*पाटोदा तालुक्यात स्टेट बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या माहितीमुळे पीक कर्ज पुनर्गठन प्रस्ताव माघारी..! * पाटोदा.दि.३० (शेतकरी वार्ता). महाराष्ट्रातील दुष्काळाची धग मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली व गेल्या वर्षाच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील २१ लाख शेतकर्यांच्या ११ हजार कोटी रुपये कर्जाची फेररचना होईल. ज्या शेतकर्यांचे कर्ज थकले आहे त्यांचे पहिल्या वर्षाचे सगळे व्याज मायबाप सरकार भरणार आहे आणि पुढील चार वर्षांसाठी निम्मे म्हणजे सहा टक्के व्याज सरकार भरणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. यामुळे शेतकरी नव्याने कर्ज घेऊन शेती करू शकतो, अशी आहे गतवर्षीच्या सरकारची शेतकरी पीककर्ज पुनर्गठन योजना होती. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांच्या आदेशाने नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. परंतु, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने, रब्बीच्या पेरण्यांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठन अत्यंत गरजेचे आहे. किंबहुना, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांसाठी नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्...