मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राणीसवरगावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी राणीसावरगाव, (प्रतिनिधी) : येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी कुळवाडी भुषण , रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची 290 वी जयंती बुधवार( दि.19) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.सार्वजनिक जयंती मंडळाकडून शिवजन्मोत्सवानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आर्धाकृती पुतळ्याचे पुजन करून सर्व समाजातील नागरिकांकडून अभिवादन करण्यात आले.यावेळी अभिवादन कार्यक्रमासाठी दगडुआप्पा धुळे,ज्ञानेश्वर जाधव,दत्ता जाधव, सय्यद अल्ताफ, सपोनि राजकुमार पुजारी,किशनराव वळसंगीकर, नारायण जाधव, मधुकर जाधव,सरपंच सुरेश चव्हाण, धनंजय जाधव,मधुकर जाधव,नारायण जाधव,सय्यद अल्ताफ, हंसराज जाधव, रमेश तांबरे,भूषण गळाकाटु,डॉ.परशुराम शिंदे, उत्तम जाधव, भाऊ मकापले, प्रकाशराव गळाकाटु, गोविंद जाधव, बाळासाहेब भिमानपल्लेवार,भारत जाधव, कल्याण जाधव, बाळू पांडे,परशराम जाधव, सदा जाधव,धनंजय जाधव,रमेश महामुने,भगवान शिंदे,शिवाजी जाधव,नागेश जाधव,संतोष डोणे, गजू ठाकूर,संदीप निटूरे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्...

आपुलकीने वागणारा जगातील एकमेव राजा..छत्रपती शिवाजी महाराज (संजय रायबोले यांचा विशेष लेख)

आपुलकीने वागणारा जगातील एकमेव राजा..छत्रपती शिवाजी महाराज       जगाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले.परंतू लोकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान सन्माननीय आणि प्रेरणादायी कायमच आहे. परंपरेने राजा होता येते हे ठाऊक असलेल्या लोकांच्या मनात स्वराज्याची संकल्पना कोणताच राजा रुजवू शकला नाही.  म्हणुनच शिवरायांचा इतिहास अद्धितीय असा आहे. त्या काळात मोगलशाही व अदिलशाही विरुद्ध संघर्ष करून मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्यासाठी हसत हसत मरायला तयार होणारे शुरवीर सैनिक फक्त शिवरायांच्या सैन्यात होते.कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यातील प्रत्येक सैनिकांना आपुलकीने वागवीत, जातीभेद नष्ट करून सर्व स्तरातील मावळे त्यांनी स्वराज्याच्या कामी जोडले होते. वर्णभेदाने ठरविलेल्या खालच्या जातीतील अस्पृश्य ,बारा बलुतेदार, आलुतेदार अशा आठरा पगड जातीच्या  माणसाला दुर न ठेवता हातात तलवारी देऊन खांद्याला खांदा लाऊन वागविणारा राजा म्हणुन त्यांची बहुजन समाजाला आजही ओळख आहे. श...

राणीसावरगावकरांकडून कलागुणांना दाद देत केले विद्यार्थ्यांचे कौतुक (व्हिडीओ जर्नालिस्ट नामदेव गुंडेवाड)

गावकऱ्यांकडून कलागुणांना दाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक.. ---------------^^^^--------------- राणीसवरगाव (प्रतिनिधी) श्री संगमेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था राणीसावरगाव द्वारा संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कूल व उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज बाल कला महोत्सव 2020 तीर्थ कल्लोल परिसरात सोमवार ( दि.9) रोजी थाटात संपन्न झाला.यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ,हिंदी, मराठी लोकगीते , शेतकरी आत्महत्येवर आधारित व छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत देखावा व चित्तथरारक कवायतीचे सादरीकरण करून उपस्थित राणीसावरगावकरांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज बालकला महोत्सवाचे उद्घाटन मराठी व हिंदी चित्रपटातील  सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुरेश गंगाधरराव चव्हाण (सरपंच राणीसावरगाव) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीर पाटील साहेब (उप विभागीय अधिकारी गंगाखेड) श्री नीलपत्रेवार साहेब (गटशिक्षणाधिकारी गंगाखेड) श्रीनिवास मुंडे (जि.प सदस्य परभणी) दत्‍तराव जाधव,मधुकर ...

सेवालाल महाराजांचे विचार सर्वसामान्य जनतेकडून पोहोचवावेत : प्रा.निलाकांत जाधव

सेवालाल महाराजांचे विचार सर्वसामान्य जनतेकडून पोहोचवावेत : प्रा.निलाकांत जाधव क्रांतिकारी संत सद्गुरू सेवालाल महाराज यांचा 15 फेब्रुवारी हा जन्म दिवस मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करून त्यांची कामगिरी आचार-विचार अमर बोल तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत असे आव्हान गोर समाजाचे नेते प्रा.नीलाकांत जाधव यांनी केले आहे क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांची जयंती प्रतिवर्षी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग शासन आदेश क्रमांक 22/19 पर.क्र.71/29 च्या परिपत्रकानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय कार्यालय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्या संदर्भात आदेशित केले आहे ही संत महंत सद्गुरु महात्मा महापुरुषांची महान भूमी आहे या भारत भूमीत थोर शूरवीर राजा-महाराजा आणि क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत या थोर महापुरुषांनी अलौकिक कार्य करून समाजा सोबत देश सेवा केलेली आहे. हा इतिहास आहे यात काही इतिहासकरांनी दखल घेतली तर काहींना दखल पात्र असून जाणून-बुजून बेदखल केले गेलेले आहे समाजविघातक शक्तींकडून ज्यावेळेस समाज विकृतीकडे आणि विनाशाकडे नेण्यात आला त्यावेळी...

हिरकणीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अलोट गर्दी. ...! सैराट फेम प्रदिप यांच्या कडुन विद्यार्थ्यांचे कौतुक ..

हिरकणीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अलोट गर्दी. ...! सैराट फेम प्रदिप यांच्या कडुन विद्यार्थ्यांचे कौतुक ..  हिरकणी सीबीएसई स्कूल चोरवड येथे बाल ऊर्जा महोत्सव रविवारी (ता. 9)रोजी थाटात संपन्न झाला. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ,हिंदी, मराठी लोकगीते , शेतकरी आत्महत्येवर आधारित व छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत देखावा व चित्तथरारक कवायतीचे सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.हिरकणीच्या बालकला महोत्सवाचे उद्घाटन खासदार बंडू ऊर्फ  संजय जाधव व सैराट चित्रपटातील सिनेअभिनेते प्रदिप गळगुंडे ऊर्फ लंगड्या यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देवकते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बंडू जाधव, भास्कर काळे, संजय रायबोले,संतोष डोणे,प्रा.माऊली मुंडे ,संदीप कांबळे, नागोराव लवटे, संस्थापक सचिव अशोकराव लवटे आदी  मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांकडून लोकगीत, देशभक्तीपर, समाजप्रबोधनपर गीते सादर करून एक वेगळाच संदेश देण्याचे काम चिमुकल्यांनी केल्यामुळे मान्यवरांकडुन शाळेचे संचालक लवटे या...

होळकर महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी वार्षिकस्नेहसमेलन गाजले

राणीसावरगाव (प्रतिनिधी):-  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात विविध कार्यक्रमानी यंदाचे वार्षिकस्नेहसंमेलन गाजले आहे. यंदा झिंग झिंग झिंगाट, वाढीव दिसता राव इत्यांदी गाण्यांनी विद्याथ्र्यांना मंत्रमुग्ध केले.  वार्षिकस्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. उत्तम देवकते यांची उपस्थिती होती. तर उदघाटक म्हणुन माजी प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर तर मुख्याध्यापक रोडे, पोलिस अधिकारी दतात्रय कानगुले यांची उपस्थिती होती. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विजयी विद्याथ्र्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. प्रसिध्द गजलकार अरंविद सगर यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सगर यांच्या सखे पाहून गेल्यावर, तुला भेटून  गेल्यावर’ या गिताला तरूनांनी उत्स्फूर्त शब्द दिली.  हैद्राबाद बिर्याणी या गाण्यावर प्रतिक कांबळे, अबुसिध्दिकी तांबोळी, चैतन कवडे, अमोल राठोड यांनी नृत्य केले. झिंग झिंग झिगाट यावर दिपाली हाके, अंकिता हाके, समिक्षा मेकाले, पिंगाग पोरी पिंगा या गाण्यावर पुनम धुळगुंडे, पुनम हाक...

चक्क डोळ्यावर पटी बांधून वाचते कोणतेही पुस्तक

अदभूत अविश्वसनीय ,अकल्पनीय :चक्क डोळ्यावर पटी बांधून वाचते कोणतेही पुस्तक कर्तत्वान कन्यांचा भव्य सत्कार : राणीसावरगावकरांनी पाहिला एक दिवसाचा मुख्यमंत्री ग्लोबल व स्कालर अकादमीच्या वतीने आयोजित कर्तत्वान कन्यांचा भव्य सत्कार व प्रगट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिपळदरी पोलीस स्टेशनचे साहायक पोलीस निरीक्षक श्री.राजकुमार पुजारी हे होते तर उदघाटक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ विष्णू माने होते .प्रमुख पाहुणे सुरेश घोणे ,संतोष एकाळे,सूर्यवंशी सर ,वाघमारे सर ,इसाद नगरीचे सरपंच भालेराव ,सातपुते सर , नागेश डोंगरे ,सौ .नंदा घोणे उपस्थित होते . सदरील कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजन व दीपप्रवजळणाने झाली .यात मै भी नायक या स्पर्धेतून राजस्थानचा एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळालेल्या कु.मंजुश्री सुरेश घोणे चा प्रवास प्रगट मुलाखतीत घेण्यात आला .अतिशय गरीब कुटूंबातील मंजुश्रीने वकृत्वाच्या जोरावर मिळवलेलं पद सर्वाना प्रेरणा देणारा होता .तर मुखेड येथील १२ वर्षाची मुलगी कु.नंदिनी संतोष एकाळे चक्क डोळ्यावर पटी बांधून कोणतेही पुस्तक अच...