मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

माझ्या शेतातून जायचं नाही, मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवली, अंत्यसंस्कार दिवसभर रखडले

  रस्ता नाही म्हणून गरोदर मातेला जीव गमवावा लागला, ही घटना ताजी असतानाच इगतपुरीत शेतातून मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार दिवसभर रखडले. नाशिक  : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. शेतातून मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार दिवसभर रखडले. इगतपुरी तालुक्यात रस्त्याअभावी गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रस्ता नसल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार करण्यास विलंब झाला. टाके घोटी येथील आदिवासी कातकरी पाड्यावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. त्यामुळे त्या वाडीतील नागरिक एका शेतकर्‍याचा शेतातील पायवाटेने ये-जा करत असतात. कातकरी पाड्यावरील वस्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत न्यायला एकमेव पायवाटेने शेतातून जात असतांना संबंधित मालकाने इथून मृतदेह नेऊ नका असे सांगत मज्जाव केला. म्हणून हा अंत्यविधी दिवसभर रखडला. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर आणि इगतपुरी पोलीस यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंद

Imtiaz Jalil News : ठेवीदारांनो सहकारी बॅंका, सोसायट्यांमधील तुमचे पैसे काढून घ्या..

Marathwada : छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श सहकारी पतसंस्थेत झालेल्या दोनशे कोटींहून अधिकच्या घोटाळ्यात ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहिलेले एमआयएमचे खासदार (Imtiaz Jalil News) इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांना आवाहन केले आहे. कोट्यावधींचा घोटाळा करून सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा गिळंकृत करणाऱ्या घोटाळेबाजांच्या पाठीशी भ्रष्ट व्यवस्था उभी आहे. (Marathwada) त्यामुळे तुमचा पैसा सहकारी बॅंका, सोसायट्यांमध्ये सुरक्षित नाही. खूप उशीर होण्याआधीच आपले सर्व पैसे सहकारी बॅंका, पतसंस्थांमधून काढून घ्या, असे आवाहन (Imtiaz Jalil) इम्तियाज यांनी केले आहे. एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा हवाला देत त्यांनी ठेवीदारांना हे आवाहन केले आहे. मराठवाड्यातील दहा आणि राज्यातील तब्बल १०३ सहकारी बॅंका या आरबीआयच्या रडारवर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बॅंकावर कधीही कारवाई केली जावू शकते. असे झाले तर सर्वसामान्यांच्या कोट्यावधींच्या ठेवी अडचणीत येणार आहेत. (Scams) या पार्श्वभूमीवर इम्तियाज यांनी ठेवीदारांना आवाहन केले आहे. खूप उशीर होण्यापूर्वी फसवणूक झालेल्या सहकारी बँका आणि सोसायट्यांमधून तुमचे सर्व पैस

रामोजी पब्लिक स्कूल येथे डॉक्टर डे साजरा.

कौठा परिसरातील रामोजी पब्लिक स्कूलच्या वतीने दिनांक १ जुलै हा जागतिक डॉक्टर ' डे  दिनानिमित्याने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रसिद्घ बालरोग  तज्ञ डॉ.श्रीराम श्रीरामे, डॉ.महेश काबरा,डॉ. किरण मंडले, डॉ.होमिला परे, यांचा सत्कार करून डॉक्टर डे ' साजरा करण्यात आला. या जागतीक डॉक्टर डे' निमित्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. श्रीराम श्रीरामे, यांनी मागील वर्षात आलेल्या कोरोना महामारी मुळे अनेकांना त्रास झाला.तो त्रास केवळ आपण अरोग्याची काळजी  न घेतल्याने उदभवला होता. प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्यानी आपल्या अरोग्याची  काळजी घेताना आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.त्या मुळे अनेक जंतू आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरातील विषानु  वाढवू शकतात.त्यासाठी जेवणापूर्वी हात पाय स्वच्छ  धुवावे-सकस आहार घेतला पाहिजे.आहारात पाले भाज्या कडधान्य,दूध ,दही यासारखे व्हीटामीन देणारे अन्न सेवन केले तर आपले आरोग्य सुदृढ राहील असेही ते म्हणाले यावेळी अनेक विध्यार्थ्यांच्या आरोग्या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे  मुख्याध्यापक व.संचालक ड

महाविकास आघाडीत MIM देखील सामील होणार?

औरंगाबाद : राज्यात भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून, यासंबधीचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नुकतेच केले होते. मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षाला महाविकास आघाडीत सामिल करण्याबाबत चर्चा होत आहे,राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसेच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामिल करण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एमआयएमचा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात येणार आहे. 

राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करा - उद्योजक महादेव मुसळे

राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करा - उद्योजक महादेव मुसळे राणीसावरगाव (प्रतिनिधी) गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन उद्योजक महादेव मुसळे यांनी केली आहे राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत गौळवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजक महादेव मुसळे यांनी पुढाकार घेतला असून यापुढे गावाच्या विकासासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देणार असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण व इतर समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेनंतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिले असल्याचे उद्योजक महादेव मुसळे यांनी सांगितले आहे त्यांच्यासमवेत युवा नेते शिवाजी दहीफळे उपस्थित होते

भूमिपुत्रांना गावाकडे पाठवा ; 'या' आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : "शहरात अडकलेल्या भूमिपुत्रांना गावाकडे पाठविण्याची सोय करावी," अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. "पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह राज्याच्या विविध भागातील कष्टकरी  गेले दोन महिने मुंबई व विविध शहरांमध्ये अडकून पडले आहेत. प्रसारमाध्यमांतून टाहो फोडून आपल्याला गावी जायच आहे, अशी हाक मारत आहेत. पण जगभरातील आणि देशभरातील लोकांची आणण्याची सोय करताना महाराष्ट्र सरकारने आपल्याच राज्यातील भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना तातडीने गावी पाठवण्याची व्यवस्था सरकारने करावी. येत्या आठवड्याभरात सरकारने या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईसह राज्यभर रयत क्रांती संघटनेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल," असा इशारा आमदार खोत यांनी दिला आहे."शेती परवडत नाही म्हणून शेतकरी कुटुंबातील मुले पुणे, मुंबई व विविध शहरांमध्ये आली. आपल्या कष्टाने त्यांनी शहराच्या आणि राज्याच्या प्रगतीत हातभार लावला. कोरोनामुळे आज ते शहरात अडकले आहेत. खरेतर लॅाकडाउन झाल्यानंतर सरका

धक्कादायक! लग्न लावाय गेले क्वारंटाईन झाले ; नवरीच कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील मंडीदीपच्या सतलापूनमध्ये एक नवविवाहितेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नववधूला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नववधूने लग्नाआधी ताप आला म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, लग्नानंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नववधूला थेट भोपाळच्या एम्समध्ये तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.तसेच लग्नसोहळ्याला उपस्थित असलेले दोन्ही पक्षाकडील कुटुंबीय, पाहुणे आणि लग्न लावणाऱ्या भटजीसह ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील ही घटना आहे. हा लग्नसोहळा १८ मे रोजी सतलापूरमध्ये पार पडला. तरही  तरुणी भैपाळच्या जाटखेडीमध्ये राहते.

रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रावर अन्याय करतंय; सत्यजित तांबे यांचा आरोप

मुंबई  : कर्नाटकमध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर रेल्वे महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या मागणी इतक्या श्रमिक स्पेशल ट्रेन उपलब्ध करुन दिल्या नाहीत. गुजरातला मात्र महाराष्ट्राच्या तीन ते चार पट ट्रेन उपलब्ध करुन दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाय महाराष्ट्रात लोकल सुरु करण्याच्या मागणीबाबत रेल्वे काही ठोस भूमिका घेत नाहीय. राज्यांतर्गत रेल्वेही सुरु करत नाही हे सगळं एक षडयंत्रच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज कर्नाटकमध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला रेल्वे बोर्डानं परवानगी दिली. कर्नाटकमध्ये बंगळुरु ते म्हैसूर, बंगळुरू ते बेळगाव अशा दोन ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे राज्यांतर्गत ट्रेन सुरु करायला परवानगी मिळालेलं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरतंय. महाराष्ट्रात स्थलांतिरत मजुरांची संख्या सर्वाधिक आहे, अशावेळी महाराष्ट्रातही अशा ट्रेन सुरु होण्याची गरज व्यक्त होत आहे. पंतप्रधानांसोबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत मुंबईत अत्या

एखाद्याची पातळी फार खालची असते, तिथपर्यंत आपण जायचं नाही :- जयंत पाटील

मुंबई |  राज्यातील साखर उद्योगांना वाचविण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रानंतर माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटरवर मोठे शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश राणेंकडून अत्यंत टोकाच्या भाषेत होत असलेली टीका लक्षात घेता या वादाला आता वेगळंच वळण लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता रोहित पवारांना ‘हा’ नाद सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. “एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नाही. काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यायचा”, असा सल्ला जयंत पाटील यांनी रोहित पवारांना दिला आहे. “आपण आपली पातळी किती खाली न्यायची ? हे आपल्यावर आहे. एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नाही. आपण काही वेळाने अशा लोकांचा नादच सोडून द्यावा. आपणच कुणाच्या किती तोंडाला लागायचं याची एक मर्यादा ठरवायची असते. त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. रोहित पवार अशांकडे दुर्लक्ष करतील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे”, अशी प्रतिक

भाजपचा आमदार म्हणून माझ्यावर गुन्हा..

औरंगाबादः लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक जेव्हा केव्हा संकटात असतील तेव्हा त्याच्या मदतीला धावून जाणे हा जर गुन्हा असेल, तर तो माझ्या हातून वारंवार घडले, मग माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तर मला त्याची पर्वा नाही. जिल्ह्यातील अनेक नेते क्वारंटाईन असलेल्यांना सोबत घेऊन फिरतात, पण त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. पण मी भाजपचा, विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे माझ्यावर मात्र गुन्हा दाखल केला जातो, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल मत व्यक्त केले.संचारबंदी आदेश असतांना सुरेश धस आष्टी तालुक्यातील कंटोनमेंट झोनमध्ये जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत होते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज दुपारी त्यांच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुणी तरी आपल्या विरोधात प्रतिष्ठा पणाला लावून गुन्हे दाखल करायला लावत असल्याचा आरोप केल्यानंतर धस यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.धस म्हणाले, आधी ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावून गेलो म्हणून