मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंचित बहुजन आघाडीने खाते उघडलं

यवतमाळ:- राज्यात विधानसभे नंतर रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने विदर्भातील यवतमाळ मध्ये आपले खाते उघडले आहे. वंचितचे २ उमेदवार विजयी झाले. नगर पंचायत ढाणकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथून वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. १. संबोधी महेंद्र गायकवाड २. सैय्यद बासनुर बी. राज्यात विधानसभेनंतर वंचित बहुजन आघाडीने विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात आपले खाते उघडले आहे. वंचितचे उमेदवार संबोधी महेंद्र गायकवाड आणि सैय्यद बासनुर बी.हे विजयी झाले महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीमध्ये तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा खूप प्रभावशाली राहिली आहे. आघाडीने लोकसभा संसद विधानसभेमध्ये आपली एक प्रत्यक्षात वंचित मतांच्या प्रभावाच्या दबाव प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये पाहण्यात आले आहेत. मागील वर्षापासून वंचित बहुजन आघाडी खूप चर्चेमध्ये आलेली आहे पण लोकसभा व विधानसभा मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या एकही उमेदवार एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता वंचित बहुजन आघाडी च्या प्रभाव अजूनही संपलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सातत्याने व नियमित रूपाने आपले काम प्रामाणिकपणे सुरू ठ...

पूर्णा तालुक्यातील कार्यकर्ता व जनतेशी संपर्क दौरा

पूर्णा तालुक्यातील कार्यकर्ता व जनतेशी संपर्क दौरा -------------------///------------------ गंगाखेड (प्रतिनिधी) माजी.आमदार सीताराम घनदाट मामा यांचे ज्येष्ठ चिरंजीव मोहन घनदाट यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पूर्ण शहरासह तालुक्यातील गावांना भेटी देत कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पूर्णा शहरासह तालुक्यातील पेनुर,रुंज,आवई,सुहागन,बरबडी,ताडकळस,चुडावा,खोरस,धानोरा काळे,देउळगाव,वझुर,कावलगाव आदी गावांना भेटी देउन कार्यकर्त्यांशी व जनतेशी संवाद साधला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोहन घनदाट म्हणाले की पूर्णा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घनदाट परिवार सदैव कटिबद्ध आहे. जय-पराजय याचा विचार न करता विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोणत्याही भूलथापांना व अफवांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही ते म्हणाले यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.

बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे बीड - शहराजवळ सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्‍सिजन झोन तयार केला जात आहे. परिसरात विशिष्ट जातींची झाडे चिटकून लावली जात असून, यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत. बीड - शहराजवळच्या पालवण येथे शासनाच्या वनविभागासह लोकसहभागातून सह्याद्री देवराई हा प्रकल्प तीन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. वृक्षसंगोपनाची चळवळ अधिकाधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे. दोन वर्षांत या ठिकाणी एक लाख 64 हजार विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली गेली आहे. 207 हेक्‍टर क्षेत्राचा हा परिसर लोकसहभागातून पूर्ण केला जात आहे. पालवणचा सह्याद्री देवराई हा प्रकल्प लवकरच सबंध महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्‍वास अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. सह्याद्री देवराई परिसरात शनिवारी (ता. 21) सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लेखक, पटकथा दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्यासह शिल्पकार किशोर ठाकूर, सतीश मोरे, सचिन चंदने, वृक्षत...

धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते, आक्रमक वक्ते, संघटक धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना मंत्रिपद मिळणार की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु होती. मात्र आज राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पत्रकारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पक्षाच्यावतीने मुंडे यांचा बायोडेटा पाठवण्यात आला आहे. ज्या नेत्यांचे मंत्रिपद ठरले आहे. त्यांचा बायोडेटा या ग्रुपवर पाठवण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्या बायोडेटाचा समावेश आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ते मंत्री असा दिर्घ आणि संघर्षमय असा प्रवास मुंडे यांनी आपल्या कारकिर्दीत केला आहे. धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता या नात्याने पक्ष वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सरकारवर आसूड ओढण्याची एकही संधी मुंडे यांनी विरोधी पक्षनेता असताना सोडली नव्हती. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी राज्यभर दौरे केले होते. त्याआधी शिवस्वराज्य यात्र...

गंगाखेड मतदारसंघाच्या राजकारणात सक्रिय राहणार :मोहन घनदाट

राजकारणात सक्रिय राहणार :मोहनदादा घनदाट -------------------------------------- गंगाखेड (प्रतिनिधी) गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माजी.आमदार सीताराम घनदाट मामा मित्र मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मामाचे चिरंजीव अभ्युदय बँकेचे संचालक  मोहनदादा घनदाट हे उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी कुठेही पळापळ करू नये यापुढेही सक्रिय राजकारणात आमचे कुटुंब राहणार असून येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार असून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी सदाशिवआप्पा ढेले,उत्तम जाधव, जयसिंग आप्पा शिंदे, रावसाहेब शिंदे, शिवाजीराव शेरकर, दयानंद कदम, रामकिशन दुधाटे ,व्यंकटराव पारवे,डि.के पाटील,सुभाषराव शेळके, राजू नारायणकर, सभापती चापके, भागवत मुरकुटे ,रमेश पोळ, आबासाहेब देशमुख,अर्जुन जयभाय, मधुसूदन लटपटे,रमेश महामुने,पंढरी राठोड,गोविंद जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते

पाटोद्यात वसंतराव नाईक विद्यालय आयोजित परीक्षेला तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद

पाटोद्यात वसंतराव नाईक विद्यालय आयोजित परीक्षेला तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद  2741 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा पाटोदा (प्रतिनिधी )शहरातील नामांकित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा आयोजित तालुकास्तरीय पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षा 2019- 20 तालुक्यातील 52 शाळांमधून 2741 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून परीक्षेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याने तालुक्यात या परीक्षेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पाटोदा तालुक्यात शैक्षणिक चळवळ उभी राहून नैसर्गिक रित्या मागासलेला तालुका शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर राहून तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड व आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने विद्यालयाने स्वतःच्या विद्यार्थ्यां बरोबर दर महिन्याला छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा उपक्रम घेतला जातोच परंतु तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा उपक्रमांमध्ये सहभागी होता यावे म्हणून हा उपक्रम नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक श्री रामकृष्ण बांगर मार्गदर्शिका सौ सत्यभामा ताई बांगर व कर्तव्यदक्ष प्राचार्य तुकाराम तुपे या...

नायगाव:शहरात चोरट्याचा हौदस;दोन आडत दुकाने फोडली ;56 चोरी प्रकरणाचा तपास लालफितीत

जिल्हा प्रतिनिधी रियाज आतार नादेंड  नायगाव:शहरात चोरट्याचा हौदस दोन आडत दुकाने फोडली अब तक 56 चोर्याचा तपास लालफितीत नायगाव शहरा चोरट्यांचा हौदोस चालूच असून गुरुवारी शहरातील गजबजलेल्या मोंढ्यातील भगवान लंगडापुरे व उमाकांत चिद्रावार यांचे आडत दुकान फोडून चोरट्याने आपला हात साफ केल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरात वीना खंड चोऱ्यांचे सत्र चालूच आहे आत्तापर्यंत चप्पल चोऱ्या झाले आहेत यात कोट्यावधीची रोख रक्कम सोना चांदी ची लुट  चोरानी केली पण एका ही चोरीचा तपास लावण्यास   नायगाव पोलिसांना यश आला नाही. नायगाव पोलिस निष्क्रिय तर चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येतं  असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी याची दखल घेण्यास तयार नसल्याने पोलीस यंत्रणा कमालीची सुस्तवाली दिसुन येत आहे  जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व पोलिस उपअधीक्षक धुमाळ सर शहरात विनाखंड चालू असलेल्या चोरांच्या छडा लावावा  व स्थानिक पोलिसांना सक्रिय करावे अशी मागणी सर्व थरातून केली जात आहे गुरुवारी रात्री मध्ये रात्री नंतर आडत बाजारपेठेत  असलेल्या उमाकांत चिद्रवार यांचे आडत दुकानाचे ...

मनोहर भिडेंना तुरुंगात पाठवा – आमदार प्रकाश गजभिये यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 यंदाचा कोरेगाव भीमा शौर्य दिन दिमाखात साजरा करू, कोणी गैर प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास सरकार त्यांची गय करणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी गजभिये यांना दिलं आहे. तसंच कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा  सरकार दाखवून देईल असा स्पष्ट इशाराही  मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिला.  कोरेगाव भीमा हिसांचारा मध्ये भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा वारंवार आरोप केला जातो. त्या पार्श्र्वभूमिवर या दोघांवर कारवाई करून शौर्य दिन साजरा करणासाठी देशभरातून येणाऱ्या बांधवांना सुरक्षा द्यावी. अशी मागणी गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.  कोरेगाव भीमा इथं जमणाऱ्या आंबेडकरी जनतेसाठी विविध सोयी उपलब्ध करून द्याव्या,  भीमा कोरेगावकडे येणाऱ्या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त ठेवावा. अशी मागणी गजभिये यांनी या निवेदनाद्वारे केली.  भिडे महिलांबद्दल नेहमीच अपमानजनक विधान करतात. त्याचा निषेधही प्रकाश गजभिये यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल परब, आमदार सुनिल प्रभू, सतीश गा...

स्मशानभूमी स्वच्छ करुन वाहिली वडीलांना श्रध्दांजली

स्मशानभूमी स्वच्छ करुन वाहिली वडीलांना श्रध्दांजली मुंबई : सावदा जि. जळगाव येथील स्वातंत्र्य सेनानी शंकरअप्पा महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या तीन मुलांनी व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने स्मशानभूमीची स्वच्छता करुन अनोखी श्रध्दांजली अर्पण केली. मंत्रालयातील अधिकारी डॉ.अनिल महाजन यांचे ते वडील होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. वडीलांच्या निधनानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता, किंवा १३ वे १४ वे असे विधी न करता अनिल महाजन आणि परिवाराने पाचव्या दिवशी स्मशानभूमीतील कचरा गोळा केला. बसण्यासाठीच्या पायऱ्यां स्वच्छ केल्या. भिंतीवर आणि सर्वत्र साचलेली राख साफ केली. स्मशानभूमीचा अंत्यविधीचे मंडप गृह झाडून चकाचक केले. या कामात त्यांच्यासोबत एच.के. पाटील, विजय महाजन, दिलीप महाजन, डॉ. अमित महाजन, डॉ. तुषार पाटील, एच.के. पाटील, अ‍ॅड. राकेश पाटील, पंकज कुरकुरे आदी सहभागी झाले होते. या अनोख्या कामाचे पंचक्रोशीत कौतुक होत होते. शंकरअप्पा महाजन यांनी जीवनाची सुरुवात तलाठी म्हणून केली. पुढे महसूल विभागाशी त्यांचा संबंध आला. अत्यंत तंद...

वृक्ष संमेलन; बीडकरांनी सयाजीरावांना साथ द्यायला हवी

बीडची सह्याद्री देवराई बीडपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या पालवन जवळच्या डोंगरावर या माणसाने एक नव्हे दोन नव्हे, हजार नव्हे पाचशे नव्हे तर लाखो झाडांची लागवड केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या कालखंडामध्ये या वृक्षांच्या लागवडीबाबत जोपासना करण्याचे धोरणही सयाजीरावांनी आखल्यामुळे आज त्या डोंगरामध्ये हजारो झाडे हे डोक्यापर्यंत गेले आहेत. कालपर्यंत त्या झाडांना जोपासले जात होते, परंतु आता ती झाडे माणसांना जोपासू पहात आहे. असेच लाखो झाडे जोपासण्यासाठी, जगवण्यासाठी सयाजीरावांची धडपड सुरू आहे. त्यांच्या सोबत बीड बाहेरचेच अनेक प्रतिष्ठीत मान्यवर जणू स्वत:च्या शेतात राबराब राबावं तसं त्या डोंगर माळरानावर राबराब राबताना दिसून येत आहेत. नुसते वृक्षारोपण आणि झाडांचं संगोपनच नव्हे तर तिथे एक नैसर्गिक पार्क कसं होईल यासाठी खटाटोप चालू आहे. मोठमोठमोठ्या दगडांची रचना  शिल्पात करून त्या डोंगराला आणखीच वेगळेपण देण्याचं काम होत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणार्‍या तुकोबांना सजीव सृष्टीतील सर्वच जण सोयरे वाटायचे तसं सयाजीरावांना सजीव सृष्टीतील सर्वच जण सोयरे तर झाड, फुल, पान, पक्षी हे ...

नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात देगलूर शहर कडकडीत बंद व रास्ता रोको आंदोलन.

नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात देगलूर शहर कळकळीत बंद व रास्ता रोको आंदोलन. जि. नादेंड ता देगलूर           नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात आज देगलूर बंद व शहराच्या मध्यवर्ती मदनुर  नाका येथे नांदेड-हैदराबाद महामार्ग बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.      सदरील रस्ता रोको आंदोलन CAA, NRC च्या विरोधात करण्यात आले. या आंदोलनात भाजप सरकारने संविधान विरोधी नागरिकता संशोधन विधेयक कायदा लागू केल्यामुळे हा कायदा परत घ्या या मागणीसाठी देगलूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धर्म, जात व लिंगच्या आधारावर कोणालाही या देशाची नागरिकता देता येत नाही. अस भारतीय संविधानात नमूद केले गेले आहे‌‌. तरीही या भाजप सरकारने धर्माच्या आधारावर नागरिकता देणारा नागरिकता संशोधन विधेयक लागू करून भारतीय संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत आज देगलूर शहरात या नागरिकाता संशोधन विधेयकाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात 'संविधान बचाव देश बचाव', 'भारतीय संविधान जिंदाबाद' व 'हम सब एक है' अशा अनेक घोषणा या वेळी देण्यात आल्या. ...

पंतप्रधान पीक विमा योजनेतुन बीड जिल्हा वंचित ठेवल्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी कार्यालया समोर संबुळे वाजवत धरणे

*पंतप्रधान पीक विमा योजनेतुन बीड जिल्हा वंचित ठेवल्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी कार्यालया समोर संबुळे वाजवत धरणे * पाटोदा *(प्रतिनिधी )* बीड  जिल्हयातील शेतकरी पिक विमा योजनेच्या निविदा कोणत्याही विमा कंपनीने न भरल्यामुळे बीड जिल्हयातील शेतकरी हंगामी पिक विम्यापासुन वंचीत राहु शकतात . त्यामुळे सदर कंपन्यांना केंद्र शासनाने बीड जिल्हा सामावुन घ्यावा यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी पाटोदा उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक २६ / १२ / २०१९ रोजी सकाळी ११ .०० वा आय काँग्रेस कम्युनिस्ट शेकापा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे धरणे अंदोलन व सबुळे वादन अंदोलन करण्यात आले यावेळी कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे, यांनी सांगितले जर शासनाने पंतप्रधान पिक विमा योजनेत  बीड जिल्ह्याचा समावेश केला नाही तर पूर्ण तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून  मोठे आंदोलन उभा करतील कॉ महादेव नागरगोजे यांनी केंद्र शासनाचा जाहीर निषेध करीत मोदी सरकार हे  शेतकऱ्याच्या विरोधात आहे असे सांगितले भाई विष्णूपंत यांनी स्थानिक आमदाराला प्रश्न लावून धरण्यास भाग पाडू असे स...

वाघाने घेतला एक बळी;दीड महिन्यातली चौथी घटना दोघंचा मृत्यू

मंगेश कोडापे वाघाने घेतला बळी एक दीड महिन्यातली चौथी घटना दोघंचा मृत्यू   .आणी. दोघ गंभीर जखमी राजुरा तालुक्यात जंगल परिसरात ही घटन जंगलात काड्या गोळा करण्यास गेला असता इंदिरा नगर निवासी मंगेश कोडापे हा आज सकाळी राजुरा परिसरानजीक असलेल्या जोगापूर जंगलाच्या हद्दीत वाघाचा बळी ठरला असुन वन विभागाने वारंवार दिलेल्या सुचना कडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना आपला जिव गमवावा लागत आहे. मंगेश कोडापे काही इतर लोकांसह सकाळी जंगलात गेला होता मात्र काही वेळातच वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि काही कळायच्या आत त्याच्या नरडीचा घोट घेतला. आणि त्याचा मृतदेह दूरवर फरफटत नेऊन झुडपात लपवून ठेवला. सोबत असलेले इतर लोक घटना घडताच पसार झाले आणि त्यांनी इंदिरा नगर परिसरात येऊन लोकांना घटनेची माहिती दिली. घटना कळताच प्रस्तुत प्रतिनिधीने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु नेमके ठिकाण सांगायला कुणीही तयार नसल्याने प्रस्तुत प्रतिनिधीस जंगलात बरीच पायपीट करावी लागली. शेवटी घटनास्थळ शोधुन काढण्यात यश आले. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटना कळताच घटनास्थळी पोहचले असुन त्यांनी पंचनामा सुरू केला आहे. प्रस्तुत प्रत...

कोरपना येथे ग्रामीण रुग्णालयात वाढदिवसानिमित्त फळवाटप

कोरपना येथे ग्रामीण रुग्णालयात वाढदिवसानिमित्त फळवाटप रिपब्लिकन पार्टी कोरपना तर्फे ग्रामीण रुग्णालय मध्ये मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी   रामदासजी आठवले यांच्या निमित्त वाढदिवसानिमित्त पार्टी तर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तर रिपब्लिकन पार्टी तर्फे रुग्णांना फळवाटप केले  गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यात नेहमी तत्पर असते आठवले साहेबांनी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला चंद्रपूर जिल्हा या तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात यावा याकरिता कार्यकर्ते प्रियंका खाडे  नेहमी जनतेच्या सेवेत राहणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रियंका खाडे यांनी आपले मत व्यक्त केले या वेळेस रिपब्लिकन पार्टी कोरपना तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते या तालुक्यात अजूनही अनेक समस्या आवासून उभ्या आहेत याकडे मात्र दुर्लक्ष होत आहेत शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यांचा लाभ सामान्यांना मिळावा या उदात्त हेतुने प्रियंका खाडे अनेकांना न्याय मिळावा याकरिता तालुक्यातच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात कार्य करीत आहेत अनेकांना न्याय मिळवून देण्यात वैशाली आहेत ग्र...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व बाळासाहेब आंबेडकर यांच्यात चर्चा

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत भेट झाली. 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी श्री. ठाकरे यांच्या समवेत या बैठकीत चर्चा झाली. आंदोलन शांततेत पार पाडावे या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदू भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे,हे स्पष्ट केले. या कायद्यांचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतय. राज्यात डिटेन्शन कॅम्प उभारले जाताय हे मी तीन महिन्यांपूर्वी जनतेला, माध्यमांना सांगितले होते, त्याचीही माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली. त्यासोबत अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी धनराज वंजारी, डॉ.अरुण सावंत,आ.कपिल पाटील उपस्थित होते.

चंद्रपूर-मूल रोडवर भीषण अपघात दोघे जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी

*चंद्रपूर-मूल रोडवर भीषण अपघात दोघे जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी*                              - चंद्रपूर-मूल रोडवर आज दिनांक 23 ला  सकाळी 11 वाजता दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर स्वार चालक प्रितम सुरेश शेजूळे वय  २० वर्ष व प्रफुल प्रभाकर शेलोटे वय १९ दोघेही राहणार लोहारा कँप चंद्रपूर या दोघांचा जागीच म्रुत्यु झाला. तर दुसऱ्या एका दुचाकी स्वार सुरेश सुखदेव राऊत वय ३० वर्ष आणि नीलेश लहानु मांढरे वय २३ वर्ष दोघेही राहणार सुशी तालूका मूल गंभीर जखमी झाले. जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.  मिळालेल्या माहिती नुसार चंद्रपूर कडुन मूल कडे येणारी नारायणा विद्यालय,चंद्रपूर ची स्कूलबस क्रं. एमएच ३४ ए ८३६२ ही मूल पासुन 5 किमी अंतरावर असलेल्या एका वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रं. एमएच ३४ एएक्स ९८९१ वाहनाला धडकली. यात दुचाकीवर असलेले दोघेजण जागीच ठार झाले. बस दुचाकीला धडकल्याने बसचालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचाकी मागून म्हशी घेऊन येणाऱ्या पीकअप क्रं. ...

बार्टीच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त बार्टीच्या अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांकरीता विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन

बार्टीच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त बार्टीच्या अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांकरीता विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून दि. 22 डिसेंबर 1978 पासून ही संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय व समतेवरील जीवनकार्याची माहिती विविध माध्यमांदवारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. दि. 22 डिसेंबर 2019 रोजी बार्टीच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त बार्टीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच बार्टी संचालित सफाई कामगारांच्या मुला-मुलींकरीता चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमांत आणि मैदानी खेळांत सहभागी होऊन वर्धापन दिन साजरा केला. सदर दिवशी बार्टी संचालित निवासी शाळेतील विद्यार्थ्यांकरीता 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता शाळेच्या ...

शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू नये: अन्यथा आंदोलननाचा इशारा

*शेतकरी पिक विमा पासून  वंचित** *राहू नये  म्हणून  पाटोदा* *मध्ये काँग्रेस कॉम्रेड किसान* *पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा * बीड जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांसमोर सध्या मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे रब्बी हंगामाची पेरणी केली आहे पीकही जोमात आहेत मात्र आभाळ आल्यामुळे काही  पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाची पंतप्रधान पिक योजना या योजनेतून बीड जिल्हा वंचित राहू लागला आहे कारण कोणत्याच कंपनीने जिल्ह्याची निविदा भरलेली नसून व शेतकऱ्याचा पिक विमा उतरून घ्यायला कोणीही तयार नसल्यामुळे पाटोदा तालुक्यातील काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाले असून आज त्यांनी उपविभागीय कार्यालयाला निवेदन दिले आहे की केंद्र शासनाने तात्काळ बीड जिल्हा सामावून घेण्यासाठी कंपन्यांना आदेश द्यावेत नसता केंद्र शासनाला जागे करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 26 12 2019 रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन व  संबुळे वादन करण्यात येईल असा इशारा केंद्र शासनाला निवेदनामध्ये देण्यात  आला आहे यावेळी काँग्रेस तालुकाध...

सामाजिक कार्यकर्ते नय्युम पठाण यांनी केला बेवारसाचा अंत्यविधी

सामाजिक कार्यकर्ते नय्युम पठाण यांनी केला बेवारसाचा अंत्यविधी  प्रतिनिधी । पाटोदा  दि २०- ज्यांना कोणीच नसते त्यांच्या साठी पाटोदा शहरात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्ष नय्युण पठाण हे आसतात. असाच बेवारसाचा अंत्यविधी नय्युम पठाण यांनी दि १९रोजी केला.     पाटोदा येथे अनेक वर्षांपासून बेवारस चव्हाण मामा व त्यांची पत्नी पाटोदा  शहरात पोट भरण्यासाठी आले. ते पाटोदा शहरातील हॉटेलमध्ये पाणी टाकून पोट भरत होते. पाटोदा शहरात त्यांना मामा म्हणून ओळखले जात होते.  त्यांचे दु:खद निधन झाले .  लोकांच्या हाॅटेलात पाणी भरून आपली उपजीविका भागवणारे मामा यांचे निधनाची वार्ता कळताच पाटोदा येथिल नय्युम पठाण, माजी सरपंच किशोर अडागळे, अरविंद सरोदे, थोरात मामा, सय्यद शफ्फु, शेख असेफ , जितेंद्र भोसले, कलीम शेठ,सखाराम तुपे,जावेद मकराणी बाळासाहेब जावळे यांनी मदतीला धावुन संतती नसलेल्या चव्हाण मामा यांच्या अंत्यविधी ची  तयारी  केली. सरपन, अंत्यविधी चे  साहित्य हे सर्व जमा करण्यात आले होते. तीन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे  निधन झाल्यानंतर चव्हाण म...

केंद्राने दिलेली CAA, NRC बद्दलच्या १३ प्रश्नांची उत्तरे वाचा;

*केंद्राने दिलेली CAA, NRC बद्दलच्या १३ प्रश्नांची उत्तरे वाचा; मनात शंका उरणार नाही!*   *नवी दिल्ली* *सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी कायद्यावरुन देशभरात विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. अनेकांनी या कायद्यावरुन सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. सरकार धर्माच्या नावावर नागरिकांचे विभाजन करतेय, हा कायदा लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय मुस्लिमांवर होणार आहे असे आरोप केंद्र सरकारवर केले आहेत त्यामुळे सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने या प्रश्नांवर पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे.* *प्रश्न १ - CAA कायद्यात NRC कायदा अवलंबून आहे?* उत्तर - असं नाही, CAA हा वेगळा कायदा आहे अन् NRC ही वेगळी प्रक्रिया आहे. सुधारित नागरिकत्व कायदा देशभरात लागू झाला असून एनआरसीचे नियम आणि अटी अद्यापही देशात लागू नाही. आसाममध्ये एनआरसीची जी प्रक्रिया सुरु आहे ती सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि आसाम करारानुसार सुरु आहे. *प्रश्न २ - भारतीय मुस्लिमांवर CAA आणि NRC प्रक्रियेचा परिणाम होणार का?* उत्तर - कोणत्याही धर्मातील भारतीय नागरिकाला या दोन्ही कायद्यामुळे चिंता करण्य...

राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने तोफा वाजून जोरदार स्वागत

*महाविकास आघाडी सरकारची राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखा पर्यंतच्या कर्ज माफी निर्णयाचे पाटोद्यात राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने तोफा वाजून जोरदार स्वागत * पाटोदा *(प्रतिनिधी  )* दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे बिना अटी सरसकट कर्ज माफ केले आहे. तसेच यावेळी राज्य सरकारने नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले ‘राज्यातील शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती घालण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाऊन हेलपाटे घालावे लागणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्यामुळे पाटोद्यात महात्मा फुले शेतकरी कर्जे माफी योजनेच्या मोठा निर्णय मुळे तोफा वाजून आंनद उत्सव साजरा केला यावेळी युवानेते उमर चाऊ...

मुख्याध्यापिकेच्या गैरहजेरीने शिक्षकांची मुजोरी

मुख्याध्यापिकेच्या गैरहजेरीने शिक्षकांची मुजोरी         गोंडपिपरी जि.प.कन्या शाळेतील प्रताप  शाळा व्यवस्थापन  समितीचे बीडीओंना तक्रार गोंडपिपरी - आकाश चौधरी        तालुक्यात  सध्या जिल्हा परीषद शाळांचे कारनामे गाजत आहेत. अश्यातच आता गोंडपिपरी येथिल जि.प. कन्या शाळेतील मुजोर शिक्षकांचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरनाची तक्रार ला सवंर्ग विकास आधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यानी दिली आहे.      शहरात जि.प. कन्या शाळा नामांकीत शाळा म्हणून ओळखल्या जात होती. मात्र मागील वर्षापासून सदर शाळेच्या नियोजन शुन्य कार्यप्रनालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अडबायले म्याडम मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला तेव्हापासून शिक्षकही मुजोर झाले. शाळेच्या वेळेवर विध्यार्थी हजर होतात.मात्र शिक्षकच शाळेत वेळेवर येत नसल्याने गेट बंद असते.त्यामुळे तासन तास विध्यार्थाना ताटकळत राहावे लागते . मुख्याध्यापिका ह्या नेहमीच  गैरहजर असल्याने शिक्षकावर कुठलाच वचक नाही. त्याचा फायदा शिक्षक घेत असुन जवळपास ५०ते६० कि.म...

आमदार सुभाष धोटेंनी विधानसभेत मांडल्या राजुरा क्षेत्राच्या समस्या.

आमदार सुभाष धोटेंनी विधानसभेत मांडल्या राजुरा क्षेत्राच्या समस्या.   महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा विषयावर प्रश्न उपस्थित करून क्षेत्राच्या विकासासाठी विधानसभेचे लक्ष वेधले. क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रश्न उपस्थित करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज स्पष्ट केली.          आमदार सुभाष धोटे यांनी  राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा मुख्यालयीन असलेले ३० खाटाचे रुग्णालय  १०० खाटात श्रेणी वर्दीत करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक असलेली पदे वैद्यकिय उपकरणे साहित्य व यंत्र सामग्री उपलब्ध करून तातडीने रुग्णालय सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर असून त्यापैकी २ प्राथमिक आरोग्य केंद्रांची काम पूर्ण झालेले आहे. रुग्णालयात आवश्यक असलेली पदे, वैद्यकिय उपकरणे, साहित्य व यंत्र सामग्री उपलब्ध करून तातडीने उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. चंद्रपूर जिल्यातील मुल तालुक्यातील ...

नागरिक संशोधन विधेयक रद्द करण्यासाठी हाणेगाव जामा मस्जिद ते बस स्टंड हाणेगाव धरणे आंदोलन,

नागरिक संशोधन विधेयक रद्द करण्यासाठी हाणेगाव जामा मस्जिद ते बस स्टंड हाणेगाव धरणे आंदोलन, रियाज आत्तार नादेंड प्रतिनिधी नागरिक संशोधन विधेयक रद्दच्या मागणीसाठी हाणेगाव  नादेंड बिदर रसत्या वरती धरणे आंदोलन करण्यात आले.  हाणेगाव येथील सर्व संविधान प्रेमी याच्यां कडुन निवेदन मडंळ अधिकारी देगलूर जोशी सर यांना देण्यात आला आहे. हाणेगाव नादेंड बिदर रस्ते येथे नागरिक संशोधन विधेयक मुस्लीम समाजाला इतर समुदायापासून दूर करण्याची शक्यता असून देशात पहिल्यांदाच नागरिकतेसाठी धार्मिकतेला प्राधान्य दिले जात आहे. समाजाला तोडू पाहणारे विधेयक रद्द करावे या मागणीचे निवेदन येथील हाणेगाव येथील सर्व संविधान प्रेमी यानी शुक्रवारी मडंळ आधिकारी जोशी सर यांना देण्यात आले. याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे. की, विधेयकामुळे देशात संशय व विद्वेशाचे वातावरण निर्माण होईल. असंविधानिक व अमानवीय विधेयक रद्द करावे. यावेळी हजारो संख्खा ने हाणेगाव येथे नादेंड बिदर रस्त्या वरती  शेख चादं मोहम्मद भाई कोटग्याळे गाजियोद्दीन शिळवनिकर जामा मस्जिद सदर आरशद मुल्ला  यांनी मार्गदर्शन केले. नंतर निवेदन राष्ट्...

नसता तालुकाबंद करु-नगरसेवक राजू जाधव

*महाविकास आघाडी सरकारचा विमा कंपनी वरधाक नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा योजने पासून वंचित राहु लागला यावर तात्काळ पर्याय काडा नसता तालुकाबंद करु-नगरसेवक राजू जाधव* पाटोदा *(प्रतिनिधी )* महाविकास आघाडी सरकारचा विमा कंपनी वर धाक नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा योजना पासून वंचित राहुलागला तसेच बीडसह इतर 9 जिल्ह्यात शेतकरी पीकविमा योजनेच्या निविदा कोणत्याही विमा कम्पनीने न भरल्यामुळे येथील शेतकरी रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे सदर कंपन्यांना निर्देशित करून शेतकऱ्यांचे पिकविमे तात्काळ भरून घ्यावेत व शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा तसेच सततच्या दुष्काळाने सतावलेल्या शेतकऱ्याला पीकविमा थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळवून देतो २०१९-२० च्या रब्बी हंगामात मात्र बीडसह लातूर, हिंगोली, वाशीम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा , सोलापूर आदी जिल्ह्यात कोणत्याही विमा कम्पनीने विविध कारणे देत पिकविम्याच्या निविदा न भरल्याने येथील शेतकऱ्याला पिकविम्यापासून वंचित राहावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगाम...

पाटोदयात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा उडाला बोजवारा. एस.डी.ई चे दुर्लक्ष

पाटोदयात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा उडाला बोजवारा. एस.डी.ई चे दुर्लक्ष ( पाटोदा प्रतिनिधी) :-  शहरासह तालुक्यात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. सतत खंडित होणाऱ्या सेवा तसेच कार्यालयात इंटरनेट चालत नसल्यामुळे आॕनलाईन असणारी कामे होत नाहीत . अशा अनेक समस्यामुळे बीएसएनएलच्या कारभाराचा पाटोदयातील नागरिकांना फटका सहन करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.याकडे माञ पाटोदा कार्यालयातील एस.डी.ई.हे लक्ष देत नसुन. पाटोदा  शहरासह तालुक्यात बीएसएनएलच्या मोबाईल व ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेचे तीनतेरा वाजल्यामुळे नागरिकांना फटका बसत आहे. बीएसएनएलच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच वाचायची वेळ आली आहे. कॉल ड्रॉपच्या समस्येने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. फोरजी नेटवर्क  हे चालत नसुन याचा फटका नागरिकांसह व्यापार्‍यांचेही हाल होत आहेत. अन्य मोबाईल कंपन्यांचे कॉल व्यवस्थित सुरू असून बीएसएनलच्या बाबतीत कोणती समस्या निर्माण झाली हे कळेनासे झाले आहे. ग्रामीण भागात तर नेहमीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, पुन्हा प्रयत्न करा  असे उत्तर नागरिकांना ऐकावे लागत आहे.     ...

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत साकारला अंधारी नदीवर बंधारा

*चांदा ते बांदा योजनेअंतर्गत साकारला अंधारी नदीवर बंधारा* * सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्यातला पहिला  अभिनव उपक्रम* सिंचनाच्या सोयीपासून कोसो दूर असलेल्या चंद्रपूर जिल्हयातील मूल तालुक्यात प्रत्येक वर्षी शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडत आहे. सिंचनाचा एकही लहान-मोठा प्रकल्प नसलेल्या मूल तालुक्यातून उमा, अंधारी आणि चिमडा या नदया वाहतात. परंतू या तिनही नदयामधील वाहते पाणी अडवून ठेवण्यासाठी कोठेही बंधारे बांधण्यात न आल्याने वा नदयांमधील पाणी वाहून जात आहे. तालुक्यातील शेतकन्यांवर ओढवणारे हे संकट दूर झाले पाहिजे महणून मागील दहा वर्षापासून क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. राज्याचे अर्थ, नियोजन व वन मंत्री पदाच्या कार्यकाळात क्षेत्रात चांदा ते बांदा योजना राबविण्याचा संकल्प केला, शेतक-यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून आ. मुनगंटीवार यांनी तालुक्यात चिरोली, चिमढा, चिचाळा, बोरचांदली आणि नलेश्वर या गावाजवळील वाहणाऱ्या नदीवर बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. खासदार स्थानिक विकास कार्यकरमातंर्गत निधी उपलब्ध करून घेतल्यानंतर तालुक्यातील चिरोली गावांजवळ ...

संशोधन बिल रद्द करण्यासाठी मुस्लिम सह सर्वपक्षांचा पाटोदा येथे धरणे आंदोलन

*संशोधन बिल रद्द करण्यासाठी मुस्लिम सह सर्वपक्षांचा  पाटोदा येथे धरणे आंदोलन * पाटोदा- :प्रतिनिधी केंद्र सरकारने नागरी संशोधन बिल आणल्याने सदरील हे बिल अन्यायकारक असून ते रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज पाटोदा येथील मुस्लिम समांजाच्या वतीने तहसील कार्यालय पाटोदा येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे.पाटोदा येथील राजमोहम्मद चौक येथे सर्व मुस्लिम ,हिंदू बाधव एकत्र येऊन  तहसील कार्यलय येथे जाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.    दोन दिवसांपूर्वी भाजप सरकारने नागरीकत्व संशोधन बील आणले आहे. या बिलाचा अनेकांनी विरोध केला असून हे बील रद्द करावे, अशी मागणी मुस्लिम समाजासह पेंटर एकबाल,मौलाना अल्ताफ राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवभुषण जाधव,आप्पासाहेब राख,काँग्रेसचे गणेश कवडे सुकाणू समितीचे राजाभाऊ देशमुख, काँम्रेड महादेव नागरगोजे,शेकापाचे विष्णुपंत घोलप, संभाजी बिग्रेड चे महेंद्र मोरे,भयाळा गावचे सरपंच विजयसिंह बागर,अॅड.सय्यद वहाब,अॅड.जब्बार पठाण, उमरबीन चाऊस, शेख वसिम पठाण अक्रमखान, शिवसंग्रामचे सुशिल तांबे,दलीत महासंघाचे दत्ता वाघमारे,यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले आहे. आ...

गडचांदूरच्या रोहिणीची जयपुर येथे होणाऱ्या टेबल टेनिस सामन्यांसाठी निवड

*गडचांदूरच्या रोहिणीची जयपुर येथे होणाऱ्या टेबल टेनिस सामन्यांसाठी निवड * गडचांदूर: जयपुर येथे २० ते २२ डिसेंबर दरम्यान 'पश्चिम झोन आंतरविद्यापीठ स्तरीय टेबल टेनिस' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विविध राज्यातील विद्यापीठांचा सहभाग राहणार असून गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व गडचांदूर येथील १९ वर्षीय विद्यार्थीनी रोहिणी लहूजी नवले करणार आहेत. ती सध्या एस.पी.विधि महाविद्यालय चंद्रपुर येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबत टेबल टेनिस या खेळात तिला विशेष आवड आहे. याआधी विद्यापीठा अंतर्गत झालेल्या स्पर्धेत देखील तिने विजय मिळवला होता. आता, जयपुर येथे होणाऱ्या सामन्यात मला विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करायला मिळत असल्याचा आनंद वाटतो. मी माझ्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद व आई-वडील यांना देते असे तिने सांगितले. मनोज गोरे चंद्रपूर

शासनाच्या उदासीन धोरणामुळे लाभार्थी अमृत आहार योजनेपासून वंचित

शासनाच्या उदासीन धोरणामुळे लाभार्थी अमृत आहार योजनेपासून वंचित अंडी , केळी , बिस्किट वाटप करुन केले अभिनव आंदोलन लाभार्थ्यांसह ठिय्या आंदोलनाचा इशारा कोरपणा तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या नांदा ग्रामपंचायतींमधील राजुरगुडा व लालगुडा येथील अांगनवाड्या अधिकार्‍यांनी अमृत आहार योजनेपासून वंचित ठेवल्या मागणी केल्यावरही शासन अधिकार्‍यांचे उदासीन धोरण असल्याने आज अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांना अंडी , केळी व बिस्किट वाटप करून अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करीत तात्काळ अमृत आहार योजनेचा लाभ देण्याची मागणी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास लाभार्थ्यांसह कोरपना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अाहे नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य अभय मुनोत यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कोरपना यांचेकडे राजुरगुडा व लालगुडा येथील अंगणवाडी केंद्रे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहार योजनेत समाविष्ट करावी अशी मागणी सहा महिन्यापुर्वी केली होती यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहेत बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या दुर्लक्षतेमुळेच या ठिकाणच्या लाभार्थ्यांना अ...

सासूसासऱ्यांसोबत पत्नी-मुलावर चाकूने वार करून जावई फरार(मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)

ब्रेकिंग न्यूज : सासूसासऱ्यांसोबत पत्नी-मुलावर चाकूने वार करून जावई फरार  चंद्रपूर : सावली सावली तालुक्यातील हिरापूर येथे खून येथे  ईश्वर मडावी यांचे जावई नीलकंठ कांबळे याने आपले सासरे, दोन सासू कौशल्या ईश्वर मडावी व यामिना ईश्वर मडावी यांच्यासहित पत्नी मनीषा कांबळे व आपल्या मुलावर कौटुंबिक वादातून चाकूने वार केल्याची घटना आज सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली. यात आरोपीचे सासरे  ईश्वर  मडावी यांचा मृत्यू झाला असून इतर सर्व जखमींना  गडचिरोली रुग्णालयात भरती केले असून आरोपी नीलकंठ कांबळे पळून गेला आहे. सावली पोलीस त्याचा शोध घेत असून अधिक चौकशी सुरु आहे. मनोज गोरे चंद्रपूर  जिल्हा प्रतिनिधी

नवनिर्माण शाळेत माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती साजरी

*नवनिर्माण शाळेत माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती साजरी .* पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा येथील नवनिर्माण प्राथमिक शाळा, लाल हनुमान मंदिर क्रांतीनगर येथे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, संघर्षयोद्धा, लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवन कार्यावर शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण(सर)व जायभाये सर यांनी प्रकाश टाकला. या वेळी शेतकऱ्यांचे वादळचे पाटोदा तालुका प्रतिनिधी पत्रकार शेख महेशर, शिवसंकेतचे संपादक सचिन गायकवाड यांच्या सह शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण (सर), भोसले मॅडम, सानप मॅडम, मस्के मँडम, बडे मॅडम, जायभाय सर, मोरे सर, भोसले सर, बोराटे सर, प्रकाश सोनवणे (मामा), यांच्या सह शाळेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

पाटोदा युवावक्ता स्पर्धेचे गणेश जरे, प्राची शिंदे, शितल सांगळे ठरले मानकरी

*पाटोदा युवावक्ता स्पर्धेचे गणेश जरे, प्राची शिंदे, शितल सांगळे ठरले मानकरी .* पाटोदा ( प्रतिनिधी ):- माणुसकीची भिंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,पाटोदा यांच्या वतीने पी.व्ही.पी.कॉलेज पाटोदा या ठिकाणी पाटोदा युवा कोण या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक समान गुण पडल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले, व ट्रॉफी चिठ्या टाकून विजेत्यास देण्यात आली. गणेश जरे, प्राची शिंदे, शितल सांगळे व द्वितीय क्रमांक शेख आयशा अफसर तांबोळी, तृतीय क्रमांक समान गुणामुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आला. काकडे अनुजा, सरोदे ऋतुजा व ट्रॉफी चिठ्ठी टाकून विजेत्यास देण्यात आली. व चौथा क्रमांक हरिओम गवळी याने पटकावला व सर्वात उत्कृष्ट भाषण दत्ता हुले यांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटक शिवव्याख्याते ज्ञानदेव काशीद हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म. द.क्षिरसागर सर, प्रमुख अतिथी शिवव्याख्याते गणेश भोसले हे होते, प्रमुख उपस्थिती प्राचार्य आघाव सर, पटाईत सर, टाकणकर सर, डॉ.रविंद्र गोरे, सय्यद सज्जाद, लक्ष्मण सस्ते, नवनाथ साळुके, अरुण पवार हे होते. या स्पर्धेचे परीक्षक म्ह...

बीड जिल्हयात पाटोदा तालुक्यासहीत पिक विमा योजनेत समावेश करा नसता तिव्र अंदोलन करणार* :- कॉ . महादेव नागरगोजे

*बीड जिल्हयात पाटोदा तालुक्यासहीत पिक विमा योजनेत समावेश करा नसता तिव्र अंदोलन करणार* :- कॉ . महादेव नागरगोजे पाटोदा ( प्रतिनिधी ) :- बीड जिल्हयात शेतकरी पिक विमा योजनेच्या निविदा कोणत्या ही विमा कंपनीने न भरल्यामुळे जिल्हयातील शेतकरी रब्बी हंगामातील सन २०१९ - २०२० च्या पिक विम्यापासुन वंचीत राहु शकतात, त्या मुळे सदर कंपन्यांना निर्देशित करुन शेतकऱ्याचे पिक विमे तात्काळ भरुन घ्यावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवुन दयावा, नसता जिल्हयात भारतीय कम्युनिष्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन कॉ. महादेव नागरगोजे यांनी दिले आहे. बीड जिल्हयात गेल्या खरीपाच्या पेरणी साठी आवर्शन म्हणजे कोरडया दुष्काळा मुळे शेतकऱ्याचे कापुस, सोयाबीन, उडीद, मुग, बाजरी इत्यादी सर्व पिके वाया गेली व शेतात जी थोडी फार पिके राहिली होती ती परतीच्या अतिवृष्टीच्या वादळी पावसाने पुर्ण उधवस्त होवुन वाहुन गेली. असे मिळुन शेतकऱ्याचे खरीप व रब्बी अशी दोन्ही ही पिके पुर्ण वाया गेल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणींना तोंड देत असुन तो गतीने आत्महत्याकडे वाटचाल करता आहे. एकंदरीत बीड जिल्हयात आधी कोरड्या व...

*युवा बौद्ध धम्म परिषदची भूमिका

*युवा बौद्ध धम्म परिषदची भूमिका * अनेक संघटनांपैकी एक व्हावे असे न होता दिशादर्शक कृतीकार्यक्रम राबवण्यासाठी एक विशेष विचारमंच मिळावा म्हणून 8 जानेवारी 2017 रोजी देशातील पहिली युवा बौद्ध धम्म परिषद हुपरी ता हातकणंगले जि कोल्हापुर राज्य महाराष्ट्र येथे घेवून या मंचाची स्थापना केली गेली. युवा बौद्ध धम्मपरिषद ही संकल्पना व तिची भूमिका स्पष्ट व्हावीयासाठी हा लेखप्रपंच!  *१) बौद्ध परंपरेचा शोध व प्रचार* : - भारतात बौद्ध धम्माचा प्रभावकाळ संपल्यानंतर तो नष्ट झाला, असे झालेले नाही तर त्याचा प्रभाव अंतःप्रवाहात अस्तित्वात राहिला होता व आजही आहे. त्या प्रवाहाला उजागर करुन त्याचा प्रचार आणि  प्रसार करणे हे अतिशय महत्वपूर्ण कार्य आहे त्यावर युवा बौद्ध धम्म परिषद कार्य करत आहे. यासाठी बळीराज हे बुद्धपूर्व बुद्ध असल्याचे मान्य करुन या महामानवाबद्दल कृतज्ञता बाळगून हा प्रवाह प्रचारात आणत आहोत . त्याचबरोबर सम्राट अशोका नंतर हा प्रवाह खंडीत झाला की काय?  असेच भारताच्या इतिहासाची मांडणी केली गेली आहे. त्यामुळे संतांवर तथागत बुद्धांचा प्रभाव होता याचेही पुरावे मिळतात तसेच छ . शिवाजी ...