंबीयांची परळी आणि गंगाखेडमधील संपत्ती ताब्यात घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गंगाखेड शुगरबरोबर रत्नाकर गुट्टे यांच्या नावे असणाऱ्या सुनील हायटेक या कंपनीला युनायटेड बँक ऑफ इंडिया, लक्ष्मीविकास बँक आणि ओरिएंटल बँक, आयसीआयसीआय, आयडीबीआय, सिंडिकेट, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, करुर वैश्य बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी एकत्रितपणे कर्ज दिले होते. २०१८ पर्यंत कर्जाची ही रक्कम १४२० कोटी ७७ लाख ३५ हजार ७७ एवढी होती. त्याचे ३१ डिसेंबपर्यंतचे व्याज ३३६ कोटी ८५ लाख ९५ हजार १२५ एवढे होते. ही सगळी रक्कम वसूल करण्यासाठी युको बँकेने घर, भूखंड, शेतजमीन ताब्यात घेण्याची नोटीस जाहीर केली आहे.  रत्नाकर गुट्टे, तसेच सुनील हायटेकचे संचालक सुधामती गुट्टे, विजय रत्नाकर गुट्टे व सुनील रत्नाकर गुट्टे यांच्या नावे परळी येथील घर व...

कुक्कुट पालनातून स्वतःचा विकास करणे ही काळाची गरज:- श्रीनिवास मुंडे

*गावरान चवी सह मांसल प्रथिनांची वाढती मागणी लक्षात घेता ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना देशी  जातीच्या परसातील कुक्कुट पालनास भरपूर वाव असून देशी जातीच्या कुक्कुट पालनातून   स्वतःचा विकास करणे ही  काळाची गरज आहे* असे प्रतिपादन मा. श्री श्रीनिवासजी मुंडे सभापती कृषी , पशुसंवर्धन व दुगधशाळा समिती जिल्हा परिषद परभणी तथा सदस्य, जिल्हा नियोजन समिती परभणी यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत 'परसातील कुक्कुट पालनास चालना देणे' या योजने अंतर्गत गंगाखेड तालुक्यातून दारिद्र्य रेषेखालील, मागासवर्गीय, बचत गट, महिला पुरुष असे एकूण 393 लाभार्थीची निवड करून त्यांना 3 टप्प्यात एकूण 45 देशी विकसित जातीचे 4 आठवडे वयाची कुक्कुट पक्षी 100% अनुदानावर वाटप करणे' या योजने अंतर्गत आज मौजे बोर्डा येथील 74 लाभार्थींना दुसरा व तिसरा टप्प्यातील सातपुडा या देशी जातीचे कुक्कुट पक्षी  एकूण  25 प्रति लाभार्थीस वाटप मा. *श्री श्रीनिवासजी मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.* सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय पुराणिक पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती गंग...

कुणबी कृती समितीची औरंगाबाद येथे मिटिंग यशस्वी संपन्न..

*कुणबी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांची औरंगाबाद येथील मिटिंग यशस्वी संपन्न..* *समाजिक संघटनांचे फेडरेशन लवकरच  अस्तित्वात येणार..* औरंगाबाद: एक समाज एक विचार, एक विझन, एक फेडरेशन निर्माण व्हावे म्हणून “ महाराष्ट्र राज्य कृती समितीचे गठन तीन वर्षापूर्वी गोंदिया येथे करण्यात आले. आजमितीस कृती समितीचे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य सुरु असून कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश अशा विविध विभागातील सामाजिक संघटना एकत्रितपणे कार्यरत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जनजागृती तसेच राज्यभरातील सर्व संघटना एकत्र येवून वैचारिक परिवर्तन करावे तसेच शैक्षणिक, आर्थिक, उद्योग व्यवसाय मध्ये प्रगती साधावी म्हणून कृती समितीचे गठन करण्यात आले आहे. गेली तीन वर्ष सातत्याने समितीच्या वैचारिक मिटिंग होत असून  *रविवार दि. ९ जून २०१९ रोजी, पालखी हॉटेल, सिडको, औरंगाबाद येथे पार पडली. मिटींगला समितीचे सदस्य अँड. राम कुऱ्हाडे आणि सहकारी यांनी सदर मिटिंगचे आयोजन केले होते.*  मिटिंगसाठी संतोष भाऊ दिंडे , योगेश चव्हाण सर,  प्रा .घोडके सर, कुमार सुरवसे, भागवत घाटे, शेषनारायण जण्ढे, ...

शिंदे कुटुंबातील मुलगी व नात ठार तर जावई अत्यावस्थ :गेवराई जवळील माळवा पाटीजवळ अपघात (नांदेड प्रतिनिधी रियाज आत्तार)

नांदेड रियाज आत्तार) महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. विश्वांभर शिंदे हारबळकर यांची जेष्ठ कन्या सौ. मनिषा ज्ञानेश्वर जाधव (३५) रा.पुर्णा, कु. लावन्या ज्ञानेश्वर जाधव, बोलेरो गाडीने त्यांच्या टाटा कंपणीच्या कार वर (MH 14- P 8639) आदळल्याने कार खड्यात जाऊन पेट घेतली त्यात सौ.मनिषाचा जागेवरच कोळसा झाला तर कु. लावण्या उपचारादरम्यान मरण पावली तर जावई ज्ञानेश्वर शंकरराव जाधव हे अत्यावस्थ असून औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत.       महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. विश्वांभर शिंदे हारबळकर यांनी आपली जेष्ठ कन्या मनिषाचा विवाह पुर्णा येथील ज्ञानेश्वर जाधव यांच्याशी केला होता. ज्ञानेश्वर यांचे वडील परभणी येथे न्यायालयात तर आई आरोग्य खात्यात नौकरीला असल्याने ते परभणी स्थाईक झाले होते. ज्ञानेश्वरचा लहान भाऊ प्रसाद जाधव यांचा विवाह असल्यामुळे पुणे येथे कंपणीत नौकरी ला असलेला ज्ञानेश्वर परभणी येथे आपल्या कुटुंबासह आला होता. १६ मे च्या लग्नानंतर १८ चे रिसेप्शन आटोपून दि. २१ मे रोजी ज्ञानेश्वरचे कुटुंब पुण्याकडे निघाले होते. गेवराई जवळील माळवा ...

राज्य राखीव पोलीस बलाकडुन आंबेडकर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी...

मुंबई, (प्रतिनिधी) :  भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त  राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे रविवारी ( ता.14) विवीध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाली. सकाळी दहा वाजता तथागत भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक वंदना करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संपत कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समादेशक सहाय्यक श्री पी. एस. कदम साहेब, श्री एल.एस.आतकरी ( सहायक समादेशक) निवृत्त पोलीस निरीक्षक मधुकर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता भव्य दिव्य मिरवणुक संपन्न झाली.यामध्ये साई स्वर महिला लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भोजनाच्या कार्यक्रमानंतर पवई डान्स किलर्स ग्रुपच्या वतीने भीम गीत, लोकगीत व समाज प्रबोधनात्मक विवीध संगीतमय ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय रायबोले यांनी केले तर आभार सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास पवार यांनी केले. ...