बाप संघटनेकडून महिलांना शिलाई मशीनचे वाटप होणार. ..! पाडव्याच्या मुहुर्तावर शेतकरी मेळावा .... राणीसावरगाव( प्रतिनिधी) : दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र पाहून शेतकरी, शेतमजुरांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या बळीराजा अधिकार परिषदेच्या वतीने येथील माळरानावर असलेल्या बळीराजा कृषी शिवारात (दि.6 एप्रिल2019) रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहेत.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराजा अधिकार परिषद (बाप) संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव गुट्टे हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहून म्हणून प्रशासनातील अधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे ग्रामीण विकासासाठी लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन केले. राणीसावरगाव परिसरातील सुमारे 18 गावातील गरजु, शिक्षित, गोरगरीब महिलांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी मदतीचा हात म्हणून मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहेत.