मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

स्वगृही परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सूचना जारी

 : लॉकडाउनमध्ये विविध राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय विद्यार्थी, मजूर, भाविकांसह अन्य लोकांचा घरी जाण्याचा मार्ग केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी मोकळा केला आहे. राज्यांनी मार्गदर्शक तत्वे निश्चित करुनच अशा लोकांना घराकडे पाठवावे असे आदेशित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने 13 कलमी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. याची अंमजबजावणीचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. आदेशात म्हटल्याप्रमाणे, गृहमंत्रालयाने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून निर्देश देण्यात येत आहेत. त्यानुसार लॉकडाउनमध्ये विविध राज्यात अडकून पडलेल्या व्यक्तींना स्वगृही पाठविण्यासाठी अथवा राज्यात आणण्यासाठी राज्यस्तरावर अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती एडजेस कुंदन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे राज्य संचालक अभय यावलकर हे नियंत्रक म्हणून काम पाहतील. त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील. जिल्ह्यांचे नोडल अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी त...

लॉकडाऊनच्या काळात दिव्यागांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचे वाटप

 : शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी  विविध प्रकारच्या  मदतीला धावून जात आहे. भोकर नगरपरिषदेच्या मार्फत अनुदान देण्याबाबत आदेश  शासन स्तरावर दिले आहेत. याचाच भाग म्हणून शहराच्या हद्दीतील 174  दिव्यांगांना नगरपरिषद भोकरच्यावतीने वर्ष 2020-21 या चालु वर्षातील दिव्यांग व्यक्तींना निधीचे वाटप केले. 174 पैकी 104 लाभार्थीना बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आले. उर्वरितरित ज्या लाभार्थीकडे बँक खाते नाही अश्या 70 लाभार्थी ना घरपोच धनादेश प्रत्येकी 2 हजार रूपये  प्रमाणे असे एकुण तीन लाख 48 हजार रुपये दिव्यांग व्यक्तींना देण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे त्यांच्या घरी जावुन सोशल डिस्टन्सींगचा वापर करित अनुदान वाटप केले. यासाठी नगरअध्यक्षा सौ. संगीता विनोद चिचांळकर, उपनगरअध्यक्षा जरीना बेगम शेख युसुफ, विनोद पाटील चिचांळकर, मुख्याधिकारी प्रीयंका ठोंगे, सामाजीक कार्यकर्ते शेख युसुफ  यांच्यासह सुनील कल्याणकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रकाश तोटलू कार्यालय अधीक्षक, अविनाश पेंडकर प्रशासकीय अधिकारी, रामसिंह लोध लेखापाल, कमलाकर भगत समुदाय संघटक, साहेब...

महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे?- प्रा. हरी नरके

साली मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकले. सनातन प्रभातमध्ये बातमी आली की महात्मा फुले हे देशद्रोही होते असे भिडे म्हणाले. ही मुक्ताफळे प्रकाशित झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो. ओबीसी म्हणजे तमाम थंड आणि बत्थड लोक. कोणाचीच काहीही प्रतिक्रिया दिसली नाही. त्याच दिवशी मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकरांचा निवृत्तीसमारंभ होता.त्यांनी आग्रहाने बोलावले म्हणून मी गेलो. पुण्याच्या अल्पबचत भवनमध्ये निरोप समारंभ होता. कार्यक्रमाला त्यावेळचे शिक्षण मंत्री वसंत पुरके, [काँग्रेस] राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, [राष्ट्रवादी] भाजपाचे पांडुरंग फुंडकर, आय.पी.एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील असे अनेक दिग्गज मंचावर उपस्थित होते. माझ्या भाषणात मी मनोहर भिड्यांच्या महात्मा फुले विषयक संतापजनक वक्तव्याचा ती बातमी सर्वांना दाखवून जाहीर निषेध केला. मात्र निरोपाच्या जल्लोशात त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या मूडमध्ये कोणीही नव्हते. मी नंतरही अनेकांशी बोललो. उपयोग झाला नाही. एकहाती लिहित राहिलो. बोलत सुटलो. ज्यांच्या विरोधात बोलत-लिहित होतो त्या भिड्यांनी मात्र खुन्नस ठेवली बहु...

प्रयोगशाळा असलेले स्वारातीम हे भारतातील पहिले विद्यापीठ- पालकमंत्री अशोक चव्हाण

: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनलअॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यांनी दि.२९ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोणत्याही प्रयोगशाळेसाठी...

न्या.दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

न्या. दीपांकर दत्ता  यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ #मुंबई, दि. २८ | कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. मंगळवारी सायंकाळी (दि. २८) राजभवन येथे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी न्या. दीपांकर दत्ता  यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी न्या. दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. त्यानंतर राज्यपालांनी न्या. दत्ता यांना शपथ दिली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता राष्ट्रगीताने झाली. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) ठेवण्यासह योग्य खबरदारी घेण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, अतिरि...

औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्यां नागरिकांनी केला पोलिसांवर हल्ला

औरंगाबाद {प्रतिनिधी }देशासह राज्यातही कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 95 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आली आहेत. असं असूनदेखील औरंगाबादमध्ये काही लोक नमाज पठणासाठी एकत्र आले होते. यावेळी नमाजासाठी एकत्र आलेल्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील 27 हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात 1 पोलीस आधिकारी, 2 कर्मचारी जखमी झाले आहेत.बिडकीन शहरातील संभाजीनगर मार्गावरील अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोकं धार्मिक स्थळी सामुहिक नमाद पठणासाठी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

शिवसेनेने सामनातून मोदी सरकार वर हल्लाबोल,..मोदींचा घेतला समाचार

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि साखळी मोडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आता या निर्णयाला महिना होत आला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्याला मदतीची गरज आहे. मात्र, ही मदत करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकट गडद होत आहे. असे असताना काटकसर करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. यात 'गावठी उपाय म्हणजे दात कोरुन देश चालविण्यासारखे आहे. अर्थव्यवस्थेचे कठोर उपाय म्हणजे जनतेच्याच आतड्यांना आणि खिशाला कात्री लावणे असेल, तर ते करण्यासाठी अर्थमंत्र्यांची गरज नसते,' असा हल्लाबोल शिवसेनेने आपल्या ' सामना'  या मुखपत्रातून केला आहे. देशातील सर्व अर्थमंत्र्यांशीही पंतप्रधान मोदी यांनी एकदा संवाद साधायला हवा. राज्यात काय स्थिती आहे, याचा आढावा घेणे गरजेचे आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या नावे एक नवा संदेश दिला आहे. लोकच कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत, असे सांगून मोदी यांनी लोकांचे कौतुक केले आहे. भारतातील प्रत्येक नागरिक सैनिक बून लढाईत उतरला असल्याचे मोदी सा...

भाजप नीती गुल शरद पवार पावरफुल; उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदे वरील मार्ग मोकळा होणार..!

भाजप नीती गुल शरद पवार पावरफुल; उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदे वरील मार्ग मोकळा होणार..! मुंबई {प्रतिनिधी} राज्यावर करण्याचे महासंकट उभे टाकले आहे या संकटास तोंड देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद जाईल की राहील अशी राजकीय चर्चा रंगली आहे याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही तर महा विकास आघाडी सरकार नवीन पावले उचलण्याच्या तयारीत आहे यापूर्वी 9 एप्रिल राजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबत ठराव मंजूर झाला होता मात्र उपमुख्यमंत्रीपद ही वैधानिक पद नसल्याचे कारण पुढे करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा ठराव ग्राह्य धरण्यास नकार दिला होता राज्य मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्र्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीत राज्यातील कोरोना संदर्भात आढावा तसेच संचारबंदी बाबत पुढे काय करणार यावर चर्चा होणार आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त...

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा !

मुंबई |  पालघरमध्ये मॉब लिंचिंगची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे, पालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे, त्यामुळे या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. सुशील गिरी महाराज, जयेश आणि नरेश येलगडे हे तिघे एका व्हॅनमधून सूरतमध्ये कुण्या एका व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी जात होते. या तिघांपैकी एक जण कार चालवत होता. शेकडो ग्रामस्थांनी हल्ला केला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक गावकऱ्यांनी चोर समजून या तिघांची गाडी थांबविली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.

पालघरमध्ये मॉब लिंचींग ; तीन महाराजांची हत्या

पालघरमधील मॉब लिचिंगची घटना धक्कादायक आणि अमानवी आहे.  या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला कारणीभूत असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे आज केली आहे.पुणे/पालघर - पालघरमधील मॉब लिचिंगची घटना धक्कादायक आणि अमानवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला कारणीभूत असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे आज केली आहे.चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री गडचिंचले येथे इक्कोने प्रवास करणाऱ्या तीन प्रवाश्यांची दगड, कोयते, कुऱ्हाडीने वार करून  हत्या केल्याप्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्या करतेवेळी जमावात असलेले  काही आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .घटनास्थळी गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर ही जमवान...