: लॉकडाउनमध्ये विविध राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय विद्यार्थी, मजूर, भाविकांसह अन्य लोकांचा घरी जाण्याचा मार्ग केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी मोकळा केला आहे. राज्यांनी मार्गदर्शक तत्वे निश्चित करुनच अशा लोकांना घराकडे पाठवावे असे आदेशित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने 13 कलमी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. याची अंमजबजावणीचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. आदेशात म्हटल्याप्रमाणे, गृहमंत्रालयाने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून निर्देश देण्यात येत आहेत. त्यानुसार लॉकडाउनमध्ये विविध राज्यात अडकून पडलेल्या व्यक्तींना स्वगृही पाठविण्यासाठी अथवा राज्यात आणण्यासाठी राज्यस्तरावर अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती एडजेस कुंदन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे राज्य संचालक अभय यावलकर हे नियंत्रक म्हणून काम पाहतील. त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील. जिल्ह्यांचे नोडल अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी त...