राणीसावरगावात रस्त्याचे मोजमाप...एक महिन्यात कामे पूर्ण करणार :- श्रीनिवास मुंढे ************************************* राणीसावरगाव (प्रतिनिधी) येथील चारही वार्डातील रस्त्याचे मोजमाप घेण्यात आले असून यावेळी मा.सभापती श्रीनिवास मुंढे, युवा नेते सय्यद अल्ताफ, राजू स्वामी, पप्पू जाधव, उपसरपंच भूषण गळाकाटू, संजय रायबोले, बंडू पुजारी, आदी उपस्थित होते. यावेळी वार्डातील राहिले सर्व रस्त्याचे काम काही दिवसात पुर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. याचप्रमाणे विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून 40 लाख रुपयाचे सिमेंट रस्ते तयार करण्यात येत आहेत.