मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धनगरजवळका येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप (डॉ.हरिदास शेलार)

पाटोदा  (प्रतिनिधी )  पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील   श्री  जगदंबा विद्यामंदीर च्या   दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला    सोमवार  रोजी झालेल्या निरोप  समारंभाच्या झालेल्या  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रामराव काळे तर पाहुणे म्हणून ह.भ.प.परशुराम मराड़े (तळेगाव बीड )तसेच श्री.  जगदंबा शिक्षण संस्थेचे संस्थापक सचीव आदरणीय  पांड़ूरंग पवार सर     त्याचप्रमाणे उपसरपंच अभय पवार, लक्ष्मण सस्ते,  लक्ष्मण ढवळे, नानासाहेब ड़िड़ूळ, मुख्याध्यापक विकास वराट, मुख्याध्यापक सोंड़गे पंढरीनाथ ,नवनाथ काळे, शिक्षक वृन्द, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी /विद्यार्थीनी  उपस्थित होते.    या वेळेस पुजा येवले, ड़ोके प्रतिक्षा ,योगीता काळे,पुजा गाड़ेकर,ऋतुजा काळे     इ. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ह.भ.प.मराड़े महाराज यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जिवनांत शिक्षणाला खुप महत्व आहे अगदी सोप्या भाषेत सांगितले. पी.एस पवार यांनी भावनिक होऊन आपले विचार मांड़ले तसेच लक्ष्मण सस्त...

अनाधिकृतपणे सेतू चालवून जनतेची लूट करणाऱ्या सेतू चालकावर प्रतिबंधात्मक कारवाई करा―बाबासाहेब गर्जे

पाटोदा (प्रतिनिधी) दि.२५ : पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारात अनधिकृतपणे सेतू सेवा केंद्र चालवून कामा साठी येणाऱ्या सर्व सामान्य जनतेकडून अवाच्या सव्वा पैसे घेऊन राजरोसपणे लूट करणाऱ्या संबंधित चालकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी पाटोदयातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब गर्जे यांनी पाटोदा तहसीलदार यांना दिलेल्या तक्रारी निवेदनात केला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की पाटोदा तहसील च्या आवारात जुन्या पंचायत समिती सभागृहाच्या बाजूला असलेल्या खोलीत चालू असलेले सेतू केंद्र हे अनाधिकृत असून त्या सेतू केंद्राला पाटोदा तालुक्यातील दुसऱ्याच गावाची सेतू चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सदरील सेतू हा पाटोदा येथे चालू असून ज्या ठिकाणी परवानगी आहे त्याच गावी तो चालवावा असे शासनाचे निर्देश असताना हे सेतू केंद्र पाटोदा येथे आणि ते ही तहसील च्या आवारात कसे काय चालू आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील सेतू चालका कडून सेतू केंद्रात कामासाठी आलेल्या लोकाकडुन अव्वाच्या सव्वा पैशाची आकारणी करून दिवसाढवळ्या जनतेची लूट चालविली आहे. कोणत्या कामासाठी किंवा प्रमाणपत्रासाठी किती फि...

मुगगांवच्या शेतकऱ्यांचे तहसिल समोर अमरण उपोषण(डॉ. हरिदास शेलार)

*मुगगांवच्या शेतकऱ्यांचे तहसिल समोर अमरण उपोषण* ➡ खरे लाभार्थी अनुदाना पासुन वंचीत अनुदान यादीत मोठा घोटाळा *पाटोदा प्रतिनिधी * नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर मुगगाव येतिल शेतीचे खुप नुकसान झाले होते त्यावेळी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तलाठी,कृषी साहाय्यक यांनी केले होते परंतु ज्याचे पंचनामे झाले त्यातील बरेच शेतकरी अनुदाना पासुन वंचित आहेत.तलाठी अधिकारी खाजगी रायटर ठेवत असुन तो प्रत्येक गोष्टी मध्ये चुकीचे काम करत आहे सदर व्यक्ती च्या हातामध्ये तीन गावाचे मुख्य रेकॉर्ड दिले असुन यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार लोकांची आहे.त्यामुळे हा रायटर कार्यालयात ठेवण्यात येऊ नये.तसेच अतिवृष्टीमध्ये असलेल्या लोकांच्या यादीची फेर तपासणी करुन चुकीचे नावे कमी करण्यात यावेत व जे लोक अतिवृष्टीमध्ये खरे लाभार्था आहेत त्याचे नाव तत्काळ यादीमध्ये सामाविष्ठ करावेत  या मागण्यासाठी मुगगांव   येतिल शेतकरी तहसील कार्यालया समोर अमरण उपोषणास बसले असुन  उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख,गर्जे बापु यांनी पाठिंबा दिला ...

बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे धावली आज हायस्पिड इंजिन टेस्टिंग प्रत्यक्षात (डॉ. हरिदास शेलार)

नगर- बीड -परळी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लकवकर पुर्ण करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासुन होत होती.रेल्वे जोडली गेल्यास बीड व नगर ला जाणा-या प्रवाशांची प्रवास करण्याची मोठी गैरसोय टळणार आहे. वेळोवेळी निधी मंजुर होत नसल्याने या मार्गाचे काम कित्येक वर्ष रखडले होते. या मार्गासाठी 50 टक्के निधी राज्य सरकार तर 50 टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, यांनी युतीसरकार आल्यानंतर या रेल्वेमार्गाला निधी मिळुन काम पुर्णत्वाकडे नेले.अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा. प्रितमताई मुंडे यांनी गेल्या पाच वर्षापासुन केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोटयावधी रुपयांचा निधी रेल्वेच्या कामासाठी खेचुन आणला आज बीड जिल्हयातील स्वप्नातील रेल्वे ही आज पुर्ण होतांना दिसुन येत आहे. नारायण डोह ते सोलापुवाडी या दरम्यान हायस्पीड इंजिनची टेस्टींग आज घेण्यात आली. टेस्टींग आज यामुळे अनेकांच्या डोळयांचे पारणे फिटले. नारायण डोह ते सोलापुरवाडी या दरम्यान हायस्पीड इंजिनची चाचणी आज घेण्यात आली.लवकरच हिरवा झेंडा फडकणार आहे. आणि जिल्हयातील जनतेच्य...

परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा(डॉ. हरिदास शेलार)

निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आणि शेवटही झाला. सत्तेची सुरुवात ज्या परळीतून झाली त्याच परळीतून मस्तवाल सत्तेचा समारोप होईल. भावनिक करण्याचे राजकारण आता नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विद्यमान खासदार प्रितम मुंडे याच्यावर निशाना साधला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांच्यासह पक्षाचे बडे नेते उपस्थित आहेत. मुंडेंच्या परळीत पवारांचा मुक्काम, बड्या नेत्यांसोबत आखणार डावपेच धनंजय मुंडे आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणाले बीड जिल्ह्याला भकास करण्याचे काम झाले आहे.पाच वर्षात बीड जिल्ह्यासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत 78 सिंचन प्रकल्प प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकल्प मार्गी लागले असते तर ऊसतोड मजूरांची संख्या निश्चीत कमी झाली असती. ज्या परळीच्या थर्मलवर 10 हजार लोकांचे पोट आहे ते थर्मल बंद करण्याचा घाट घातला जात आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांचे लक्ष आहे का? बीड जिल्ह्याला भावनिक करायचे स्व. गोपीनाथाराव मुंडे यांचे नाव घ्यायचे हे आता चालणार नाही असे म्हणत त्...

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी मुदतवाढ द्या -आकाश गर्जे (रिपोर्टर : हरिदास शेलार)

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी मुदतवाढ द्या -आकाश गर्जे* *मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून हजारो शेतकरी राहणार वंचित - आकाश गर्जे*बीड प्रतिनिधी हरिदास शेलार ➡️ महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आव्हान केले होते परंतु शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचताच पोर्टल बंद झाले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही सौर कृषी पंपाचा लाभ घेता येणार नाही. थोडाफार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असून त्यांचे पंप मंजूर झाले आहेत तरी इतर सर्व शेतकऱ्यांची दखल घेऊन सर्वांना ऑनलाईन करण्याची संधी द्यावी. आणि महावितरण विभागाने लवकरात लवकर पोर्टल चालू करून ऑनलाइन अर्ज स्वीकारावेत. आणि मागेल त्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ द्यावा. शेतकऱ्यांसाठी लाईट मुक्त आणि सौर उर्जेवर चालणारी मोटर अत्यंत फायदेशीर असून रात्रीचे पिकांना पाणी देणे यामुळे वाचणार असून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांच्या खरोखर फायद्य...

नाशिक ते मुंबई भारतीय किसान सभेच्या वतीने काढलेल्या मोर्चा तील शेतकऱ्यांना त्रास दिल्याबद्दल पाटोदा द्या मध्ये शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा(रिपोर्टर :-डॉ.हरिदास शेलार)

*नाशिक ते मुंबई भारतीय किसान सभेच्या वतीने काढलेल्या मोर्चा तील शेतकऱ्यांना त्रास दिल्याबद्दल पाटोदा द्या मध्ये शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा*पाटोदा प्रतिनिधी हरिदास शेलार ➡️ मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्या आश्वासन देऊन पूर्ण न केल्याने किसान सभेने पुन्हा एकदा मुंबईवर धडक देण्यासाठी कूच केली मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हजारो शेतकरी आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत परंतु मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी परवानगी नाकारली मोर्चेकर्‍यांनी आंदोलन  करावे मोर्चा काढू नये असे सांगण्यात आले या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी आदिवासी बांधव व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत मागील वर्षी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक हुन पाई मुंबई गाठली होती मुंबईत मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या परंतु वर्षभराच्या कालावधीत यातील काही मागण्यावर कार्यवाही झालेली नाही शेतकऱ्यांना सर्व कर्जमाफी दिली नाही दुधाला पन्नास रुपये भाव दिला नाही स्वामीनाथन शिफारसी लागू केली नाही शेतकऱ्यांना पूर्ण वीज बिल माफ ...

बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बदली.डॉ.आस्तिककुमार पांडे नवे जिल्हाधिकारी:- रिपोर्टर:- डॉ हरिदास शेलार ➡️

बीडचे जिल्हाधिकारीएम. डी. सिंह यांची बदली. डॉ आस्तिककुमार पांडे नवे जिल्हाधिकारी  प्रतिनिधी । बीड. डॉ हरिदास शेलार ➡️ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर आयएएस ऑफीसरच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तीन वर्षांचा कालावधी उलटलेले बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बदली करण्यात आली आहे. ते आयटीचे डायरेक्टर झाले आहेत. तर अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडे यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बदली करण्यात आली असून त्यांना आयटीच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सिताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले आहे. एम.डी.सिंह यांनी बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत सक्षमपणे काम केले आहे. पीक विमा भरण्यामध्ये बीड जिल्हादेशात पहिल्या स्थानी आला तर नुकताच पुनरूत्थानाच्या क्रांतीमध्येही बीड जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला. हे फलित जिल्हा...

शिवजयंती दिवशी आमदार सुरेश धस यांनी गायकवाड कुटूबाला केली दोन लाखाची मदत. पाटोदा प्रतिनिधी -डॉ हरिदास शेलार

शिवजयंती दिवशी आमदार सुरेश धस यांनी गायकवाड कुटूबाला केली दोन लाखाची मदत... पाटोदा प्रतिनिधी -डॉ हरिदास शेलार ➡️ आमदार सुरेश आण्णा धस यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने दिव्यांग संघर्ष समितीचे स्व.आनंदराव गायकवाड यांच्या कुटुबाला दोन लाख रुपयाचा चेक देऊन मदत केली. स्व आनंदराव गायकवाड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या शोकसभेच्या वेळेस आमदार सुरेश धस यांनी दोन लाख रुपये मदत व मुलांचे शिक्षणाची जबाबदारी घेतली होती त्यांनी दिलेला शब्द आज शिवजयंती निमीत एक चांगला संदेश समाजामध्ये आर्थिक मदत करुन दिला आहे गायकवाड यांचे कुंटूब पुर्णपणे वाऱ्यावर पडले आसताना त्यांना जो आधार आमदार सुरेश धस यांनी दिला आहे तो फार मोठा आहे आजच्या सोशल मिडीयाचे जमान्यामध्ये सर्व नेते मंडळी प्रसिध्दी साठी फोटोसाठीच ओडताण  करतात पण  खरच आमदार सुरेश धस हे सदरचा चेक देण्यासाठी सुध्दा समोर आले नाहीत बाजुला बसुन राहिले दिव्यांग बांधवानी विनंती केली आण्णा तुमच्या हाताने दया ते म्हणाले नको रे हे माझे कर्तव्य आहे. आष्टीचे नगराध्यक्ष साहेब , जिया बेग साहेब , दिव्यांग संघर्ष समितीचे महाराष्ट...

तांबाराजुरी येथे शिवजयंती थाटात संपन्न :-पाटोदा : प्रतिनिधी डॉ हरिदास शेलार ➡️

तांबाराजुरी येथे शिवजयंती थाटात संपन्न पाटोदा : प्रतिनिधी डॉ हरिदास शेलार ➡️ पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी येथे शिवजयंती निमित्त अतीशय चांगले,आनी दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मार्फत तीन दिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दि.१७/०२ रोजी मुर्ती स्थापना,व प्रख्यात शिवचरित्रकार अफसर शेख यांचे व्याख्यान झाले. दि.१८/०२ रोजी शालेय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. आनी आज दि.१९/०२ रोजी  भव्य दिव्य अशी मिरवणुक ,ढोल,ताशा,शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक,बाल जिजाउ,बालशिवबा,ची वेशभुषा साकारण्यात आली होती. आपली मुलं लेझीम खेळतात ,हे पाहुन त्यांच्या पालक ही लेझीम वर डाव खेळले. अशा भरगच्च कार्यक्रमानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात जिजाउ वंदनाने केली.व्यासपिठावर दिनकर तांबे माजी सैनिक ,नारायण तांबे माजी सैनिक,हरिदास तांबे माजी सैनिक,संदीप तांबे फौजी, ईन्नुस शेख सर,पोपट तांबे,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन दिपक तांबे सरपंच हे होते.याप्रसंगी  राधा तांबे,योगीता तांबे,पल्लवी तांबे,आदी मुलींनी भाष...

जि.प.कें.प्रा.शाळा दासखेड येथे शिवजयंती उत्सवात साजरी :-पाटोदा प्रतिनिधी हरिदास शेलार

19 फेब्रुवारी 2019 जि.प.कें.प्रा.शाळा दासखेड येथे शिवजयंती उत्सवात साजरी पाटोदा प्रतिनिधी हरिदास शेलार ➡️  आज जि.प.कें.प्रा.शाळा, दासखेड येथे शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली त्यावेळी  सकाळी 9 वाजता सर्व बाळ मावळे , मु.अ. श्री बांगर सर ,  शिक्षक श्री राऊत सर श्रीम गवळी मॅडम श्रीम सानप मॅडम श्रीम कुलकर्णी मॅडम  ,गावकरी श्री हरिदास शेलार  ,शिव जयंती अध्यक्ष श्री उत्तरेश्वर कोकाटे व इतर कार्यकरते, पालकवर्ग श्री सुनील कोकाटे इ .सर्व जमले व प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर शिक्षकमार्गदर्शन विध्यार्थी भाषणे करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तांबाराजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची निर्धार यात्रा नियोजन बैठक संपन्न ..:रिपोर्टर :-डॉ. हरिदास शेलार

: प्रतिनीधी दि १८/०२/२०१९ रोजी संध्या 7 वाजता तांबाराजुरी येथे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने डोंगरकिन्ही जि.प गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात जिजाउ वंदनाने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेते बाळासाहेब आजबे काका, बीड जि.प.माजी अध्यक्ष डॉ शिवाजी राऊत,  जि.प.माजी सभापती महेंद्र तात्या गर्जे, सतिष आबा शिंदे, चंपाताई पानसंबळ ,शिवभुषण जाधव, आण्णासाहेब चौधरी,महेबुब शेख ,सज्जाद सय्यद,यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परळी येथे 23/02/2019 रोजी होणार्या निर्धार यात्रेच्या समारोप कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी सुनिल काळे,अँड वाहब भाई, सुभाष अडागळे,प्रकाश सवासे ,शिवाजी नेमाने, राज घुमरे बाबासाहेब शिंदे ,मंगेश पवार,नारायण मामा ,बाळासाहेब खाडे, राहुल सोनवणे,  आविनाश पवार ,विशाल जाधव,मधुकर येवले महारुद्र येवले ,हनुमंत खोड,नवनाथ गव्हाणे,महादेव पवळ ,राजेश गोंदकर,तात्या चौरे,ज्ञानेश्वर तांबे,अमोल तांबे,शहादेव नेमाने,रामप्रसाद तांबे,सुदाम तांबे,मोहन तांबे, ईत्यादी तांबाराजुरी,चुंबळी,उंबरविहर...

जिल्हा रुग्णालायात दिव्यांगाची प्रमाणपत्रासाठी होत असलेली हेडसांड रोखण्यासाठी आंदोलन करणार - शेख जीलानी/अशोक दगडखैर

प्रतिनीधी : - जिल्हा रुग्णालय बीड येथे दिव्यांग व्यक्तीना प्रमाणपत्र काढण्यासाठी फार मोठ्या आडचणीचा सामना करावा लागत आहे, कधी ऑनलाईन सिस्टीम बंद असते तर कधी डॉक्टर हजर नसत्तात तसेच बाहेर ऑनलाईनसाठी पाठवले जाते बाहेर ऑनलाईनसाठी ३०० रुपये घेतले जातात हा दिव्यांग व्यक्तीवर अन्याय आहे. अंध, कर्णबधीर, मुकबधीर यांना तपासण्यासाठी मशीन उपलब्ध नाहीत असे सांगीतले जाते, पुर्ण एक डोळा निकामा आसणाऱ्या अंध व्यक्तिला टक्केवारी ३० टक्के दिली जाते तर ज्याचे फक्त एक बोट तुटले आहे त्यांना ४०ते ५० टक्के चे प्रमाणपत्र चेरीमेरी घेउन दिले जात आहे का ? आसा प्रश्न निर्मान होत आहे. आजपर्यंत दिलेल्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करावी म्हणजे सर्व बोगस प्रमाणपत्रधारक हे बाहेर येतील सध्या बीड जिल्हायामध्ये बरेच शासकीय कर्मचारी हे बोगस प्रमाणपत्रावर नोकऱ्या करत आहेत तर बरेच लाभ घेत आहेत तरी संबधीत बाब ही गंभीर आहे तरी तत्काळ जिल्हा रुग्णालय होत आसलेली हेडसाळ थांबवावी तसेच समाजकल्यान कार्यालयातुन वनफोर पास काढण्यासाठी देखील बहेर ऑनलाईन साठी पाठवले जाते यातपण दिव्यांगाची लुट केली जात आहे हे सर्व थ...

पाटोदा पत्रकार पोपटराव कोल्हे विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घ्या पत्रकाराचे लक्षणीय उपोषण संपन्न:रिपोर्टर डॉ. हरिदास शेलार

*पाटोदा पत्रकार पोपटराव कोल्हे विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घ्या पत्रकाराचे लक्षणीय उपोषण संपन्न* पाटोदा (डॉ हरिदास शेलार )   येथील दैनिक चंपावतीचे पत्रकार पोपट कोल्हे यांच्या विरोधात पाटोदा चे तहसीलदार यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी विभागीय कार्यालय समोर पाटोदा पत्रकारांचे लाक्षणीय उपोषण संपन्न झाले. दि.११/२ रोजी दैनिक चंपावती मध्ये दिलेल्या बातमी संदर्भात पाटोदा तहसीलदार यानी केवळ आकसापोटी बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करून वृत्तपत्राची मुस्कटदाबी करण्यांचा प्रयत्न केला. यामुळे पाटोदा येथील पत्रकारांने या.तहसीलदाराने पत्रकार पोपट कोल्हे यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांचा निषेध करून. पत्रकार वरील गुन्हा मागे घेवा सह आदी मागण्या संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर लक्षणीय उपोषणात  जिल्ह्यातील मान्यवंरासह तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थितीत होते या पत्रकारांच्या उपोषणास तालुक्यातील नाभिक संघटना,शेतकरी संघटना,शेतकरी का.पक्ष सह अनेक संघटनेचे पदाधिकारी सह विष्णुपंत घोलप, अमोल कवडे,बाळासाहेब जावळे,डॉ. नरेंद्र जावळे,अबलुग घुगे जितेंद्र सांगळे,...

पाटोद्यात तहसिलदाराच्या मोगलाई विरोधात आज लाक्षणिक उपोषण.रिपोर्टर :-डॉ. हरिदास शेलार

सत्य बातमी छापली म्हणून पत्रकाराला केले उभे आरोपीच्या पिंजर्‍यात पाटोदा (प्रतिनिधी) डॉ हरिदास शेलार दि.१८ :सत्य बातमी प्रसिध्द करणं हा गुन्हा आहे का ? नाही, नक्कीच नाही, किंबहुना ते पत्रकाराचं कर्तव्यच आहे. मात्र बीड जिल्हयातील पाटोदा येथील तहसिलदार मॅडमला हे मान्य नसावं.आम्ही काही ही मनमानी केली तरी पत्रकारांनी आमच्या विरोधात काही ही लिहीता काढता कामा नये असा काही उन्मत्त अधिकार्‍यांचा तोरा असतो. पाटोद्याच्या तहसिलदार त्याच पंथातल्या दिसत आहे. पाटोदा शहरातील पाणी टंचाईची बातमी छापल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल अशी भिती दाखवत या तहसीलदार मॅडमनी थेट पत्रकार पोपट कोल्हे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हाच दाखल केला आहे. मराठवाड्यातील जनतेने उन्मत्त निजामाला पाणी पाजले. बीडचे पत्रकार ही तहसिलदार मॅडमची मोगलाई सहन करणार नाहीत.पत्रकारांनी सत्याचा आग्रह धरीत एक दिवसाचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार दिनांक १८/०२/२०१९ रोजी ११=०० वाजता हे आंदोलन होत आहे. स्वतः मराठी पत्रकार परिषदेचे श्री.एस.एम.देशमुख साहेब या आंदोलनात सहभागी होऊन प्रशासनाच्या लहरी आणि मनमानी ...

झोपलं सरकार जाग करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे :-काकडे

झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर मनसेच्या धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-काकडे बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येते की शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी,दुष्काळा संदर्भातील उपाय योजना तात्काळ राबवण्यात याव्यात यासाठी व दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज ढोंगी सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी मा राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अधिकारी कार्यालय समोर दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ सोमवारी रोजी संकाळी १०:३० वाजता धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत.तरी बीड जिल्ह्यातील मनसे च्या सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे  असे आवाहान वैभव काकडे,राजेन्द्र मोटे,श्रीराम बादाडे,सुमंत धस यांनी केले आहे

पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत एम आय एम ने वाहिली शहिदांना श्रद्धांजली

औरंगाबाद :  १५ फेब्रुवारी ( दिल्ली गेट न्यूज) पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हमल्यात ४२ जावान शहिद झाल्यावर देशभर संतापाची लाट पसरली आहे. दुपारी तीन वाजता या घटनेचा निषेध करण्यासाठी शहागंज गांधी पुतळ्यासमोर एमआयएमने पाकिस्तान मुर्दाबाद हिंदूस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. अगोदर मेनबत्या लावून उपस्थित जनसमुदायाने श्रध्दांजली अर्पित केली. कार्यकर्ते यावेळी अक्रामक झाले होते. पोलीसांचा व राखीव बल तुकडी बंदोबस्तात तैनात करण्यात आले होते. देश सर्व राजकिय पक्ष देशासाठी व शत्रुंचा मुकाबला करण्यासाठी एकवटला आहे. अशे भ्याड हल्ले आता खपवून घेतले जाणार नाही. सरकारने पाकिस्तानवर हमला करून उत्तर द्यावे अशी मागणी यावेळी आमदार इम्तियाज जलील यांनी केली. यावेळी आमदार इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, विरोधी पक्षनेते जमीर अहेमद कादरी, गटनेते नासेर सिद्दीकी, शहर अध्यक्ष समीर साजिद, जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अज्जु नाईकवाडी, आरेफ हूसेनी, अब्दुल आजीम, फेरोज खान, अब्दुल सत्तार, रफत यारखान, अक्रम शेख, अमर बीन हैदरा, सलीम सहारा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त पाटोदा पोलिस स्टेशनची शांतता बैठक संपन्न रिपोर्टर:- डॉ हरिदास शेलार

पाटोदा  तालुक्यात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवजयंती मोठ्या  उत्सहात साजरी करण्यात येणार असुन शिवजयंती  उत्सवा मध्ये कसल्याही प्रकारचे गालबोट लागु नय म्हणून पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक माने यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या  पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित मंडळीची बैठक घेऊन विविध विष्यावर चर्चा केली यावेळी आमदार सुरेश धस याचे स्वीय साहाय्यक तथा पञकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हेसाहेब,मराठी पञकार संघाचे अध्यक्ष कांदरभाई चाऊस, माजी नगराध्यक्ष पती बळीराम पोटे,शेतकरी नेते गणेश कवडे,सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष तुळशीराम ढेरे, साप्ताहिक संपादक व पञकार संघाचे अध्यक्ष गणेश शेवाळे,  कोष्याध्यक्ष हामिद पठाण, संपादक बाळासाहेब जावळे,महेश्वर शेख,सुनिल चौरे,युवराज जाधव,जय जाधव,बाबा तिपटे,कल्याण भाकरे यांच्या सह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते

जालन्यात गोळी झाडून सहायक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या... महासंवाद रिपोर्टर डॉ. हरिदास शेलार

*सहायक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या*  जालना अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तसेच पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल परजने (वय-50 वर्ष) यांनी आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली. परजने जिथे रहात होते, त्या खोलीमध्येच त्यांनी सर्व्हीस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून जीवन संपवले. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.स्वत:वर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या जालना : अंबड तालुक्यातील गोंदी येथील सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे यांनी शुक्रवारी (14 फेब्रुवारी) सकाळी १० वाजेच्या दरम्यान स्वत:कडे असलेल्या रिव्हॉल्व्हर गोळी झाडून घेवून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या त्यांनी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून गोंदी येथील पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. मध्यंतरी वाळू माफीयांच्या मुद्यावरून त्यांचे आणि वाळू माफीयांचे तसेच पोलीस दलातील वरिष्ठांसोबत किरकोळ वाद झाले होते. ते मुळचे अंमलनेर तालुक्यातील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्...

सांगलीतील जवानाचा पठाणकोटमध्ये अपघाती मृत्यू

सांगली :  जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानालाही वीरमरण आल्याचं वृत्त अगोदर समोर आलं. पण सांगली जिल्ह्यातील जवान राहुल कारंडे यांचा पठाणकोटमध्ये अपघातात मृत्यू झालाय. तहसीलदारांनी याबाबत माहिती दिली. राहुल कारंडे हे विठुरायाची वाडी गावचे आहेत. सांगली जिल्ह्यावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात उरी हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या आत्मघातकी हल्ल्यात शहिदांचा आकडा 44 वर पोहोचल्याची माहिती आहे. तर अनेक जवान जखमी आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता, की गाड्यांचे तुकडे-तुकडे झाले आहेत. ज्या गाडीचा वापर हल्ल्यासाठी करण्यात आला, त्या गाडीमध्ये 200 किलोंपेक्षा अधिक स्फोटकं होती.

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. जवानांच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. त्यामुळे झालेल्या स्फोटात 30 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही."दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर सर्व भारतीयांनी या हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना व्यक्त केली आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. सर्व राजकीय नेत्यांनीदेखील घटनेचा निषेध केला, परंतु घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र व्यक्त झाले नव्हते. खूप उशीरा मोदींनी ट्वीट करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली.नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ...

पशुधनासाठी औषध मिळत नाही :-भाई विष्णुपंत घोलप..महासंवाद रिपोर्टर..डॉ.हरिदास शेलार

*शासन कोट्यावधी रुपयांच्या घोषणा करते पण शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी साधी संडास ची गोळी किंवा औषध मिळत नाही*. :- भाई विष्णुपंत घोलप  पाटोदा (प्रतिनिधी) शासन रोज शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयांच्या घोषणा करत आहे. पण गेल्या वर्षभरा पासून पशुसंवर्धन विभागात गाय, बैल म्हैस, शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरांना संडास (बुळकांडी) लागली तर गोळी किंवा औषध मिळत नाही. आणि इतर  विषयासंदर्भात शासनाला शेतकऱ्यांप्रती गांभीर्य दिसत नाही असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई  विष्णुपंत घोलप यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागिय अधिकारी कार्यालय पाटोदा मार्फत मागण्याचे निवेदन पाठविले आहे. तसेच माहितीस्तव आमदार मा.धनंजय मुंडे (विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य), मा. ना.महादेव जानकर (पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मुंबई ),मा.आ.भाई जयंत पाटील (सरचिटणीस भारतीय शेतकरी कामगार पक्ष) यांना पाठविले आहे. शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे पशुसंवर्धन विभागात पाटोदा तालुक्यात प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणीचे सहा पदे रिक्त असून बीड जिल्ह्यात १६ + २७ = ४३ डॉक्टर कमी अस...

प्रकाश बोधले महाराज यांच्या हस्ते 250 वयोवृद्धांची 61 वी साजरी

पाटोदा  (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पारगाव घुमरा येथे    अखंड़ हरीनाम सप्ताहात रामचंद्र बोधले महाराज चरीञ कथा व ज्ञानेश्वर पारायणाचे आयोजन ग्रामस्थानी केले होते .     या सप्ताहामध्ये दि 11/2/2019 रोजी प्रकाश बोधले महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले ग्रामस्थानी आखील भारतीय वारकरी  मंड़ळाचे ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांची 61 वी साजरी करण्याचे ग्रामस्थानी व युवकांनी ठरवले . प्रकाश बोधले महाराज यांनी आपल्या बरोबर सर्व समाजातील व्यक्तीचे वय 61 च्या पुढे झाले आहे त्यांच्या बरोबर आपली 61 वी साजरी करण्याचे ग्रामस्थांना व युवकांना सुचवले त्यानुसार गावातील 250 वयोवृद्धांचा सन्मान सोहळा करण्यासाठी शिवशंकर घुमरे ,आशोक घुमरे, राजेन्द्र घुमरे,प्रदीप घुमरे, एकनाथ घुमरे आदींनी या सत्कार कार्यक्रमाचा भार उचलला यावेळी प्रकाश बोधले महाराज यांच्या हस्ते   या सर्व 61 वी पार केलेल्या नागरीकांचा  सपत्नीक सत्कार केला .    या कार्यक्रमास सभापती पुष्पाताई सोनवणे, महेन्द्र गर्जे, बबनराव सोनवणे, दिपक घुमरे, सुधीर घुमरे, गुलाबराव घुमरे, युवराज घुमरे, मदनबप्पा...

नगराध्यक्षांच्या पतीची मुख्याधिकाऱ्याशी अरेरावी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

. पाटोदा प्रतिनिधी ➡️ हरिदास शेलार. पाटोदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष यांच्या पतीने बैठकीदरम्यान महिला मुख्याधिकारी यांच्याशी अरेरावी केल्याची घटना पाटोदा येथील नगरपंचायत कार्यालयात मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली. याप्रकरणी नगराध्यक्ष पतीविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात प्रशासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.श्री गणेश नारायणकर असे गुन्हा दाखल झालेल्या नगराध्यक्ष पतीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार नगरपंचायत कार्यालयात बैठक सुरू होती यावेळी लिपिक विठ्ठल हे या विषयाचे वाचन करत असताना नारायणकर यांनी  मुख्याधिकारी नीलम बाबुराव कांबळे यांना जाब विचारत बोलणे सुरू केले शिवाय अपशब्द वापरले असे मुख्याधिकारी कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नगराध्यक्ष पती गणेश नारायणकर यांच्या विरोधात  गुन्हा नोंद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  कांबळे मॅडम महिला  असतानाही शहाणपण का करता भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात असलेल्या पाटोदा नगरपंचायत च्या अध्यक्षापासून ते सर्व सभापती महिला तसेच शिवाय मुख्याधिकारी महिला असतानाही ते पदाधिकाऱ्यांच्या पती...

पूर्ण ताकदीनिशी लढणार: प्रियांका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आम्हाला एक मोठं उद्दिष्ट दिलं आहे. २०१९ चं युद्ध आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार, असा निर्धार प्रियांका गांधी वड्रा यांनी बोलून दाखवला. काँग्रेसने राष्ट्रीय महान लोकशाही पार्टीसोबत आघाडी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.राष्ट्रीय महान लोकशाही पार्टीचे अध्यक्ष केशव मौर्य यांचं प्रियांका यांनी स्वागत केले. पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यावेळी घोषणा केली की, 'काँग्रेस उत्तर प्रदेशात महान पक्षासोबत निवडणूक लढवणार.' उत्तर प्रदेशात अराजकता वाढली आहे. जातीनिहाय आरक्षणाच्या नावाखाली सर्वच पक्ष राजकारण करत आहेत, असं केशव मौर्य म्हणाले.दोनच दिवसांपूर्वी लखनऊमध्ये रोड शोद्वारे प्रियांका यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर प्रियांका अॅक्टिव मूडमध्ये दिसल्या. त्या मॅरेथॉन बैठका घेत आहेत. पहिली बैठक पहाटे साडेपाच वाजता संपवून त्यांनी दुसऱ्या दिवशीची बैठक सुरू केली. प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना त्या भेटत आहेत. या दरम्यान प्रियांका यांना भेटण्यासाठी येत असलेल्या कार्यकर्त्यांकडून एक अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज सोशल मीडियावरही...

आंबेडकरांना ४ जागा सोडणार: सूत्र

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना सोबत घेण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून 'महाआघाडी'तील जागावाटपाचं सूत्रही निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी आज काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महाआघाडीच्या जागावाटपावर विस्ताराने चर्चा करण्यात आली. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला चार जागा, राजू शेट्टी यांच्या संघटनेला दोन जागा आणि माकपला एक जागा सोडण्यावर सर्व नेत्यांचं एकमत झाल्याचं, सूत्रांनी स्पष्ट केलं.बैठकीला विखेंसह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.अजित पवार-राज ठाकरे यांच्या भेटीनंतर झालेल्या या बैठकीत अपेक्षेप्रमाणे मनसेल...