मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन

वसंतराव नाईक याच्या जयंती महोत्सवाचे आयोजन राणीसावरगाव(प्रतिनिधी) राणी सावरगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक नाईक यांच्या 105 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन दिनांक 22 जुलै रोजी करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोमनाथ कुदमुळे तर उद्घाटक म्हणून देविदास राठोड हे उपस्थित राहणार आहेत वरील कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जि.प अध्यक्षा उज्ज्वला राठोड,खासदार संजय जाधव,आमदार मधुसूदन केंद्रे, संतोष मुरकुटे,सिताराम राठोड, दत्तराव जाधव,ज्ञानेश्वर जाधव,बाबुराव पवार,मैनोदीन तांबोळी,कांतराव चव्हाण,लखन राठोड,संदीप राठोड,साधना राठोड,स्वप्निल राठोड,सपोनि अविनाश खंडारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा जयंती सोहळा जिल्हा परिषद प्रशाला मैदानावर घेण्यात येणार असून सकाळी 11 वाजता हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दुपारी 1 वाजता गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध गायक सुनील चव्हाण यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राह...

शहर_औद्योगिक_वसाहतींच्या_भागातील मुली सैराट होण्याचे प्रकार वाढले

 शहर व परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्‍तींच्या यादीत मागील एका महिन्यात 27 जणांचा समावेश असून यात 16 तरूणीचा समावेश आहे. मागिल महिन्यात विविध पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदणीत तीन महिलांनी पलायन केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शहर तसेच औद्योगिक वसाहतींच्या भागात  घरातून कोणालाही न सांगता पलायन करणार्‍यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा विविध घटना घडण्यामागे त्या व्यक्‍तीची मनोविकृती तसेच आमिषाचे बळी अथवा विवाहपूर्व प्रेमसंबंध याबाबी कारणीभूत ठरत असतात, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. औरंगाबाद शहरात पाच ते सहा आद्योगीक क्षेत्र आहेत. त्यामध्ये वाळूज पंढरपूर सर्वात मोठे आहे. त्या ठिकाणी 50हून अधिक कंपन्या आहेत, त्यामुळे सहाजिकच मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर तर उत्‍तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरातसह आदी राज्यातील लोक येथे कामानिमित्‍त वास्तव्यास आहेत. बाहेरील राज्यातील लोक वाळूज पंढरपूर येथील औद्योगीक वसाहतील आपल्या कुटुंबासह राहतात. ते सरासरी अवजड काम कंपनीत करीत असतात. त्यामुळे असे कामगार आपल्या ...

काय पण प्राण्यांनादेखील पाणी प्यायला उपलब्ध नव्हतं.. महासंवाद

हिंगोली, 15 जुलैः  हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 50 ते 60 गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. आग ओकणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या गरमीत रामवाडी गावच्या जनतेने अथक मेहनत घेतली. पुर्ण रामवाडी गावाने पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा जिंकण्यासाठी घाम गाळला. यातही स्पर्धा जिंकण्यापेक्षा दुष्काळी गावात पाणी येणार ही भावना जास्त प्रखर होती. त्यांच्या कष्टावर वरुण देवता प्रसन्न झाला आणि पाहता पाहता हे गाव सुजलाम सुफलाम झाले.गावातले तलाव आता तुडूंब भरून वाहत आहेत. आधी पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक मैल चालत जावं लागायचं. पण आता मात्र कपडे धुण्यासाठीही गावाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. मागील वर्षी पाणी नसल्याने रब्बी हंगाम घेता आला नव्हता.. खरीप पिकानंतर कोणतंही पीक घेणं शक्य नव्हतं मात्र आता रब्बी पीकासोबतच गव्हाची शेतीसुद्धा करण्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे. मागील वर्षी पाणी नसल्याने रब्बी हंगाम घेता आला नव्हता.. खरीप पिकानंतर कोणतंही पीक घेणं शक्य नव्हतं मात्र आता रब्बी पीकासोबतच गव्हाची शेतीसुद्धा करण्याचा शेतकऱ्यांनी ...

आगामी निवडणुकात बसपाला साथ द्या - व्ही.डी.काळे

 प्रतिनिधी : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देशातील बहुजनांनी एस.सी., एस.टी च्या सोबत येत मायावती यांना प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत असे आवाहन केंद्रीय कार्यकारी सदस्य व्ही.डी.काळे यांनी गंगाखेड येथे आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केले.      बहुजन समाज पार्टीच्या गंगाखेड विधानसभा युनिटच्या वतीने एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, गुणवंत विध्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन दि. १५ जुलै रोजी शहरातील आनंद फंक्शन हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास जंगले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्ही.डी.काळे व प्रमुख पाहुणे म्हणून बसपा प्रदेश सचिव  देवराव खंदारे, विभाग प्रमुख प्रा. शामसुंदर वाघमारे, बामसेफचे संजय हनवते, भीमराव जोंधळे, विश्वजित वाघमारे, विधानसभा प्रमुख चंद्रशेखर साळवे, प्रसेनजीत मस्के, प्रकाश गवई आदि उपस्थित होते.      यावेळी १० वी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवातील उत्कृष्ठ जयंती समितीचा सत्कार करण्य...

दूध कमी पडू देणार नाही ; आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत – जानकर

    दूध उत्पादकांना पाच रुपये वाढीव दर देण्यात यावा तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे, या मागणीसाठी मुंबईची दूध कोंडी करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासूनच या आंदोलनाला सुरवात झाली आहे. दरम्यान, ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू नाही शकत. पण मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत. दूध उत्पादकांनी न घाबरता दूध पुरवठा करावा, तुम्हाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं अजब विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. तर मागणी मान्य न झाल्याने राजू शेट्टी यांनी रविवारी रात्रीपासूनच दूध पुरवठा बंद आंदोलन पुकारलं असून राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसेच गालबोट देखील लागलं आह

सेक्स करताना गर्लफ्रेंडचा मृत्यू

मुंबईत सेक्स करताना गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी बॉयफ्रेंडवर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. हे दोघेही इस्त्रायली नागरिक आहेत. ते मुंबईत आले होते. पोलिसांनी २३ वर्षीय तरूणाला अटक करण्यात येणार आहे. ओरिरन याकोव असे या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या वर्षी आपल्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये हे दोघे वास्तव्यास होते. टुरिस्ट व्हिसावर ते दोघेही मुंबईत आले होते. हे दोघे हॉटेलमध्ये सेक्स करत असताना त्याच्या गर्लफ्रेंडचा गुदमरून मृत्यू झाला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ही घटना घडली.त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. ही हत्या आहे का? असा संशय पोलिसांना आधी होता. याप्रकरणी फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालानुसार २० वर्षीय मुलीचा मृत्यू सेक्स दरम्यान गुदमरूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ओरिरन याकोवने सेक्स दरम्यान आपल्या गर्लफ्रेंडचा गळा दाबला होता त्यामुळे गुदमरून तिचा मृ्त्यू झाला, हेदेखील अहवालात म्हटले गेले आहे. त्याचमुळे पोलिसांनी या मुलीच्या बॉयफ्रेंडला म्हणजेच ओरिरन याकोविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. पोलिसांना जेव्हा या घटनेची माहि...

परभणी मनपाच्या माजी नगरसेवकांस घाण पाण्यात मोबाईल शोधावा लागतोय तेंव्हा... व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा

http://mahasanvad
मनपा प्रशासनाने मांडला स्टेडियम व्यापाNयांचा छळ -प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष ; सोयीसुविधांचा अभाव  परभणी, दि. १३ (प्रतिनिधी)- येथील स्टेडियमधील व्यापाNयांचा मनपा प्रशासनाने अक्षरश: छळ मांडला आहे. वारंवार निवेदने, तक्रारी, अर्ज देऊनही स्टेडियम दुकानासमोरील दुर्गंधीयुक्त घाण पाणी हटविल्या जात नाही. यामुळे अनेक व्यापाNयांचा व्यापार संपुष्ठात आला असून घाण पाण्यामुळे ग्राहक या दुकानांकडे पाठ फिरवित आहेत.  मागील वर्षभरपासून स्टेडियम मधील १५ ते २० दुकानदार सध्या अत्यंत मंद गतीने चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे त्रस्त आहेत. वर्षभर धुळ, खड्डे, गंदगी, कचरा यामुळे हे व्यापारी त्रस्त राहिले. रस्त्याचे काम खुपच थंड व निरुत्साहाने सुरु असल्यामुळे ते मुदत संपली तरी संपत नाही. तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी सदरील गुत्तेदाराला दंड लावण्याचा प्रयत्न केला.परंतु संबंधीत गुत्तेदार या ना त्या कारणाने आपल्याच पद्धतीने हळूहळू काम करत राहिला. परंतु याचा सर्वाधिक त्रास मात्र स्टेडियम मधील व्यापाNयांना झाला व आजही होत आहे. रस्त्याचे काम आजही पूर्ण झालेच नाही. आता तर एक नवीनच समस्या य...

" दुःखी कुटुंबाचे अश्रु पुसण्यासाठी " हात मदतीचे आले धावुन "महासंवाद न्यूज

" दुःखी कुटुंबाचे अश्रु पुसण्यासाठी " हात मदतीचे आले धावुन "महासंवाद न्यूज ★★★★★★★★ " जात,धर्म,पक्ष,या मर्यादांच्या सिमा ओलांडून माणसाच माणसाशी माणुसकी नात हे जीवनात श्रेष्ठ असतं असा माणुसकीचा संदेश  देण्याच काम शिवसेनेचे  गंगाखेड विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे यांनी आपल्या कार्यातुन समाजासमोर दिला आहे. काही दिवसापुर्वीच कॉंग्रेस पक्षामधे काम करणारे युवा कार्यकर्ते शेख युनुस यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेने तरुण,धडपड्या व राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तळमळीने काम करणा-या कार्यकर्त्याच कुटुंब उघड्यावर पडल.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली व परिवार आहे.या घटनेनंतर संतोष मुरकुटेंनी  आज दि.11 जुलै रोजी  कोणताही गाजावाजा न करता दिवंगत शे.युनुस यांच्या कुटुंबाची भेट घेऊन आत्मीयतेने विचारपुस केली.कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याने परिस्थिती न सांगताही ठळकपणे दिसुन येत होती.या सर्व परिस्थितीची जाणीव  ठेऊन संतोष मुरकुटे यांनी दुःखाच्या खाईत सापडलेल्या शे.युनुस यांच्या कुटुबाला 25000 रु. मदत केली. संतोष मुरकुटे यांनी केलेली म...

राष्ट्रीय पक्ष समजणाऱ्या काँग्रेस पक्ष त्या तरुणासाठी पुढाकार घेईल ?

राष्ट्रीय पक्ष समजणाऱ्या काँग्रेस पक्ष त्या तरुणासाठी पुढाकार घेईल    ?                       गंगाखेड (प्रतिनिधी   सत्तेत असताना सुद्धा काँग्रेसची  प्रामाणिकपणे का...

नवजात अर्भकाला टाकून मातेने केला पोबारा

नवजात अर्भकाला टाकून मातेने केला पोबारा प्रतिनिधी। राणी सावरगाव मानवतेला काळीमा फासणारी घटना गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी परिसरात घडल्याचे समोर आले आहे. एका नवजात ...

परभणी ते लातुर राणीसावरगाव मार्गे नवीन बससेवा सुरू करण्याची मागणी. ..

राणीसावरगाव, (प्रतिनिधी ) : शैक्षणिक व व्यापारी कामकाजासाठी ग्रामीण भागातील जनतेला सोयीचे व्हावे यासाठी गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव मार्गे परभणी ते लातुर नवीन बस...