मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमरावतीत मुलाने पळून लग्न केलं म्हणून दलिताच घर जाळलं

  :   अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत कवाडगव्हान गावातील एका इसमाने एका गरीब दलित महिलेच्या घराला आग लावली. ही आग इतकी भयंकर होती की, महिलेचे घर पूर्णपणे जळून खाक झाले.  या प्रकरणी तिवसा पोलिसांनी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बेबी लक्ष्मण मेंढे वय४९ रा. कवाडगव्हान असे फिर्यादी दलित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी गणेश काळे रा.कव्हाडव्हान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला अनेक वर्षांपासून गावात राहते. ती गावातीलच अंगनवाडी मदतनीस म्हणून काम पाहते. तिच्यावर बहिष्कार टाकण्यासाठी कव्हाडगव्हान स्थानिक ग्रामपंचायतने तिला मदतनीस म्हणून काढून टाकण्याचा ठराव तयार केला असल्याचे दलित महिलेने सांगितले आहे .काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेच्या मुलाने गावातील मुलीला प्रेम प्रकरणात पळून नेले होते. याचाच वचपा म्हणून गावातील एका इसमाने रात्री या दलित महिलेचे घर पेटून दिले. यात घरातील उपयोगी वस्तू, धान्य जळून खाक झाले.पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गणेश चपंत काळे यांचे विरुद्ध भादवी ४३६न...

भय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड

इंदूर, 14 आॅगस्ट :  भय्यू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या श्री सद्गुरू धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टमध्ये पत्नी आयुषी यांना ट्रस्टी करण्यात आलंय. ट्रस्टने आयुषी यांना ट्रस्टी करण्याचा ठराव 28 जून रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता.  ट्रस्टचे सचिव तुषार पाटील यांनी आयुषी यांचं नाव अधिकृतरित्या ट्रस्टी म्हणून घेण्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी पाठवलंय. कोल्हापूरचे दिलीप माधवराव भांडवलकर यांनी प्रकृतीचे कारण देत 22 जून रोजी ट्रस्टीपदावरून राजीनामा दिला. त्यांच्या जागी आयुषी यांची वर्णी लागली. भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाले यानेच आयुषी यांच्या संचालक होण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 8 ट्रस्टींनी मान्यता दिली. भय्यू महाराज यांची संपत्ती ट्रस्टने वर्षभराचा आर्थिक अहवालही सादर केला. यात जमीन, वाहन, फर्निचरसह एका-एका वस्तूचा हिशेब देण्यात आलाय. ट्रस्टच्या इंदूर शाखेकडे जवळपास 1 कोटी 46 लाखांची संपत्ती आहे. इतर ठिकाणाचा हिशेब मोजली असता जवळपास दीड कोटी असल्याचं समोर आलंय. 76 एकर जमीन याची किंमत 84.81 लाख दाखवण्यात आलीये. तर ट्रस्टकडे अजून 20 ए...

मुस्लीम आरक्षणासाठी धडक मोर्चा :-रिपोर्टर सचिन मेश्राम यवतमाळ

मुस्लीम आरक्षणासाठी धडक मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता.  महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आवश्यकता दुर्लक्षित करण्यात आल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आली.| मुस्लीम आरक्षणासाठी धडक मुस्लीम आरक्षणासाठी धडक नेरमध्ये मोर्चा : मो. रहेमान अभ्यास गटाचा अहवाल दुर्लक्षित असल्याचा आरोप यवतमाल :नेर तालुका तील मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आवश्यकता दुर्लक्षित करण्यात आल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आली. जामा मशीद येथे नमाज अदा करून नेताजी चौकातून मोर्चा काढण्यात आला. अमरावती रोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. जमियत उलेमा हिंद नेरच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण...

आदिवासी परधान समाज शिक्षक कर्मचारी समाजा तर्फे पुस्तक वाटप :-रिपोर्टर :-सचिन मेश्राम यवतमाळ

आदिवासी परधान समाज शिक्षक कर्मचारी समाजा तर्फे पुस्तक वाटप केळापूर तालुक्यातील सुन्ना  येथे आदिवासी गरजु गरीब मुला मुलींना 8. 9. 10 च्या मुलांना दि 11 आॅगस्ट 2018 रोजी गावचे सरपंच मा. पवन चितकुंटलावार यांचे अध्यक्ष खाली ही पुस्तके व नोट बुक.वाटप करण्यात  आले यावेळी परधान समाजाचे सक्रीय कार्यकर्त संभा मडावी शिक्षक संघटनेचे मा. सुरेशजी गेडाम सर परधान समाज शाखा सुन्ना चे पदधीकारी र्किष्णा आडे चंद्रकांत मडावी पवन मडावी अमोल पंधरे व   आदि .युवा वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते समाजामध्ये परीवर्तन करायचे असेल तर ग्रामीण भागात जावुन त्यांची भेट घेवुन समस्या जाणुन घेतल्या पाहीजे व नंतर समस्या निकाली काढण्या साठी प्रयत्न केले पाहीजे आणी क्रुती मध्ये उतरुन त्याजी जाणीव करुन दिली पाहीजे तरच समाज संघटीत होवु शकेल  असे मत संभा मडावी यांनी यावेळी मांडले  आपण या.तालुक्यात जीथे कुठे समाज वास्तव करीत  असेल तिथे जावुन भेटी घेवुन समाज परीवर्तन घडविण्याचे काम करण्याचे ठरविले असून शिक्षक कर्मचारी च्या मदतीच्या माध्यमातुन हे.कार्य करत राहु असेही ते म्हणाले या वेळी  म...

जागतिक आदिवासी दिनी यवतमाळात दुचाकी रॅली :- रिपोर्टर सचिन मेश्राम यवतमाळ

जागतिक आदिवासी दिनी यवतमाळात दुचाकी रॅली आदिवासी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी गुरुवारी आदिवासी समाजबांधवांनी केली  जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने यवतमाळात दुचाकी रॅली काढून तिरंगा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. स्थानिक राणी दुर्गावती चौकातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते  जागतिक आदिवासी दिनी यवतमाळात दुचाकी रॅली जागतिक आदिवासी दिनी यवतमाळात दुचाकी रॅली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आदिवासींच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्या यवतमाळ : आदिवासी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी गुरुवारी आदिवासी समाजबांधवांनी केली. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने यवतमाळात दुचाकी रॅली काढून तिरंगा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. स्थानिक राणी दुर्गावती चौकातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माजी मत्री शिवाजीराव मोघे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. शहरातील विविध मार्गाने निघालेली दुचाकी रॅली तिरंगा चौकात विसर्जित झाली. रॅलीमध्ये पिवळे ...

संविधान प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ; भारिप बहुजन महासंघाची मागणी

निजामपूर-जैताणे (धुळे) : 9 ऑगस्टला दिल्ली येथील जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळण्यासह आरक्षणविरोधी, डॉ. आंबेडकरविरोधी व संविधानविरोधी घोषणाबाजीचा घृणास्पद प्रकार घडला. त्याचा निषेध करण्यासाठी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शुक्रवारी (ता.10) सायंकाळी भारिप बहुजन महासंघातर्फे निजामपूर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. ठाणे अंमलदार रामलाल कोकणी यांनी निवेदन स्वीकारले. कार्यकर्त्यांनी संबंधितांवर देशद्रोहाचा खटला भरण्याची मागणीही यावेळी केली.कार्यकर्त्यांनी सुरवातीला पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली. परंतु संबंधित अनुचित प्रकार हा निजामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला नसल्याने एफआयआर दाखल करता येणार नाही. अशी समज सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर व हवालदार जयराज शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनला निवेदन देत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला. एपीआय खेडकर यांनीही जिल्हा पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तक्रार शासनापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. यावेळी भारिप बहु...

बोटोनी आदि. आश्रम शाळेत जागतिक दिन उत्साहात रिपोर्टर सचिन मेश्राम यवतमाळ

यवतमाळ :मारेगांव तालुक्यातील बोटोनी आदि. आश्रम शाळेत जागतिक दिन उत्साहात .बोटोनी. ता.९ ऑगस्ट. येथील शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आदिवासी जागतीक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमची संस्कृती आमचा अभिमान आम्ही आदिवासी आमचा स्वाभिमान, या उक्तीच्या प्रेरणेने येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या पारमपारीक संस्कृतीचे जतन करीत गावात रॅली काढून पारंमपारीक नृत्य कलेच्या अविष्काराने येथील ग्रामस्थांना आर्कर्षीत केले. उर्वरीत कार्यक्रम शालेय परिसरातील रंगमंचावर घेण्यात आले असून तब्बल पाच तास चाललेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य व्ही.एफ. मडावी असून प्रमुख पाहुने गावातील सरपंच्या सौ. मंजुषा मडावी, पो. पा. मुकुंदराव बदखल यांची उपस्थिती लाभली. यावेळी सन 2018 शालांत परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा व सेवानिवृत कर्मचारी श्री. एन. एल. उईके, श्री. पि. एम. कोडापे, सौ. मंगलाताई आत्राम यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून मान्यवराचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. रहाटकर यांनी के...

मराठा मोर्चां विरोधात हायकोर्टात याचिका, हिंसाचार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी 

मुंबई -  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील ठिकठिकाणी हिंसक वळण लागले होते. दरम्यान, मराठा मोर्चांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, हिंसा करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी या याचितेतून करण्यात आली आहे. मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडून आजचा महाराष्ट्र बंद शांततेत पुकारण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतरही पुणे, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील विविध शहरांत आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दरम्यान, मराठा मोर्चांविरोधात  द्वारकानाथ पाटील यांनी याचिका दाखल केली असून मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या हिंसक आंदोलनांना प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात द्वारकानाथ पाटील यांच्यावतीने अॅड. आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हिंसक कृत्ये करणाऱ्यांना शोधून काढावे,  हिंसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच अशा मोर्चांवर बंद घालावी, अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे.

गंगाखेडात शांततेत बंद यशस्वी : सकल मराठा समाजाच्या वतीने दिले तहसिलदारांना निवेदन

गंगाखेडात शांततेत बंद यशस्वी : सकल मराठा समाजाच्या वतीने दिले तहसिलदारांना  निवेदन गंगाखेड- येथे आज गुरुवार रोजी (दि. 9) क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होऊन मराठा समाजाच्या वतीने गंगाखेड शहर बंद ठेवण्यात आले. परळी नाका येथे भजन करून टाळ मृदंगाच्या निनादाने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले. परळी नाका येथे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू ठेवण्यात येऊन तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले. गंगाखेड येथील तहसीलदार यांना देण्यात आलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे  16% आरक्षण द्यावे, दि.  23 जुलै 2018 रोजी मराठा समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कोपर्डीतील गुन्हेगाराला लवकर फाशी द्यावी, शहीद झालेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत समाविष्ट करावे आदीचा यात समावेश होता. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस, किशनराव भोसले, साहेबराव भोसले मुळीकर, डॉ. सुभाष कदम, उद्धव सातपुते, गंगाधर पवार, भा...

राजुभाऊ उंबरकर यांच्या पुढाकारातुन साकारला सिंधी पांदण रस्ता..सचिन मेश्राम प्रतिनिधी यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्य़ात मारेगांव तालुक्यातील सिंधी येथील शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा पांदण रस्ता अतिशय बिकट परिस्थिती असताना, यातून शेतकरी व जनावरांना वहिवाट करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ह्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे,मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, अखेर येथील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांची भेट घेऊन यासंदर्भात मदत करण्याची विनंती केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हे काम करून देण्याचा शब्द राजुभाऊनी शेतकऱ्यास दिला, अखेर हा शब्द आज पूर्णत्वास देत.राजुभाऊं उंबरकर व गावकऱ्यांच्या  उपस्थितीत ह्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. लवकरच हा पांदण रस्ता गावकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध होईल.          यावेळी गावातील संतोष निब्रड, दशरथ डाहुले, ज्ञानेश्वर पोतराजे, मनोहर थेरे,नामदेव बोंडे, नामदेव जांभुळकर, राजु गायकवाड, प्रदीप डाहुले यांच्या सह सर्व गावकरी आपली कामे सोडून या सोहळ्यास उपस्थित होते तसेच मनसेचे अविनाश लांबट(विभागाध्यक्ष कुंभा), वैभव वैद्य, रा...

मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार

(मुंबई) प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पडताळून पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत आपला  अंतिम अहवाल उच्च न्यायालयात सादर करेल, अशी माहिती राज्य सरकारने आज हायकोर्टात दिली. मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारने ही माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडून शपथपत्र सादर करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही याबाबतचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबर पर्यंत देऊ, असे न्या. एम. जी. गायकवाड यांच्या नेतृत्वा खालील मागासवर्ग आयोगाने सांगिल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली. दरम्यान, अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने मागितलेला तीन महिन्यांचा कालावधी जास्त आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेले आंदोलन तीव्र होत असून, त्यात आत्महत्ये सारखे प्रकार घडत आहेत. न्यायालयाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगावा, अशी सूचना...

हिना गावितांवर हल्ला करणाऱ्या २५ जणांवर अॅट्रॉसिटी, तिघांना अटक

भाजपच्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या मोटारीवर मराठा आंदोलनावेळी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ जणांविरोधात अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासहित आयपीसीच्या कलम ३०७, १४३, १४७, ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खासदार हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काल हल्ला झाला होता. या हल्ल्यातून गावित थोडक्यात बचावल्या होत्या. या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी तसेच सबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली होती.दरम्यान काल गावित यांना झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज भाजपाकडून नंदुरबार शहर, व नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला . दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान गावित यांना कार्यालयातचं रोखण्याचा प्रयत्न झाला. काही आंदोलकांनी गावित यांच्या गाडीवर चढून हल्ला केला होता.

शेती पिकाला रात्रीच वीज पुरवठा कृषी फिडर : वीज वितरणच्या धोरणाने शेतकरी अडचणीत :- रिपोर्टर :- सचिन मेश्राम यवतमाळ

यवतमाळ : एकीकडे कृषी फिडरवर १८ तासांचे भारनियमन लादून दुसरीकडे तीन दिवस केवळ मध्यरात्रीच वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रात्री अपरात्री शेतात ओलित कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री विदर्भाचे आहे. त्यातही ऊर्जा राज्यमंत्री तर यवतमाळचेच आहे. विदर्भात वीज निर्मिती होत असूनही विदर्भाच्याच शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा केला जात नाही. कृषी उत्पादन वाढविण्यासाठी सिंचन सुविधा आणि पूर्ण वेळ वीज हवी अशी मागणी शेतकरी वारंवार करीत असूनही दुर्लक्ष केले जात आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी सहा हजार शेततळे केले आहे. जिल्ह्यात ८२ हजार सिंचन विहिरी आहेत. त्यात पाणीही उपलब्ध आहे. तरीही ओलित करण्यासाठी वीज पुरवठाच उपलब्ध नाही. वीज वितरण कंपनीच्या वेळापत्रानुसार आठवड्यात तीन दिवस सकाळी ८.१० ते सायंकाळी ४.१९ पर्यंत वीज पुरवठा मिळणार आहे. तर उर्वरित तीन दिवस रात्री ११ ते सकाळी ८ पर्यंत वीज पुरवठा केला जाणार आहे. रविवारी कृषी फिडर पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे शासकीय सुटी विचारात घेऊन आणि भारनियमनाचे वेळापत्रक तपासून शेतकऱ्यांना रात्रीबेरात्रीच ओलित करावे लागण...

शेतकरी कर्जमाफी व पिककर्ज तात्काळ देण्यात यावे - मनसेची मागणी..रिपोर्टर :- सचिन मेश्राम यवतमाळ

शेतकरी कर्जमाफी व पिककर्ज तात्काळ देण्यात यावे - मनसेची मागणी.. वणी (यवतमाळ): सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. परंतु ही कर्जमाफी सामान्य शेतकऱ्यांना पर्यंत केवळ कागदोपत्रीच पोहचली, यात उपविभागातील जवळपास २५ ते ३० हजार शेतकरी वंचित राहिले.याच वंचित शेतकऱ्यांनी काल मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांची भेट घेऊन सदर विषयात मदत करण्याची मागणी केली. यावर तात्काळ प्रतिसाद देत उंबरकर यांनी वंचित शेतकऱ्यांसह उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन यासंबंधित अधिकाऱ्यां व बँकांना कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांची माहिती घेऊन यावरील कर्जमाफी तात्काळ देऊन पुन्हा कर्ज देण्याचे आदेश देण्यात यावे या आशेयाचे निवेदन दिले. येत्या २ ते ३ दिवसात कुठलेही कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल अशी प्रतिक्रिया यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांनी दिली. याप्रसंगी विभागतील अनेक वंचित शेतकऱ्यांसह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

वंचितांच्या न्यायासाठी बहुजन आघाडी - बाळासाहेब आंबेडकर...रिपोर्टर :- सचिन मेश्राम यवतमाळ

वंचितांच्या न्यायासाठी बहुजन आघाडी - बाळासाहेब आंबेडकर यवतमाळ - स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या काळात कोणत्याही सरकारने उपेक्षित घटकाला न्याय दिला नाही. त्यामुळे या घटकाच्या मनात आक्रोश आहे. वंचितांच्या न्यायासाठी बहुजन वंचित आघाडीची वज्रमूठ बांधण्यात आली, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. यवतमाळ - स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या काळात कोणत्याही सरकारने उपेक्षित घटकाला न्याय दिला नाही. त्यामुळे या घटकाच्या मनात आक्रोश आहे. वंचितांच्या न्यायासाठी बहुजन वंचित आघाडीची वज्रमूठ बांधण्यात आली, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. संवाद यात्रेनिमित्त यवतमाळात आले असता शनिवारी (ता.चार) येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २७ जूनला पंढरपूर येथे धनगर समाजाचा मेळावा पार पडला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षांनी न्याय न देता आमच्या वाटेला केवळ निवेदन व आंदोलने दिली. एकही प्रश्‍न सोडवू शकले नाही. अधिवेशनांतर झालेल्या बैठकीत बहुजन वंचित आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आ...

यवतमाळ जिल्ह्यात वाघाने घेतला १२ वा बळी ...रिपोर्टर :-सचिन मेश्राम यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात वाघाने घेतला १२ वा बळी गेल्या वर्षभरातच या वाघाने 11 जणांना आपल्या भक्ष्यस्थानी केले आहे. शनिवार रात्रीपासून राळेगांव तालुक्यातील वेडशी शिवारातील गुलाब मोकाशे हा बेपत्ता होता. आज सकाळी वाघाने खाललेला त्याचा मृतदेह सापडला. हा वाघाचा १२ वा बळी ठरला. यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगांव; पांढरकवडा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत जिल्ह्यात वाघाने घेतलेला हा बारावा बळी आहे. गेल्या वर्षभरातच या वाघाने 11 जणांना आपल्या भक्ष्यस्थानी केले आहे. शनिवार रात्रीपासून राळेगांव तालुक्यातील वेडशी शिवारातील गुलाब मोकाशे हा बेपत्ता होता. आज सकाळी वाघाने खाललेला त्याचा मृतदेह सापडला. हा वाघाचा १२ वा बळी ठरला. आत्तापर्यंत या वाघाने या भागातील अनेक ढोरांना आपले भक्ष्य केले आहे. वनविभागाने या वाघाला पकडायला शर्थीचे प्रयत्न करुन सुद्धा हा वाघ त्यांच्या हाती लागलेला नाही. अद्यापतरी तिथे वनविभागाचे कोणीही पोहचले नाही. सततच्या या घटनानी या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आता घटनास्थळी नागरिकांनी मोठा जमाव केला असुन जो पर्यंत वनविभाग या वाघाचा ...

वृतात मार्मिकता असली पाहिजे : अण्णाभाऊ कचाटे [] रिपोर्टर :-सचिन मेश्राम यवतमाळ

यवतमाळ /मारेगाव. देशाचा चौथा आधारस्तंभ प्रसारमाध्यम सद्या वाट चुकत असल्याची भावणा समाजात निर्माण होत असुन लोकशाही मुल्याची जपणुक करणारा प्रसारमाध्याचा बेछुटपणा कधी कधी कुणाच्या अंगलट येतो.हे जपण्यासाठी सामंजसपणाने वृताचे संकलन करुन वृत्तात मार्मिकता असली पाहिजे असा आशावाद महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे मारेगाव तालुका कार्याध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार अण्णाभाऊ कचाटे यांनी व्यक्त केला.कुंभा येथील स्वामी विवेकानंद वाचणालयात आयोजित मारेगाव तालूका मराठी पत्रकार संघटनेच्या सभेत ते अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते.नव्याने संघटनेत प्रवेश घेतलेल्या भास्करराव धानफुले यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती होती.यावेळी सोशल मिडीयावरील चँनलचे प्रतिनिधी सचिन मेश्राम यांच्या संघटनेतील प्रवेशाचे स्वागत करण्यात आले.       जेष्ठ पत्रकार अण्णाभाऊ पुढे म्हणाले की,ग्रामिण भागात ग्लँमर असणा-या या क्षेत्रात उठसुट कोणीही पत्रकार बनण्याचे जणू पेव फुटले आहे.बुड शेंडा न बघता कसेही वृत्त लिहुन आपले इप्सित साध्य करण्याचा जणु सपाटा लागला आहे.पत्रकारितेचे प्राथमिक ज्ञान नसलेल्या अनेकांना वार्तांकण ...

आदिवासी भागातील 21 अंगणवाड्या झाल्या डिजिटल..रिपोर्टर :- सचिन मेश्राम यवतमाळ

आदिवासी भागातील 21 अंगणवाड्या झाल्या डिजिटल मीनाक्षी बोलेनवार यांच्या प्रयत्नाला यश यवतमाळ , झरी: आदिवासी बहुल तालुक्यात साधारणतः 21 अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतून बालकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याचा निर्णय एकात्मिक बालविकास विभाग प्रकल्पाचे सुनीता भगत यांनी हाती घेतला होता. त्यांच्या या कार्याला बळ जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी बोलेनवार यांचं मिळालं. तालुक्यातील अंगणवाडी दुरुस्ती, साहित्य, व इतर काम करीता लागणार निधी वरील पातळीवरून खेचून आणून जिल्हा परिषद सदस्या बोलेनवार यांच्या कार्याने तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहे.झरी तालुक्यातील आतापर्यंत 21 अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. तर 72 केंद्राला खेळणी, साहित्य पुरविण्यात आली आहेत यामुळे शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास होणार आहेत. तालुक्यात 106 मोठ्या अंगणवाड्या तर 30 मिनी अंगणवाड्या आहेत तर 136 अंगणवाडी सेविका याचे काम पाहत आहे. तालुक्यातील जुनोनी, चिचघाट, कुंडी, हिवराबारसा, सुसरी, झमकोला, अडकोली आणि येवती अंग...

धनगर आरक्षणासाठी तुळजापूर ते चौंडी पदयात्रा

उस्मानाबाद – धनगर आरक्षणासाठी (अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा) सकल धनगर समाजाच्या वतीने रणशिंग फुकण्यात आले असून तुळजापूर ते चौंडी (जि. अहमदनगर) पदयात्रा काढली जाणार आहे. भाजप सरकार चले जाव चा नारा लावत येत्या 16 ऑगस्टपासून पदयात्रा काढणार असल्याची माहिती समन्वयक सुरेश कांबळे यांनी दिली आहे. उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषदेत गुरुवारी त्यांनी ही माहिती दिली. 1५ ऑगस्ट 2018 पुर्वी धनगर जमातीस अनुसूचित जमाती (एसटी) चे जात प्रमाणपत्र वितरीत व्हावे व  चौंडी प्रकरणातील गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावेत, खोटे आश्वासन देऊन धनगर जमातीची फसवणूक करणार-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तात्काळ फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती च्या वतीने दि.16 ऑगस्ट 2018 ते दि 28 ऑगस्ट 2018 तुळजापुर ते चौंडी अशी 200 कि.मी अंतराची भाजप सरकार चलेजाव यात्रा आयोजित केली आहे.या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे अॅंड.खंडेराव चौरे आणि राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना समाज आरक्षणासाठी पक्षत्याग कर...

धामणीच्या शेतक-याचा १५ ऑगष्टला आत्मदहणाचा इशारा रिपोर्टर सचिव मेश्राम

धामणीच्या शेतक-याचा १५ ऑगष्ट ला आत्मदहणाचा गर्भित इशारा <>भुसंपादनाची मंजुर रक्कम देण्यास शासनाची दिरंगाई <> <>मोबदल्यासाठी २५ वर्षापासुन संघर्ष <> <>न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली<> <>पिडीत शेतक-याचे वरीष्ठांकडे निवेदन यवतमाळ :रिपोर्टर सचिन मेश्राम       तालूक्यातील धामणी येथील सुधाकर खिरटकर या शेतक-याची शेतजमिन नरसाळा येथे असुन शासनाकडुन लघुसिंचनासह थेट शेतक-याच्या शेतामधुनच कालव्याची उभारणी करीत शासनाने सदर शेतक-यास भूमिहिन केले.मात्र त्याचा मोबदला देण्यास नायालयाचा आदेश असतांनाही दिरंगाई करीत असल्याचा निषेध करीत हृदय रोगाने पिडीत असलेल्या शेतक-याने भूसंपादनाची मंजुर रक्कम देत  नसल्याने  येत्या १५ ऑगष्टला स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा गर्भित इशारा दिल्याने शासन प्रशासनाच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.        सुधाकर खिरटकर असे हृदयरोग पिडीत शेतक-याचे नांव असुन त्यांची तालुक्यातील नरसाळा शिवारात ०.५६ हे.आर. शेती आहे.या अल्पशा शेतीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालवित असतांना...

शेतकऱ्याला लुटणाऱ्या भामट्यांच्या आवळल्या मुसक्या..रिपोर्टर सचिन मेश्राम यवतमाळ

यवतमाळ : वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील शेतकऱ्याला बुधवारी भुरळ घालून दोन चोरट्यानी लुटले. दुपारी झालेल्या या चोरीची पोलिसांना तक्रार मिळताच पोलिसांनी सायंकाळी दोन्ही चोरट्याना जेरबंद केले आहे. प्रदीप नानाजी ताजने (32) रा. सुकनेगाव हे भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या शेतीतील भाजीपाला विकल्यानंतर ते नेहमीप्रमाणे दुपारी 12 वाजताच्या सुमारास घरी आले. त्यावेळी घरी दोन इसम साधूच्या वेषात आले होते. त्यांनी दक्षिणा मागितली प्रदीपच्या पत्नीने त्यांना 5 रुपये दक्षिणाही दिली. त्यानंतर तुमच्या घरात लवकरच एकाचा मृत्यू होणार अशी भविष्यवाणी या भामट्यांनी केली. त्या भामट्यांनी प्रदीपच्या परिवारास प्रसाद दिला.प्रसाद खाताच त्यांना गुंगी आली. भुरळ घातल्यासारखे त्यांना पैसे आणून द्या म्हणून म्हटले असता 16 हजार रुपये दिले. काही वेळ घालविल्यानंतर ते भामटे तेथून पसार झाले. थोडा वेळाने गुंगीच्या औषधाचा परिणाम संपताच त्यांना समजले की, आपली फसवणूक झाली आहे. प्रदीपच्या भावाला हे समजताच त्याने प्रदीपसमवेत मारेगाव(कोरंबी) फाट्या पर्यंत येऊन पाहिले परंतु चोरट्याचा शोध लागला नाही. वणीती...

यंदाही बोंडअळीचा कपाशीवर मोर्चा शेतक-यात चिंतेचे वातावरण ..महासंवाद न्यूज रिपोर्टर सचिन मेश्राम यवतमाळ

तालुका प्रतिनिधी मारेगाव         मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादणात घट आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.कसाबसा सावरत मागील वर्षीपासुन सतत संकटाचा सामना करत या वर्षी सुध्दा संकटानी शेतक-यांचा पाठलाग करणे सुरुच असुन कपाशीचे पिक बहरु लागताच शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच तालुक्यातील काही भागात कपाशीवर काळ्या ठीपक्याच्या बोंडअळीने मोर्चा वळविल्याचे  कृषी विभागाच्या क्रॉससँप पाहणीत आढळुन आल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.      मागील वर्षी संपुर्ण तालुकाच गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीच्या उत्पादणात घट होवून शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.यावर्षी तालुक्यातील जवळपास २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली.पेरणी नंतर काही दिवसातच पिक बहरु लागले.बियाने कंपन्यानी सुध्दा १३० ते १५० दिवसात पिक येणारे वाण उपलब्ध करुन दिले.परंतु अवघ्या ४५ ते ५५ दिवसाच्या कालावधित कपाशीच्या झाडांवर काळ्या ठिपक्याच्या बोंडअळीने आक्रमण केल्याचे कृषी विभागाच्या क्रॉससँप पाहणीत आढळुण आल्याने शेतक-यांमध्ये पुन्हा एकदा मागच...