राणीसावरगाव ,(प्रतिनिधी ), शासनाकडून अपंग कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात परंतु अनेक योजना राबविणारे अधिकारीच मनमानी कारभार चालवीत असल्यामुळेच या योजना कागदावरच राहतात.याचे उदाहरण म्हणून राणीसावरगाव येथील अपंग नागरिक रोहीदास भिमराव जाधव यांनी अपंग कल्याण मंडळाकडुन बीज भांडवल योजने अंतर्गत व्यवसायासाठी कर्ज मिळविण्यासाठी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे प्रस्ताव तयार केल्यानुसार सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज मंजुर झाले .त्यात अपंग कल्याण मंडळाकडुन वीस टक्के अनुदानाचा हप्ता बँकेला पाठवला असून एक लाख रुपयांचा बोजा रोहीदास जाधव यांच्या घराच्या मालमत्तेवर नोंद करून त्याची प्रत बँकेला सादर करण्यात आल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाचा हप्ता मागीतला असता केवळ वीस टक्के अनुदानाची रक्कम मिळेल असे सांगुन बँकेचे शाखाधिकारी यांनी तुला कर्ज मिळणार नाही असे सांगत बँकेतून हाकलुन दिले असल्याने मला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची रक्कम मिळत नसल्यामुळे मला न्याय मिळवून द्यावा अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना देण्यात आली आहे.