*एक मोठी बातमी:-* *वाघाची शिकार करणारी टोळीचा पर्दाफास* *(आठ आरोपींना अटक, शिकारी केलेल्या वाघाचे अवशेष हस्तगत)* *चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे* ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र भुज, नियतक्षेत्र मुडझा मधील कक्ष क्र. 1179(pf) मध्ये वाघांची शिकार केल्याची घटना उघडकीस आली.असून त्यात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करून आरोपींना गजाआड करण्यात आले. सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, दिनांक 11/01/2020 रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास वाघ मृतावस्थेत असल्याचे काही गावातील महिलांना निदर्शनास आले असता वनविभागास माहिती दिली.तेव्हा गावातील महिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुडझा नियतक्षेत्रात कक्ष क्र.1179(pf) येथे वाघ याचे शव सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान या वनविभागास प्राप्त झाले. माहिती प्राप्त होताच वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, AIG NTCA श्री. हेमंत कामडी आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी श्री. विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रम्हपुरी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.तेव्हा प्राथमिक निरिक्षणानुसार घटनास्थळी असे निदर्...