पुणे : "शहरात अडकलेल्या भूमिपुत्रांना गावाकडे पाठविण्याची सोय करावी," अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. "पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह राज्याच्या विविध भागातील कष्टकरी गेले दोन महिने मुंबई व विविध शहरांमध्ये अडकून पडले आहेत. प्रसारमाध्यमांतून टाहो फोडून आपल्याला गावी जायच आहे, अशी हाक मारत आहेत. पण जगभरातील आणि देशभरातील लोकांची आणण्याची सोय करताना महाराष्ट्र सरकारने आपल्याच राज्यातील भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना तातडीने गावी पाठवण्याची व्यवस्था सरकारने करावी. येत्या आठवड्याभरात सरकारने या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईसह राज्यभर रयत क्रांती संघटनेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल," असा इशारा आमदार खोत यांनी दिला आहे."शेती परवडत नाही म्हणून शेतकरी कुटुंबातील मुले पुणे, मुंबई व विविध शहरांमध्ये आली. आपल्या कष्टाने त्यांनी शहराच्या आणि राज्याच्या प्रगतीत हातभार लावला. कोरोनामुळे आज ते शहरात अडकले आहेत. खरेतर लॅाकडाउन झाल्यानंतर सरका...