महासंवाद वेब वाहिनी मृत्यूची चौकशी करण्याची मागणी परभणी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे १२ सप्टेंबर २0१५रोजी फेरोज खॉ मो. इकबाल खॉ यांचा अचानक मृत्यू झाला होता. झालेल्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेऊन संबंधित दोषीला शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मो. इकबाल इब्राहीम खॉ यांनी निवेदनाद्वारे गुहागर पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. गुहागर येथे फेरोज खॉ मो. इकबाल खॉ (वय ३८) हे त्यांच्या पत्नीसोबत सप्टेंबर २0१५ मध्ये वास्तव्यास होते. १२ सप्टेंबर रोजी फेरोज खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांची पत्नी नसरीन निखत अ.मजीद कुरेशी हिने मो.इकबाल खॉ यांना कळविली. या घटनेनंतर रत्नागिरी येथून फेरोज खॉ यांचे पार्थिव परभणीत आणण्यात आले. परभणी येथे कब्रस्तानमध्ये दफन विधी करण्यात आला. या घटनेनंतर मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत्यूनंतर शवविच्छेदनही करु दिले नाही. त्यामुळे या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. सदरील मृत्यूची सखोल चौकशी करुन दोषीला शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे