यादव महात्मे निवडणूक लढवणार :- * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कलचा विकास म्हणावा तसा झाला नाही आपण खुर्चीसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी निवडणूक लढवणार असल्याचे मत मनसेचे नेते यादव महात्मे यांनी व्यक्त केले आहे. राणीसावरगाव सर्कलचा सर्वागीण विकास करण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे मी एक शेतकर्याचा मुलगा आहे मला गरीबीची जाण आहे .म्हणून मी जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे .राणीसावरगाव सर्कलचा विकास करण्यासाठी जनतेने संधी द्यावी असे मत मनसेचे यादव महात्मे यांनी व्यक्त केले आहे. राणीसावरगाव जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात यादव महात्मे पिंपळदरीकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने उतरणार आहेत.